नववर्षाची मंगलमय सुरुवात करायची असेल तर वापर करा या शुभ प्रतीकांचा!

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो, गुढीपाडव्याला हिंदू नवीन वर्षाची सुरुवात होत असते. या दिवशी सर्वांच्या दारापुढे गुढी उभारली जाते तसेच कडुलिंबाच्या पानांचे सेवन देखील केले जाते. प्रत्येकाला येणारे नवीन वर्ष हे सुखा समाधानाचे जावे असे वाटतच असते. या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्या दिवशी प्रत्येक जण हा आनंदी राहण्याचा प्रयत्न करत असतो.

जेणेकरून आपल्या या नवीन वर्षाची सुरुवात आनंदाने केली तर वर्षभर आपल्या जीवनामध्ये आनंदच राहील. तर तुम्हाला देखील नवीन वर्षाची मंगलमय सुरुवात करायची असेल तर तुम्ही शुभ प्रतिकांचा वापर या गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे. तर ही प्रतीके नेमकी कोणती आहेत चला तर मग जाणून घेऊयात.

पुजेमध्ये तसेच धार्मिक विधीमध्ये देखील नारळाचा वापर केला जातो. यालाच आपण श्रीफळ असे म्हणतो. तर श्रीफळात त्रिदेव वास करत असतात अशी श्रद्धा आहे. म्हणून नवीन वर्षाला देवपूजेमध्ये श्रीफळ ठेवून येणारे नवीन वर्ष हे समृद्धीचे आणि आरोग्याचे जावे अशी प्रार्थना तुम्ही करायची आहे.

तसेच सायंकाळी तुम्ही गरजू लोकांना ते श्रीफळ दान करायचे आहे. म्हणजेच आपण देवपूजेमध्ये जे श्रीफळ ठेवलेले आहे हे श्रीफळ गरजू लोकांना दान करायचे आहे तेही सायंकाळच्या वेळेस. तसेच स्वस्तिक हे गणेशाचे स्थान मानले जाते. कोणत्याही कार्याची सुरुवात करताना आपण गणेश पूजा करतो आणि त्यांना विराजमान होण्यासाठी स्वस्तिक देखील काढित असतो.

तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी देवघरात रांगोळी स्वरूपात किंवा एखाद्या कागदावर किंवा तुम्ही दारावर गंधाच्या बोटाने स्वस्तिक काढायचे आहे आणि या गणरायाच्या आशीर्वादाने नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे. मोर हे देखील चैतन्याचे प्रतीक मानले गेलेले आहे. घरामध्ये उत्साह, सकारात्मक वातावरण राहण्यासाठी बरेच जण घरामध्ये मोरपंख लावत असतात.

श्रीकृष्णाने आपल्या शिरपेचात मोरपीस खोचल्यामुळे याचे महत्त्व अधिकच वाढले. त्यामुळेच घरात मोरपीस लावल्याने भगवान कृष्णांची कृपादृष्टी आपल्या घरावर राहते. त्यामुळे तुम्ही आपल्या घरामध्ये या नवीन वर्षाच्या सुरुवातीला मोरपीस लावायचे आहे. जेणेकरून आपल्या घरातील वातावरण कायमच आनंदी राहील आणि संपूर्ण वर्ष हे आपणाला आनंदी जाईल.

त्याचप्रमाणे हत्ती हे देखील वैभवाचे प्रतीक मानले गेलेले आहे. वैभव लक्ष्मीचे वाहन हत्ती आहे. त्यामुळे लक्ष्मी लाभ पाचरण करण्यासाठी नवीन वर्षाला घरात चांदीचा किंवा लाकडाचा शोभेचा हत्ती ठेवायचा आहे किंवा गणेश मूर्ती किंवा प्रतिमा योग्य जागी लावायची आहे. यामुळे आपल्या घरामध्ये भरभराट होईल.

जर तुम्हाला घरामध्ये शांतता, समृद्धी, मांगल्य नांदावे असे जर वाटत असेल तर या नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही कासवाचे प्रतीक आपल्या तिजोरीत ठेवायचे आहे. यामुळे आपल्या घरामध्ये धन संपत्तीत वाढ होत राहते. घरामध्ये सौख्य राहते. तसेच आरोग्य देखील सुधारते आणि आपल्या घरातील लोकांवर सकारात्मक प्रभाव होतो.

तर मित्रांनो अशा या शुभ प्रतिमा म्हणजेच ही शुभ प्रतीके तुम्ही आपल्या घरात या नवीन वर्षाच्या सुरुवातीला याचा वापर अवश्य करायचा आहे. जेणेकरून आपणाला येणारे हे नवीन वर्ष सुखाचे, समाधानाचे आणि भरभराटीचे जाईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *