प्रसाद नेहमी उजव्या हातात का घ्यावा…?

अध्यात्मिक माहिती

हिंदू धर्म आणि संस्कृती देवाला अर्पण करणं प्रसाद वाटप करणे पूजेचा अविभाज्य भागच मानला जातो. हिंदूधर्मीय घरात कोणतीही धार्मिक कार्य असेल मग अगदी पूजा, आरती झाली की प्रसाद उजव्या हातात घ्यावा, अशी सूचना घरातल्या लहान मुलांना हमखास ऐकायला मिळते. कारण लहान मुलं सहज शक्य होईल तो हात पुढे करतात.

मात्र, प्रसाद कायम उजव्या हातात घ्यावा अशी मान्यता आहे आणि याला विशेष महत्त्व सुद्धा दिला गेला आहे. पण असं का? यामागचं कारण काय आहे? ते बहुतेक लोकांना माहीत नसते. हेच आपण जाणून घेणार आहोत की, प्रसाद उजव्या हातात का घ्यावा?

मंदिर असू द्या किंवा घर हिंदू धर्म संस्कृतीनुसार देवाची पूजा किंवा आरती झाल्यावर प्रसाद वाटला जातो. हा प्रसाद म्हणजे ईश्वराची कृपाच मानली जाते. प्रसाद घेण्याची एक विशिष्ट पद्धत असते. प्रसाद नेहमी उजव्या हातानेच घेतला जातो. उजव्या हाताखाली डावा हात धरला जातो. डाव्या हाताने प्रसाद घेणं ही खूप अशुभ मानलं जातं.

पण बऱ्याच लोकांना ही अंधश्रद्धा वाटते. आपल्या शास्त्राचे ज्ञान असल्याने त्यांना असे वाटत असतं. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात उजव्या हाताने केल्याने सकारात्मक परिणाम होतात अशी हिंदू धर्मात मान्यता आहे. त्यामुळे धार्मिक कार्य करताना यज्ञ दान या सगळ्या गोष्टी करताना उजव्या हातानेच करतात.

हवन करताना आणि यज्ञ नारायण भगवंताना आहुती देतांना उजव्या हाताचा वापर असतो. उजवा हात आज सकारात्मक ऊर्जा देणारा हात असतो, त्यामुळे प्रसाद हा नेहमी उजव्या हाताने घेतला पाहिजे. हिंदू परंपरेनुसार प्रसाद म्हणजे भगवंत आशीर्वाद होय. त्यामुळे आपल्या पूर्वजांनी ही प्रथा रूढ केली आहे.

शिवाय डाव्या हाताचा वापर ही शारीरिक सूचीसाठी करण्यात येत असल्याने प्रसादाचे पावित्र्य राखण्यासाठी डाव्या हाताचा वापर न करणे चांगले समजले जाते. म्हणून आपण ऐकत आलो आहोत की प्रसाद हा उजव्या हातात घेतला पाहिजे. हिंदू धर्मग्रंथांमध्ये काही प्रकारचे विधी करताना डाव्या हाताचा वापर करणे निषिद्ध आहे. ती खूप अशुभ मानले जाते, त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की प्रसाद हा उजव्या हातात यामुळे घेतला जातो..

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *