मुलीचे लग्न ठरले की मुली कडील लोकांची तयारी सुरू होते ती रुखवत बनवण्याची. पण या रुखवतामध्ये एक गोष्ट तुम्हाला नक्की आणि नक्की द्यायची आहे त्याचा परिणाम मुलीच्या संसारिक जीवनावर सकारात्मक होणार आहे. कोणती आहे ती गोष्ट चला जाणून घेऊया.
मंडळी मुलीचं लग्न ठरलं की मुलीकडच्यांची गडबड होते. काय काय करायचं, काय काय नाही करायचं याची यादी सुरू होते. रुखवत हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. रुखवतामध्ये आईला असं वाटतं मुलीला काय द्यावं आणि काय नाही. मग विविध कलाकुसरीच्या वस्तू बनवल्या जातात, विविध गोष्टी बाजारातून आणल्या जातात. काही सजावटीच्या, काही उपयोगाच्या अशा मोठ्या सामानाची यादी तयार होते आणि हळूहळू रुकवत तयार होऊ लागतो.
मावशी काहीतरी घेऊन येते, आत्या काहीतरी घेऊन येते, मामी काहीतरी घेऊन येते असं सगळ्यांचं मिळून छानस रुखवत तयार होतं. आणि मग कुणाचं रूखवत भारी होतं याची चर्चा सुद्धा हे रुखवत बनवत असताना महिला मंडळींमध्ये होताना दिसते. पण या सगळ्यांमध्ये तुम्हाला माहितीये का की एक गोष्ट अशी आहे जी तुम्ही तुमच्या मुलीला रुखवतात नक्की नक्की द्या.
त्याचा परिणाम काय होणार आहे ती वस्तू जर तुम्ही तुमच्या मुलीला रुखवतात दिली तर ती तिच्या घरी लक्ष्मी घेऊन जाते आहे असा त्याचा अर्थ होणार आहे आणि अर्थात ती गृहलक्ष्मी बनून दुसऱ्याच्या घरी जाते आहे. ती वैभव आणि संपन्नता सासरी घेऊन जाणार आहे. तिच्या पावलांनी लक्ष्मी त्यांच्या घरात प्रवेश करणार आहे.
त्यामुळे तुमच्या मुलीचा संसार सुखाचा आणि समाधानाचा व्हायला मदतच होणार आहे. पण ती गोष्ट काय आहे हे आपण पाहूया.
तुम्हाला मुली बरोबर द्यायची आहे कास्याची वाटी. आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन? नवीन नाही हे जुनेच आहे. कास्य हा एक धातू आहे आणि या धातूची वाटी किंवा थाळी पूर्वी प्रत्येकाच्या घरी असे.
हातपाय घासण्यासाठी उपयुक्त अशा या वतीने शरीरातली उष्णताही कमी होत असे. सवाष्णीला मुद्दाम कास्याच्या थाळीत जेवायला वाढलं जात असे. हातातून ते पडलं तर फुटत त्यामुळे जपून वापराव. रुखवतावर कास्याची एक तरी वाटी जरूर ठेवावी. लक्ष्मी सासरी घेऊन जा असा मुलीला आशीर्वाद देतात.
महर्षी व्यासांनी कास्याचे पात्र देण्याचे कारण सुद्धा सांगितले आहे. की कास्यपात्रामध्ये भोजन केले असता भोजन करणाऱ्याचे आयुष्य, बुद्धी आणि बल वृद्धिंगत होते. त्यामुळे तुम्हाला कास्याची थाळी देणे शक्य असेल तर तुम्ही ती सुद्धा देऊ शकता. पण ती देणं शक्य नसेल तर कमीत कमी एक छोटीशी वाटी तरी द्या.
हातून काही पातक घडली असतील तरी ते सुद्धा कास्य पात्राच्या दानाने ती नाहीशी होतात असं सुद्धा म्हटलं जातं. त्यामुळे तुमच्या घरात जर कुणाचं लग्न ठरलं असेल आणि रुखवताची तुम्ही तयारी करत असाल किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये कुणाचं लग्न ठरलंय आणि रुखवत बनवला जात आहे.
तर त्यांना आवर्जून सांगा की कास्याची एक तरी छोटीशी वाटी आवर्जून रुखवतावर ठेवा. बरं रुखवतावर ही वाटी दिली आणि काम झालं असं नाही तर तुमच्या मुलीला त्या वाटीचं त्या धातूचं महत्त्वही समजून सांगा, की जेणेकरून ती तिच्या सासरी गेल्यावर त्या वाटीचा योग्य तो उपयोग करेल किंवा त्या ताटलीचा योग्य तो उपयोग करेल.
आणि तिच्याही जीवनात सुख, समाधान आणि शांती येईल.bमित्रांनो आपल्या प्रत्येक परंपरेमागे काही ना काही तरी कारण होतं फक्त ते शोधण्याची आपल्याला गरज आहे. मग बघाच आपल्याच परंपरा आपल्याला किती मौल्यवान वाटायला लागतील ते.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.