हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला अत्यंत महत्त्वाचे शास्त्र मानले जाते. कारण त्यानुसारच आपण आपले घर योग्य प्रकारे बांधू शकतो आणि जीवन सुखासमाधानाने जगू शकतो. वास्तू शास्त्रानुसार, आपल्या स्वयंपाक घरातील स्वयंपाक करण्याची भांडी म्हणजे कढई आणि तवा हे राहूचे प्रतीक मानले जातात.
तवा ही स्वयंपाक घरातील एक अत्यंत महत्वाची वस्तू आहे.कारण तव्याशिवाय आपण चपात्या किंवा भाकरी भाजू शकत नाही, थोडक्यात तव्याशिवाय किचन हे परिपुर्ण बनत नाही. तर तुम्हाला स्वयंपाक करतांना फक्त हा 1 उपाय करायचा आहे. जर रोज स्वयंपाक करताना महिलांनी शेगडीच्या बाजूला 1 वस्तू ठेवल्यास तुमच्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मकता दूर होईल आणि आपलं आरोग्य खूप चांगल्या पद्धतीने राहील.
तसेच घरात सुख-समृद्धी, पैसाअडका विनाकारण खर्च होणार नाही. आपण स्वयंपाक करताना पण कशावरही स्वयंपाक करत असाल, तर मग तुमच्याकडे गॅस असेल किंवा शेगडी असेल किंवा अन्य कोणतेही साधन असेल. तर तुम्ही त्या साधनावर स्वयंपाक करत असाल त्याच्या बाजूला तुम्ही एक वस्तू ठेवयची आहे.
रोज सकाळचा स्वयंपाक करताना आणि संध्याकाळचा स्वयंपाक करताना ठेवायचे आहे. आपण जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा नकारात्मक आणि वाईट शक्ती आपल्या घरात असते. खास करून नकारात्मकता आणि स्वयंपाक करताना जी स्वयंपाक करणारी महिला असते किंवा पुरुष असतो तो जर विचार करत असेल नकारात्मक विचार करत असेल तर त्यांची ऊर्जा सुद्धा त्यांच्या गुण स्वयंपाकामध्ये उतरत असते.
आपल्याला आपल्या घरातील नकारात्मक पिडा सुद्धा त्या स्वयंपाकात जात असतात आणि खाणाऱ्यांची मनसुद्धा नकारात्मक होत असतात व आरोग्यावर परिणाम होतो. दोष पीडा यांनी आपण त्रस्त होतो, तर त्यामुळे स्वयंपाक करताना आपण बरेच गोष्टीकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. असं सांगितलं जातं की, स्वयंपाक करताना स्वामींचे, भगवंताचे देवाचं नामस्मरण करावं.
यांनी महिलांनी खास करून हा उपाय करावा. त्यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे. तो म्हणजे स्वयंपाक करताना काही साधनावर तुम्ही स्वयंपाक करत असाल गॅस, इलेक्ट्रिक शेगडी किंवा अन्य कोणतेही साधन त्यांच्या बाजूला तुम्हाला एक पाण्याचा ग्लास भरून ठेव किंवा पाण्याने भरलेली वाटी भरून ठेवायचे आहे.
एका वाटीमध्ये किंवा ग्लासामध्ये शुद्ध पाणी घ्यायचा आहे आणि गॅसच्या कोणत्याही बाजूला डाव्या-उजव्या वर-खाली कुठेही जागा असेल तिथे ठेवून द्या आणि स्वयंपाक, जेवण करायला सुरुवात करा. मग स्वयंपाक झाल्यानंतर ते पाणी आपल्या घराच्या बाहेर टाकून द्या. तसेच संध्याकाळी, सकाळी किंवा तुम्ही केव्हाही स्वयंपाक करत असताना अशा प्रकारे तुम्हाला करायचा आहे.
तुम्ही ऐकले असेल किंवा पूर्वी दळण करताना आधीची लोक पाण्याचा ग्लास किंवा वाटी भरून ठेवायची. तसेच रोज आपल्याला स्वयंपाक करताना सकाळ-संध्याकाळी त्या स्वयंपाकावर वाईट प्रभाव पडत आहेत व कोणती शक्ती वाईट शक्ती त्या स्वयंपाकावर यायला नको म्हणून आपण स्वयंपाक करताना पाण्याचा ग्लास भरून गॅस बाजूला ठेवायचा आहे. तर हा उपाय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा..
टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.