मित्रांनो, प्रत्येकालाच आपल्या घरामध्ये पैशाची कमतरता भासू नये तसेच घरामध्ये सुख समृद्धी नांदावी असे वाटतच असते. मग यासाठी आपण अनेक व्रत, उपवास करीत असतो आणि पूजा देखील करीत असतो. तरी देखील काही वेळेस माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत नाही म्हणजेच आपल्या घरामध्ये काही ना काही गोष्टीवरून सतत भांडण तंटे वादविवाद होत राहतात.
म्हणजेच माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते. तर आज मी तुम्हाला अशी काही कामे सांगणार आहे ही कामे तुम्ही जर रात्री झोपण्यापूर्वी केली तर माता लक्ष्मी आपल्यावर नक्कीच प्रसन्न होईल. आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. तर ही कामे नेमकी कोणती आहेत जी आपणाला रात्री झोपण्यापूर्वी करायची आहेत चला तर जाणून घेऊयात.
आपल्या शास्त्रामध्ये आपल्याला अनेक गोष्टींची माहिती मिळते. तर बरेच जण हे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी मंत्र जप करीत राहतात. तसेच अनेक उपाय देखील करीत असतात. तर माता लक्ष्मीला जर प्रसन्न करायचे असेल तर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी ही कामे अवश्य करायची आहेत.
तर रात्रीच्या वेळी माता लक्ष्मीचा वास असतो. तर रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही आपले घराचे जे मुख्य द्वार असते ते द्वार साफ करायचे आहे. म्हणजेच आपल्या घरात कोणत्याही प्रकारची अस्वच्छता ठेवायची नाही. तसेच रात्री झोपण्यापूर्वी देवघरांमध्ये अंधार ठेवायचा नाही. तुम्ही देवघरांमध्ये एखादा छोटासा बल्ब किंवा तुपाचा दिवा देखील तुम्ही लावू शकता.
कारण माता लक्ष्मीला अंधार अजिबात आवडत नाही. ज्या घरामध्ये अस्वच्छता असेल त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही. त्यामुळे आपले घर हे स्वच्छ ठेवावे आणि रात्री झोपण्यापूर्वी देवघरांमध्ये छोटासा बल्ब किंवा तुपाचा दिवा अवश्य लावावा.
वास्तुशास्त्रामध्ये उत्तर दिशा ही धनाची देवता कुबेर यांची मानली जाते. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही या दिशेला अजिबात कचरा ठेवायचा नाही म्हणजेच ही दिशा नेहमी स्वच्छ ठेवायची आहे. यामुळे आपल्या घरामध्ये धनाची कमतरता कधीही भासत नाही. तसेच रात्री झोपण्यापूर्वी घरातील जो झाडू आहे हा झाडू कधीही उभा ठेवायचा नाही.
झाडू उभा ठेवल्यामुळे किंवा एखाद्याचा पाय लागल्याने माता लक्ष्मीचा अपमान होतो. त्यामुळे संध्याकाळी झाडूचा वापर झाल्यानंतर तो लपवून ठेवायचा आहे किंवा जमिनीवर तुम्ही आडवा देखील ठेवू शकता. तसेच तुम्ही रात्री झोपताना दिशा देखील खूपच महत्त्वाची असते. म्हणजेच जेवल्यानंतर तुम्ही झोपी जाणार तेव्हा कोणत्या दिशेला झोपता हे देखील खूपच महत्त्वाचे मानले गेलेले आहे.
नेहमी तुमचे डोके हे दक्षिण आणि पाय हे उत्तर दिशेला असावेत. तसेच जर तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्ती म्हणजेच नकारात्मक ऊर्जा भरपूर प्रमाणात असेल तर रात्रीच्या वेळी कापरा सोबत लवंग घालून जाळायचे आहेत. हे काम तुम्ही जेवल्यानंतर करायचे आहे. म्हणजेच रात्री जेवल्यानंतर तुम्हाला कापूर आणि लवंग घेऊन जाळायचे आहे.
यामुळे धनसंपत्तीमध्ये वाढ होत राहते आणि हे काम दररोज तुम्हाला करायचे आहे. तसेच देवघरांमध्ये जर शिळी फुले आणि पाणी असेल तर हे देवघरांमध्ये कधीही ठेवायचं नाही. यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते आणि त्याचा परिणाम आपल्या धनसंपत्तीवर होतो.
म्हणजेच आपल्या घरामध्ये लक्ष्मी वास करत नाही. पैशाची कमतरता कायम राहते. तर मित्रांनो वरील सांगितल्याप्रमाणे ही जी कामे आहेत ही कामे तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी करायची आहेत. जेणेकरून आपल्या घरामध्ये पैशाची कमतरता कधीही भासणार नाही. माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.