श्रावणातल्या प्रत्येक मंगळवारी नवविवाहित स्त्रिया करतात मंगळागौरीचं व्रत. पण हे व्रत कसं करावं? या व्रताच्या दिवशी उपवास करावा का? या व्रतासाठी काय काय गोष्टी आवश्यक आहेत? चला जाणून घेऊया..श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित स्त्रियांकडून मंगळागौरीचं व्रत केलं जातं. सुवासिनी स्त्रिया लग्नानंतर पाच वर्षांपर्यंत हे व्रत करतात.
नवीन लग्न झाल्यानंतर पहिल्या वर्षापासून पाच वर्षापर्यंत हे व्रत केले जात. वटसावित्री प्रमाणेच हे व्रत सौभाग्य दायक असून त्यायोगे पतीचे आयुष्य वाढावे अशी श्रद्धा आहे. हे व्रत पहिल्या वर्षी माहेरी आणि पुढची चार वर्षे सासरी करतात. मंगळागौरीची पूजा म्हणजे घराची पूजा पती-पत्नी दोघांमधील आत्यंतिक प्रेम आणि निष्ठा आदर्श म्हणून उमामहेश्वरकडे पाहिले जातात आणि त्यांची कृपा संपादन करण्यासाठी पूजा केली जाते.
मंगळागौरीची पूजा नक्की कशी करावी? मंगळागौरीच्या व्रतात भगवान शिव आणि गणपती यांच्यासह गौरीची पूजा करतात. पूजासाठी चौरंग बांधतात. त्याला केळीचे सुंठ बांधून ते फुलांनी सजवतात. त्याभोवती सुंदर रांगोळी काढतात. पूजेला लागणारे साहित्य तयार करून ठेवतात. या पूजेत 16 या संख्येला विशेष महत्त्व आहे. 16 प्रकारची पत्री, 16 प्रकारची फुलं आणि पुरणाचे 16 दिवे यासह गौरीची पूजा केली जाते.
तसाच गौरीसाठी पुरणाचे अलंकारी तयार केले जातात. त्यात दागिने, हार, गजरा आणि फनी असे प्रकार पूर्ण पासून बनवले जातात आणि पूजा करते वेळेस गौरीला अर्पण केले जातात.
या पूजेचा पूजा पत्रीपूजा, पुष्प पूजा अशा पूजा अंगभूत असतात. मंगळागौरीचं व्रत करणार्या मुलींना नाहून माखून पुजेला बसातात.
यथासांग पूजा केली जाते. आरती झाल्यावर कहानी वाचन केले जातात. आपल्या मातेस आणि माते समान असणाऱ्या उपस्थित सर्व महिलांना नमस्कार केला जातो. फराळ दिला जातो, सुवासिनींना हळदी कुंकु काजळ, करंडा, पाणी, तांदूळ, खण, नारळ, सुपारी आणि दक्षिणा यांनी युक्त असलेला ताठ दिलं जातं. पुरोहितांना सुद्धा दक्षिणा दिली जाते.
या व्रतामध्ये मौनाला खुप महत्व आहे. मौन पाळून भक्तिपूर्वक देवीला शरण जावा हा त्यामागचा हेतू आहे.पूजा झाल्यावर घरातील सर्व लोक आणि नातलक मिळून स्नेहभोजन करतात. भोजन करताना मौन पाळावे असे म्हणतात. त्यावेळी नवीन लग्न झालेल्या मुलींना आणि पूजेला बसणाऱ्या मुलींना दक्षिणा दिली जाते. हे सर्व होईपर्यंत मौन पाळायचा असतो हे लक्षात ठेवा.
गप्पा गोष्टीमध्ये चित्त विचलित होऊ नये, पूजा प्रति समर्पण भाव असावा यासाठी मौनाचे महत्त्व सांगितले आहे. रात्रीच्या वेळी 16 वातीनी मंगल आरती केली जाते. शिव गौरीच्या गुणगौरवाची, गीत, फुगड्या, गाणी आपल्या पतीचे नाव घेणं असे अनेक कार्यक्रम करून हसत खेळत मंगळागौर जागवली जाते. दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा नंतर गौरीचे विसर्जन केले जात.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.