हरी ओम, ब्रह्म मुहूर्तावर डोळे उघडताच बोला हे शब्द चमत्कार होईल आणि मनातील मोठ्यात मोठी इच्छा शीघ्र गतीने पूर्ण होऊ लागेल. याशिवाय, अगदी त्याच दिवशी तुम्हाला तुमच्या इच्छापूर्तीचे संकेत मिळू लागतील. अंतरात्म्याचा आवाज येईल असे संकेत मिळतील की तुमची त्या परमात्म्याने ऐकलेली आहे आणि या इच्छांची पूर्तता लवकरच होणार आहे.
त्यामुळे ब्रह्म मुहूर्तावर आपण जे काही बोलतो जे मंत्र जप करत असतो. त्यांच अनंतपद फळ आपल्याला लाभाच्या स्वरूपात आपणास प्राप्त होतं. त्यामुळे पुढील चमत्कारिक उपाय तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने केल्यास त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तसेच यामध्ये जर तुम्ही हे 2 शब्द जर आपण हे ब्रह्म मुहूर्तावर बोलला तर आपल्या इच्छांची पूर्तता ही नक्की होईल.
तसेच शास्त्रानुसार, ब्रह्म मुहूर्त पहाटे 3.30 वाजेपासून ते सूर्योदयापर्यंत चालतो. तर यासाठी सकाळी झोपेतून उठताच ब्राह्ममुहूर्तावर झोपेतून डोळे उघडताच आपण उठून बसावं आणि आपली जी काही इच्छा आहे. ज्यामध्ये धन, दौलत, गाडी आणि बंगला, सोना-चांदी अशी कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय नक्कीच केला पाहिजे.
तर यावेळी आपण आपली इच्छा बोलायचे आहे जेणेकरून ती परमात्म्याला देवापर्यंत पोहोचेल आणि श्वास घेताना आणि श्वास सोडताना ही इच्छा आपल्याला बोलायचे आहे. ज्या शक्तीवर ही संपूर्ण दुनिया चालते. तसेच ज्या शक्तीवर हे शरीर चालते आहे ती शक्ती म्हणजे श्वास होय.
याच श्वासांवर आपण आपलं लक्ष पुरवता केंद्रित करून श्वास घेताना इच्छा बोलायचे आहे आणि श्वास सोडताना सुद्धा इच्छा बोलायचे आहे. विधी व्यवस्थित लक्षात घ्या, 10 मिनिटे सलग आपण ही क्रिया करणार आहोत. कारण शास्त्रानुसार ब्रह्म मुहूर्तावर जर आपण अशा प्रकारे आपली इच्छा बोललात तर ही इच्छा परमात्मा पर्यंत नक्की पोहोचते आणि या इच्छापूर्तीचे संकेत लगोलग या दिवशी मिळू लागतात.
तसेच विधी, नियम हे सांगण्याचं काम आम्ही करतो. मात्र त्याचा अंमल तुम्हालाच करायचा आहे. तुम्ही किती श्रद्धेने निष्ठेने आणि नियम पूर्वक या गोष्टी करता, यावर तुम्हाला मिळणाऱ्या फळ हे अवलंबून असतं. तसेच याशिवाय दुसरा उपाय देखील करू शकता. ज्यामध्ये तुम्हाला एका चमत्कारिक मंत्राचा जप तुमच्या घरातील महिला किंवा पुरुष तसेच लहान मुले कोणीही करू शकता.
मात्र हा उपाय तुम्हाला पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने तुम्हाला हा जप करायचा आहे. या सेवेसाठी तुम्हाला कोणत्याही दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस तुम्हाला आपले हात-पाय-तोंड स्वच्छ धुऊन पवित्र झाल्यावर, मग देवघरासमोर बसायचा आहे. मग त्यानंतर अगरबत्ती दिवा लावावा आणि सगळ्यात आधी आपले दोन्ही हात जोडून श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रार्थना करायची आहे.
यामध्ये स्वामींचा तारक मंत्र म्हणा. तसेच श्री व्यंकटेश स्तोत्र म्हणा. ही प्रार्थना आपल्याला कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी, बरकतीसाठी आणि आरोग्यासाठी याशिवाय अडचणी किंवा समस्या दूर करण्यासाठी करायची आहे. मग ही प्रार्थना करून झाल्यानंतर, तुम्हाला जितकी माळ शक्य होईल तितका हा मंत्र जप करायचा आहे.
हा मंत्र म्हणजे, ” श्री स्वामी समर्थांय नमः”, ” श्री स्वामी समर्थांय नमः” हा मंत्र आहे. हा श्री स्वामींचा अतिशय प्रभावी आणि खूप शक्तिशाली तसेच चमत्कारी असा मंत्र आहे. हा मंत्र तुम्हाला फक्त 108 वेळेस बोलायचा आहे. मात्र हा मंत्र जपाचे काही नियम आहेत. हा मंत्र तुम्हाला कमीतकमी अखंड 1 माळ करायचा आहे. त्यामुळे तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि मनोभावाने आणि विश्वासाने ही सेवा करावी.
नक्कीच तुम्हाला या सेवेची फलप्राप्ती होईल. मात्र हा उपाय तुम्ही पूर्ण विश्वासाने केला पाहिजे. श्री स्वामी समर्थ यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून, मनोभावाने हा मंत्र बोलायचा आहे. या उपायामुळे तुमच्या सर्व मनोकामना आणि अपूर्ण इच्छा पूर्ण होण्यास सुरुवात होईल. तुमच्या जीवनातील सर्व अडचणी आणि समस्या ते दूर करतील. भगवंताच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत हीच भगवंत चरणी प्रार्थना…
टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.