महिला पायात जोडवी का घालतात? त्याची ‘ही’ कारणे माहिती आहेत का?

अध्यात्मिक वास्तूशास्त्र

मित्रांनो लग्न झाले की स्त्रीच्या शृंगार मध्ये भर पडते ती सौभाग्य अलंकाराची. मित्रांनो मंगळसूत्र, हिरवा चुडा, कपाळावर टिकली, पायात पैंजण आणि जोडवी हे सौभाग्य अलंकार स्त्रियांना आणखीनच सुंदर बनवत असतात. मित्रांनो आपल्या शास्त्रामध्ये या सौभाग्य अलंकाराला खूपच महत्त्व दिले गेलेले आहे. परंतु मित्रांनो आजकालच्या या फॅशनच्या युगामध्ये बऱ्याच स्त्रिया या सौभाग्य अलंकाराचा जास्त वापर करत नाहीत.

म्हणजेच आजकाल फॅशनचे मंगळसूत्र तसेच कपाळावर टिकली नसणे तसेच हातामध्ये हिरव्या बांगड्या न घालता साडीवर मॅचिंग होणाऱ्या बांगड्या घालणं आज काल फॅशनच बनले आहे. तसेच मित्रांनो आपल्या सौभाग्य अलंकारांमध्ये एक महत्त्वाचा अलंकार आहे तो म्हणजे जोडवी. आजकाल स्त्रिया या खूपच फॅशनच्या जोडवी घालतात.

मित्रांनो सौभाग्य अलंकारावरून स्त्रियांचे लग्न झालं आहे हे मात्र आपणा सर्वांनाच कळते. गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि पायाच्या बोटामध्ये जोडवी पाहिले की ते धारण करणारी महिला विवाहित असते हे सर्वांना कळून येते. त्यामुळे जोडवी घालणे ही लग्न झाल्याची निशाणी मानली जाते. आपण लहानपणापासून आपल्या आईला व आजूबाजूच्या काकूंना हे सर्व अलंकार घालताना पाहिले आहे. या सर्व सुवासिनींच्या निशाणी मानल्या जातात.

नववधूच्या अंगावरती मंगळसूत्र हा पहिला दागिना आणि त्यानंतर जो दागिना घातला जातो तो म्हणजेच पायातील जोडवी. आजकाल अनेक जणी फॅशन म्हणून सौभाग्यालंकार नाजूक का होईना आवर्जून वापरतात. लग्नावेळी स्त्रियांच्या पायाच्या बोटावर पहिला अलंकार चढते ते जोडवी.

लग्नामध्ये स्त्रियांच्या पायाच्या बोटांमध्ये घातली जाणारी जोडवी स्त्रियांसाठी खूप फायेदेशीर असते. तर मित्रांनो महिला पायात जोडवी का घालतात आणि त्याची नेमकी कारणे कोणती आहेत हेच आज आपण जाणून घेणार आहोत.

स्त्रिया लग्नानंतर पायांच्या बोटात जोडवी घालतात. कारण पायांच्या अंगठ्याशेजारील बोटांमध्ये जी नस असते, तिचा संबंध महिलेच्या गर्भाशयाला नियंत्रित करते आणि रक्तदाबही संतुलित ठेवते. त्याचबरोबर जोडवी घातल्याने महिलांना अनेक फायदे होतात.

मित्रांनो जोडवी घातल्याने शरीरातील जी प्रजनन क्षमता असते ती चांगली राहण्यास मदत होते. तसेच हृदयाची जी गती आहे ती गती नियंत्रित ठेवण्यासाठी देखील जोडवी खूपच फायदेशीर ठरते. आज-काल अनेक वेगवेगळ्या प्रकारचे रोग डोके वर काढताना दिसत आहेत. आशातच मित्रांनो थायरॉईडचा त्रास बऱ्याच जणांना जाणवतो आहे. तर मित्रांनो जोडवी घातल्याने थायरॉईडचा जो काही धोका असतो तो कमी होतो.

तसेच काही महिलांना मासिक पाळी मध्ये होणाऱ्या त्रासापासून देखील जोडवी फायदेशीर ठरते. म्हणजेच मासिक पाळी नियमित होते. जोडवीमुळे एक विशिष्ट दाब निर्माण होत असल्यामुळे गर्भाशयाला रक्तपुरवठा देखील व्यवस्थित होतो.

तसेच जोडवी घातल्यामुळे गर्भाचे संवेदनशीलता देखील वाढते. तसेच जोडवी घातल्यामुळे शरीरातील सर्व नसा आणि मासपेशी व्यवस्थित काम देखील करतात. दोन्ही पायांच्या बोटामध्ये जोडवी घातल्याने ऊर्जेचे प्रमाण हे व्यवस्थित राहण्यास मदत होते. तर मित्रांनो असे हे जोडवी घालण्याचे कितीतरी फायदे महिलांना होत असतात. त्यामुळे मित्रांनो प्रत्येक महिलांनी सौभाग्य अलंकारांमधील जोडवी अवश्य घालावी.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *