सर्व प्रकारच्या अडचणी दुर करण्यासाठी स्वामीसमोर करा हा एक चमत्कारिक उपाय..

माहिती अध्यात्मिक राशिभविष्य

आयुष्यात अनेक वेळा आपल्या जीवनात खुप अडचणी, दु:ख, भिती, चिंता, काळजी, नकारात्मकता नेहमी आपल्याला चिकटुन असते, काही काही वेळा अडचणीचे लवकर निरसन होत नाही. अशावेळी सकारात्मक व्हावे, नामस्मरणाची शक्ती अनुभवावी. श्री स्वामी समर्थांचा जप आणि सेवा केल्याने लाभ मिळतात. प्रत्येक सेवेकऱ्याला आपला एक अनुभव आलेला असतो.

तर आपल्या अनेक अडचणी लवकर दूर व्हाव्या याकरीता हे उपाय करून पाहा.. हा चमत्कारिक उपाय म्हणजे, स्वामीच्या समोर बसा आणि फक्त प्रार्थना बोला. तुम्ही जर स्वामींचे भक्त, स्वामींचे सेवेकरी आहेत तर नक्की ही प्रार्थना संपूर्ण ऐका. ही प्रार्थना काही अशी आहे आणि ही प्रार्थना तुम्हाला कोण सकाळी, संध्याकाळी किंवा दुपारी केव्हाही तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल.

तेव्हा आपल्या स्वामींच्या मूर्ती समोर, आपल्या स्वामींचा फोटो समोर बसायचं आहे. देवघरासमोर बसायचं आहे आणि आपले हात जोडून तुम्हाला ही प्रार्थना बोलायचे आहे. ही प्रार्थना काही अशी आहे की, “ओम नमो श्री स्वामी समर्थांय नमः”, हे स्वामी समर्था, मी तुमचा अतिशय लहान सेवेकरी आहे.,. जे जमेल,तसे जमेल तशी सेवा आम्ही मनापासून करत असतो.

तुम्ही माझे आधार आहात, तुम्ही माझी आई, माझी पिता आहात, माझ्याकडून कधीही काही चुकले असेल तर मला क्षमा करा. यावर तुमची कृपा असू द्या. मला दुसरे काही नको फक्त तुमची साथ हवी आहे. जीवनातल्या संकटांना लढण्याची शक्ती हवी आहे आणि तुम्ही जर माझ्या सोबत असाल तर मी कोणतेही संकट पार करेल.

फक्त तुमचा हात माझ्या डोक्यावर नेहमी असू द्या,. “ओम नमो श्री स्वामी समर्थांय नमः” तर ही प्रार्थना मनोभावे करायची आहे. दररोज घरात श्री सूक्त पठन केले असता, त्या घरात धन-धान्याची कमतरता भासत नाही. लाल रंगाच्या रिबिनमधे तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेश द्वारावर बांधल्यास घरात सुखशांति व धनाची वाढ होते. प्रत्येक गुरुवारी तूळशीस दूध अर्पण केल्यास धनलाभ होतो.

नोकरी, व्यवसायातील अडचणींसाठी श्री गुरूचरीत्राचा दहावा अध्याय दररोज वाचावा. कोर्ट कचेरी यांचा फेरा बऱ्याचवेळा त्रासदायक यातना काहींना देत असतो अशावेळी श्री नवनाथ ग्रंथाचा तीसरा व श्री गुरूचरीत्राचा चौदावा अध्याय रोज दोन वेळेस वाचावा. ज्या घरात एक तरी भक्तीवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते

त्या घरातील सर्व कुटूंबीय केवळ त्याच्यामुळे तरून जातात व ती व्यक्ती गेली की वास्तुदोष किंवा इतर अडचणींमुळे होणारे त्रास वाढून कुटूंबास सतत संकटांना सामोरे जावे लागते. शक्य असल्यास श्री स्वामी समर्थांचा जप किंवा तारक मंत्र नियमीत बोला, किंवा रेकॉर्डींग सुरू ठेवा. स्वयंपाक करतेवेळी किंवा इतर महत्वाच्या कामांवेळी सतत नामस्मरण करावे.

मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करतो. उच्चार करण्याआधी विचार करतो. म्हणूनच तो मानवी प्रगतीस खरा करणीभूत होतो. विचार हा सुविचार होण्याला ध्यान-चिंतनाची आवश्यकता फार असते, म्हणून ध्यानधारणा मननचिंतन याला फारच महत्त्व आहे. अनेकवेळा कामाचा ताण वाढल्यामुळे किंवा इतर अडचणींमुळे रात्री शांत झोप लागत नाही. अशावेळी आपल्या इष्टदेवतेचे किंवा श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करावे. यासोबतच ज्ञानेश्वरी या ग्रंथातील 12 व्या अध्यायातील पहिल्या 16 ओळी वाचाव्या. शांत झोप लागेल.

टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *