मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण हे स्वामी समर्थांचे भक्त सेवेकरी आहेत. अगदी आपण मनोभावे स्वामी समर्थांची सेवा करीत असतो. अनेक मंत्रांचा जप देखील करीत असतो. तर आता मार्गशीर्ष महिना सुरु होणार आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही जर स्वामी समर्थांची ही एक अतिशय चमत्कारिक सेवा जर केला तर यामुळे तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहेत.
जे काही दुःख असेल, संकटे असतील आणि अडचणी असतील ते सर्व काही दूर होऊन तुमच्या जीवनामध्ये सुख-समृद्धी नांदेल. स्वामी समर्थांची ही 11 दिवसांची सेवा असणार आहे आणि ही सेवा तुम्ही अगदी मनोभावे, श्रद्धेने करायची आहे. तर ही सेवा करीत असताना तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करायची आहे. एकही दिवस न चुकता न थांबता तुम्ही संपूर्ण अकरा दिवस ही सेवा करायची आहे.
मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्याही दिवसांपासून तुम्ही ही सेवा सुरू करू शकता. परंतु सलग अकरा दिवस ही सेवा करायची आहे. मित्रांनो आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मी मातेचे व्रत करीत असतो आणि पूजा देखील मांडत असतो आणि लक्ष्मी मातेकडे सदैव आपल्या घरात वास करावा अशी प्रार्थना देखील करीत असतो.
तर स्वामी समर्थांची ही अकरा दिवसांची सेवा करीत असताना तुम्ही सगळ्यात आधी देवघरासमोर बसून दिवा अगरबत्ती लावायची आहे आणि सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे. दारिद्र्य, दुःख दूर व्हावेत आणि आपल्या घरामध्ये भरभराट व्हावी तसेच मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात अशी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला जपमाळ घेऊन एक माळ महालक्ष्मी चा मंत्र जप करायचा आहे.
श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र जप तुमचा झाल्यानंतर तुम्हाला एक माळ स्वामींच्या मंत्रजप करायचा आहे तो म्हणजे (श्री स्वामी समर्थ)
आणि त्यानंतर तुम्हाला एक माळ श्रीविष्णू गायत्री मंत्राचा जप करायचा. हा मंत्र काही असा आहे, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात: हा श्रीविष्णू गायत्री मंत्र आहे. याचा जप सुद्धा तुम्हाला एक माळ करायचा आहे. पहिले श्री महालक्ष्मी नमः एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्रजप एक माळ आणि नंतर ओम नारायणाय विदमहे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात म्हणजे श्री विष्णू गायत्रीचा हा मंत्र एक माळ करायचा आहे.
अगदी सोपी चमत्कारी परंतु अतिशय शक्तिशाली ही सेवा आहे. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि पहिल्या दिवशी तुम्ही सेवा सुरू करण्याआधी जे मागाल ते या अकरा दिवसात तुम्हाला मिळेल. तुमच्या इच्छा नक्की पूर्ण होतील. सुख समृद्धीने घर भरेल. मित्रांनो फक्त विश्वासाने मनोभावे, श्रद्धेने ही सेवा करा.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.