तुळशी विवाह ; शुभ मुहूर्त नक्की जाणून घ्या !

अध्यात्मिक जरा हटके माहिती

मित्रांनो, आता दिवाळीचे वातावरण संपले. दिवाळी झाल्यानंतर आपण तुळशी विवाहाची अगदी आतुरतेने वाट पाहत असतो. प्राचीन काळापासून तुळशी विवाह करण्याची प्रथा, परंपरा प्रत्येक जण पाळत आहे. अगदी धूमधडाक्यात प्रत्येक जण आपल्या तुळशीचे लग्न लावीत असतो. गोडधोड पदार्थ या दिवशी आपल्या घरी बनवले जातात. सगळीकडेच अगदी आनंदाचे वातावरण या तुळशी विवाह दिवशी असते.

दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुद्ध द्वादशी तिथीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशीचे लग्न लावले जाते. परंतु मित्रांनो 2022 म्हणजे यावर्षी कार्तिक पौर्णिमेला या वर्षातील दुसरं खग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. त्यामुळे हा दिवस तुळशीचे लग्न लावण्यासाठी अयोग्य आहे म्हणजेच अशुभ आहे. हा दिवस तुळशीचे लग्न लावण्यासाठी शुभ नाही.

त्यामुळे मित्रांनो यावर्षी तुळशीचे लग्न लावण्यासाठी पाच नोव्हेंबर, सहा नोव्हेंबर आणि सात नोव्हेंबर हे तीनच दिवस आहेत. मित्रांनो तुळशी विवाह साठी देखील शुभ वेळ असते. या शुभ वेळी आपण आपल्या दारातील तुळशीचे लग्न लावायचे आहे. जेव्हा गाई चरून घरी येण्याची जी वेळ असते जेंव्हा सुर्य मावळण्याची वेळ असते. ही वेळ तुळशीचे लग्न लावण्यासाठी खूपच शुभ वेळ असते.

मित्रांनो गेली चार महिने आपण चातुर्मास साजरा केला. आता चार नोव्हेंबर या दिवशी देवउठनी एकादशी आहे. या दिवशी या जगाचे पालनहरता श्रीहरी विष्णू योगनिद्रेतून बाहेर येतात आणि पुन्हा एकदा मंगल कार्याची सुरुवात या दिवशीपासून सुरू होते. लग्न कार्यास पुन्हा एकदा सुरुवात होते. आणि या शुभ कार्याची सुरुवात तुळशी विवाहापासून होते.

मित्रांनो असे मानले जाते की, ज्या घरातील व्यक्ती तुळशीचे लग्न लावतात. त्या घरातील मुलींना श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळतो अशी मान्यता आहे. तसेच त्या घरातील व्यक्तीला कन्यादानाचे पुण्य देखील प्राप्त होते अशी प्राचीन मान्यता आहे. त्यामुळे मित्रांनो प्रत्येकाने आपल्या दारात असणाऱ्या तुळशीचे लग्न या शुभमुहूर्तावरच लावावे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *