वर्षातून किती वेळेस देवीची ओटी भरावी? ओटी कोणी भरावी ?

अध्यात्मिक

मित्रांनो वर्षातून कितीदा कुलदेवीची किंवा अन्य कोणत्याही देवीची ओटी कशी आणि कोणत्या प्रकारे भरावी. कारण प्रत्येक वर्षी आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरतच असतो किती वेळा बोलायची असते. हे आपल्याला माहित नाही. म्हणूनच याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखामध्ये घेणार आहोत. ज्या पद्धतीने देवीचे दर्शन करणे महत्त्वाचे आहे.

त्याच पद्धतीने देवीची ओटी भरणे देखील महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येकाने कुलदेवीची ओटी भरायलाच पाहिजे. मात्र असा प्रश्न पडतो. की देवीची ओटी केव्हा व कशी आणि कोणत्या ठिकाणी भरावी देवीची ओटी आपल्या देवीचे जे स्थान आहे. त्यामुळे स्थानावर जाऊन भरणे खूप चांगले असते. मात्र ज्यांना मूळ स्थानावर जाऊन ओटी भरणे शक्य नाही, त्यांनी घरी देखील देवीची ओटी भरू शकतात.

ज्याही वेळी आपण देवीच्या दर्शनाला मूळ स्थानावर जाते. त्यावेळी त्या ठिकाणी ओटी भरायचीच आहे. मूळस्थानावर जर जाणे शक्य नसेल नसेल तर तुम्ही घरीच देवीची ओटी भरू शकता. जर तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा फोटो किंवा कुलदेवीची मूर्ती असेल तर फोटो समोर किंवा मूर्ती समोर तुम्ही कुलदेवीची ओटी भरू शकता.

जर आपल्या घरामध्ये कुलदेवीची मूर्ती किंवा फोटो नसेल तर त्यांचा फोटो किंवा मूर्ती घरामध्ये ठेवायला पाहिजे. जर आपल्या घरामध्ये कोणत्याही देवीचा फोटो नसेल तर प्रत्येकाच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा फोटो असतो लक्ष्मी मातेची ओटी भरली तरी चालते. देवींची ओटी देवींच्या खास वारादिवशी तुम्ही भरू शकता. जसे की वर्षातून दोन नवरात्री येतात. एक म्हणजे चैत्र नवरात्रि.

दुसरी म्हणजे शारदीय नवरात्री अशाप्रकारे दोन वर्षातून नवरात्री येतात. या नवरात्रीमध्ये नऊ दिवस येत असतात या नऊ दिवसांपैकी कोणत्याही एका वारी तुम्ही देवीची ओटी भरू शकता. आपल्या घरामध्ये कोणतीही शुभ गोष्ट घडत असेल शुभ कार्य घडत असेल तर त्यावेळी देखील तुम्ही देवीची ओटी भरू शकता. दुधामध्ये एखादे लग्नकार्य असेल तर देवीला आमंत्रण देऊन घरी बोलवून देवीची ओटी भरता येते.

दिवाळी असेल किंवा इतर कोणतेही सणवार असतील, तर त्या वारी देखील तुम्ही देवीची ओटी भरू शकता. आपल्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण झाल्यानंतर देखील सेमी देवीची ओटी भरू शकता. जसे की, नोकरी लागणे, घर बांधून होणे, व्यवसायात, धंद्यामध्ये बरकत होणे, वंश वाढीस लागणे. अशा कोणत्याही मनातली इच्छा असते. त्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही देवीची ओटी भरू शकता.

देवीची ओटी भरण्यासाठी साडी ब्लाउज पीस तांदूळ किंवा गहू कोणतेही एक घेतले तरी चालते. हे सर्व देवी समोर ठेवून ज्या पद्धतीने आपण इतर स्त्रियांची ओटी भरतो. त्या पद्धतीने देवीची ओटी देखील भरायची आहे. ज्या ही स्त्रीने ही देवीची ओटी भरलेली आहे. त्या सगळ्या वस्तू वापरायच्या असतात देवीची ओटी कोणी भरावी. तर देवीची ओटी विवाहित स्त्रियांनी भरायची आहे इतर कुणीही ओटी भरायचे नाही.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्तापर्यंत पेज लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *