धनलाभासाठी त्रिपुरारी पौर्णिमेला करा ‘हा’ उपाय धनलाभ होणारच !

वायरल राशिभविष्य वास्तूशास्त्र

मित्रांनो, कार्तिकी पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा देखील म्हटले जाते आणि या त्रिपुरारी पौर्णिमेला एक उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय केल्याने तुम्हाला धनलाभ होणार आहे. प्रत्येकाला आपल्या गरजा भागवण्यासाठी पैसा हा आवश्यक असतोच. पैसे कमवण्यासाठी प्रत्येक जण हा काबाडकष्ट करीतच असतो. परंतु मित्रांनो मिळणारा पैसा हा आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी अपुरा पडत असतो. तर मित्रांनो धनलाभासाठी येणाऱ्या या कार्तिकी पौर्णिमेला हा जर तुम्ही उपाय केला तर तुम्हाला धनलाभ नक्कीच होईल.

सात नोव्हेंबरला त्रिपुरारी म्हणजेच कार्तिकी पौर्णिमा आहे. या दिवशी भगवान शिवशंकरांनी त्रिपुरा सुराचा वध केला होता. तेव्हापासूनच ही पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. त्रिपुरारी पौर्णिमेचा हा उत्सव पाच दिवस चालतो. म्हणजेच कार्तिकी एकादशी पासून ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंत हा उत्सव सुरू असतो. तर मित्रांनो या पाच दिवसांमध्ये तुम्हाला हे उपाय करायचे आहेत.

हे उपाय जर तुम्ही या पाच दिवसांमध्ये केले तर यामुळे तुमच्या जीवनामध्ये अमुलाग्र बदल होऊ शकतो आणि धनलाभ देखील होऊ शकतो. तर मित्रांनो हे उपाय नेमके कोणते आहे ते आता आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो कार्तिकी एकादशी पासून ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंत या पाच दिवसात तुम्हाला दररोज तुळशीला पाणी घालायचे आहे. तुळशीला पाणी घातल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो.

तुळशीच्या मुळाशी असलेली जी माती आहे ती आपण अंगारा म्हणून आपल्या कपाळी लावायची आहे. यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या रोगाचा आपणाला सामान करावा लागणार नाही. आपले घर हे सुख समृद्धीने नांदेल.

कार्तिकी एकादशीपासून ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंत दररोज तुम्हाला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल आणि तीळ मिक्स करून या पाण्याने आपणाला अंघोळ करायची आहे. यामुळे आपली जी काही अडलेली कामे आहेत तसेच आर्थिक तुम्हाला काही अडचण असेल त्या सर्व अडचणी दूर होण्यास मदत होईल. मित्रांनो कार्तिकी एकादशी पासून ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंत येणारे हे पाच दिवस खूपच शुभ मानले जातात.

या पाच दिवशी तुम्ही दररोज तुमच्या जवळपास जर नदी, तलाव असेल तर या नदी तलाव मध्ये एक दिवा प्रज्वलित करून दररोज त्या नदी तलावामध्ये सोडायचा आहे. असे केल्याने कोणत्याही प्रकारच्या अकाली मृत्यूचे भय राहत नाही. जर तुम्हाला नदी तलावामध्ये दिवा प्रज्वलित करणे करून सोडणे शक्य नसेल तर तुम्ही आपल्या तुळशीपाशी दररोज एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. यामुळे आपणाला पितरांचा आशीर्वाद आपणाला प्राप्त होतो.

तसेच मित्रांनो कार्तिकी एकादशीपासून ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंत तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम व लक्ष्मी स्त्रोताचेपठण दररोज करायचे आहे आणि संध्याकाळी दीपदान करायचे आहे. जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम करणे शक्य नसेल तसेच लक्ष्मी स्त्रोत म्हणता येत नसेल तर तुम्ही इंटरनेटवर देखील हे स्त्रोत लावून ऐकूही शकता. ऐकण्याने देखील पुण्यप्राप्ती होऊ शकते. यामुळे तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी असतील त्या सर्व अडचणी दूर होण्यास मदत होईल. तसेच तुमचा आत्मविश्वास देखील वाढण्यास मदत होईल.

तसेच मित्रांनो कार्तिकी एकादशी पासून कार्तिकी पौर्णिमेपर्यंत दररोज सकाळी तुम्ही सूर्याला जल अर्पण करा. त्या पाण्यामध्ये तुम्हाला शेंदूर किंवा लाल कुंकू मिक्स करायचा आहे किंवा एखादे लाल फुल देखील तुम्ही टाकू शकता. आणि हे पाणी तुम्ही सूर्याला अर्पण करायचे आहे. यामुळे सौभाग्यप्राप्ती होते. तसेच बुद्धिमत्ता व मानसन्मान देखील प्राप्त होते.

तर मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे कोणताही एक उपाय अगदी मनोभावे व श्रद्धेने तुम्ही जर केला तर त्याचा सकारात्मक प्रभाव तुमच्या जीवनामध्ये झालेला तुम्हाला नक्कीच जाणवेल. तर मित्रांनो कार्तिकी एकादशीपासून कार्तिकी पौर्णिमेपर्यंत तुम्ही हा उपाय अवश्य करून पहा. यामुळे आर्थिक अडचण तुमची कमी होईल आणि तुम्हाला धनलाभ नक्कीच होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *