श्री स्वामी समर्थ, सुवासिनी महिलांनी नवरात्रीमध्ये कुल देवीसमोर आपली इच्छा वस्तू ठेवावी. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे, फक्त सुवासिनी महिलांनी हा चमत्कारिक उपाय करायचा आहे. ही वस्तू आपल्याच कुलदेवी समोर ठेवायचे आहे. तुम्हाला माहीतच आहे की, नवरात्र सुरू झालेली आहे नवरात्रीचे 9 दिवस खूप महत्त्वाचे असतात.
प्रत्येक देवीसाठी हे दिवस अत्यंत मान्यतेची, अत्यंत महत्त्वपूर्ण असे हे दिवस मानले जातात. तर या नवरात्रीमध्ये अंबा मातेचे 9 दुर्गेचे कुलदेवीचे पूजन केले जाते, म्हणून घरातल्या सुवासिनी महिलांनी आपल्या घरासाठी हा उपाय करायचा आहे. दरम्यान, आपल्या घरामध्ये ही वस्तू ठेवायची आहे. घरामध्ये कुलदेवीची टाक असेल किंवा कुलदेवीची मूर्ती असेल तर कुलदेवीचा फोटो असेल, तर त्यासमोर ही वस्तू ठेवायची आहे.
तसेच जर वरीलपैकी एकही गोष्ट नसल्यास तुम्ही फक्त मनातल्या मनात स्मरण करायचं आणि तुमच्या कुलदेवी कुलदेवीचे नाव घ्यायचं आणि ही वस्तू आपल्या देवघरात ठेवायची आहे. सुहासिनी महिलांनी जी वस्तू ठेवायचे सौभाग्याची वस्तू आहे. जी लक्ष्मी मातेला आणि कुलदेवीला अत्यंत प्रिय आहे ती म्हणजे लाल कुंकू होय. दरम्यान, तुम्हाला लाल कुंकवाची डबी आणायची आहे.
आणल्यानंतर तो कुंकू वाटीत काढून तुम्हाला कोणी कुलदेवी समोर ठेवायचा आहे. कुंकू ठेवल्यानं तुम्हाला हात जोडून तुमच्या संसारासाठी, सुखासाठी, सौभाग्यासाठी, शांततेसाठी, आरोग्यासाठी आणि धनसंपदेसाठी, समृद्धीसाठी कुलदेवीसाठी प्रार्थना करायची आहे. तुमच्यावर पतीवर तुमच्या परिवारावर कोणते संकट जायला नको यासाठी प्रार्थना करायची आहे आणि हा उपाय म्हणजे ही वस्तू तुम्ही नवरात्रीच्या दिवशी घेऊ शकता.
अगदी ही वस्तू दसऱ्याच्या दिवसापर्यंत तुम्हाला ठेवायची आहे. म्हणजेच कुंकवाची डबी ठेवायची आणि दसऱ्याच्या दिवशी कुंकू असेल किंवा कुंकवाची डबी असेल तिथून उचलून घ्यायचे आहे आणि ते कुंकू तुम्ही देवीचा आशीर्वाद म्हणून तो जपून आपल्या जवळ ठेवावा किंवा महिला जर कुंकू लावत असतील तर तो कुंकू जपून वापरू शकतात किंवा तो कुंकू जपून आपल्या तिजोरीत कपाटात ठेवून जायचं आहे. याशिवाय, कुठेही महत्त्वच्या कामाला जातांना या कुंकवाचा टिळा कपाळास लावून गेल्यास नक्की यश मिळेल. असा हा उपाय सुहासिनी महिलांनी नवरात्रीमध्ये करायचा आहे.
अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.