कसं असावं घरातलं देवघर?

वास्तूशास्त्र अध्यात्मिक

घरातल्या देवघरात कोणत्या गोष्टी चुकूनही करू नयेत आणि घरातल्या देवघरात कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्या? काय सांगता वास्तुशास्त्र? चला हे सगळं जाणून घेऊया. घरातल देवघर कस असावा याच्यापेक्षा आधी हे जाणून घ्या की घरातल देवघर कुठे असावं? घरातल देवघर जर पूर्व दिशेला असेल तर ते तुम्हाला ऐश्वर्य आणि प्रतिष्ठा देईल.

घरातल देवघर जर उत्तर दिशेला असेल तर तुम्हाला सर्व सुखांचा लाभ होईल पण दक्षिण दिशेला असलेल देवघर शत्रू पिडा मात्र घेऊन येईल. पश्चिम दिशेला असलेल देवघर आजारपण देत. नैऋत्य दिशेला देवघर असेल तर नकारात्मक गोष्टींचा त्रास होतो. वास्तूच्या आग्नेय दिशेला देवघर असेल तर होमवनाशिवाय इतर प्रकारची कुठलीही साधना उपासना निष्फळ ठरते.

देवपूजेतील देव एकमेकांकडे पाहत आहेत असे मांडू नयेत. देवाऱ्यात धन किंवा पैसे दडवून ठेवू नये. देवघरात कमीत कमी देव मूर्ती आणि फोटो असावेत. कुलदेवतेचे टाक, मूर्ती किंवा एखादा फोटो तरी हवाच. तुमचे इष्ट दैवत त्याबरोबर छोटा बाळकृष्ण, महादेवांची छोटीशी पिंड हे हवच आणि सगळ्यात महत्त्वाचं गणपती बाप्पाची छोटीशी मूर्ती तरी हवीच.

त्याच बरोबर वेगवेगळ्या प्रकारची यंत्र चालतील. पण यंत्र ही देवतांची आसन असतात हे लक्षात ठेवा. त्यामुळे ती उभी मांडू नयेत जमिनीशी समांतर असावी. एकाच देवाच्या दोन किंवा त्यापेक्षा जास्त मूर्ती असू नये. त्यामुळे त्यापैकी एकही कार्य करत नाही. त्याच देवतेची मूर्ती आणि तसबीर चालेल. देवी निरनिराळ्या दोन असल्या तरी चालतील. पण दोन पेक्षा जास्त नको.

दत्तक गेलेल्या घराण्याचे किंवा बुडीत करण्यात आलेले देव देवाघरात पुजू नये. ते सर्वच विधीवत विसर्जित करून नवीन देव करावेत. नाहीतर पूजकाची ही वंशबुडी होऊ शकते. अनेक संकटांनी तो त्रस्त होईल. देव्हाऱ्यात भगवान शंकराची मूर्ती किंवा फोटो ठेवू नये कारण त्यामुळे घरचे वातावरण स्मशानवत स्वरूपात मानले जाते.

संसारी माणसाने मारुती देवघरात पुजू नये कारण त्यामुळे कुटुंबाचा वंश खंडित होण्याची शक्यता असते. घरात कुठेही मारुतीचा फोटो असावा चालेल. देव्हाऱ्यात शनीची पूजा करू नये, सर्व जीवन संकटमय आणि उदास राहते. देव्हाऱ्यात मुंजाची पूजा करू नये बाकीचे देव काम करत नाहीत.

देवघरात काळभैरवाची पूजा देखील निषिद्ध आहे, तो यम असून स्वभाव उग्र आणि कडक आहे. देवघरात म्हसोबा पुजु नये, कुलदेवीचे कृपा छत्र कुटुंबावर त्यामुळे राहत नाही, कुटुंब नित्य अनेक संकटांनी पीडित राहत. देवघरात पुजायच्या मूर्ती तीन इंचापेक्षा जास्त मोठ्या असू नये.

तशा असतील तर त्या विसर्जित कराव्या. देवांना सकाळ संध्याकाळ नैवेद्य नक्की दाखवावा. देवघर नेहमी स्वच्छ आणि सुंदर ठेवावं. देवघरावर नजर जाताच आपलं मन प्रसन्न झालं पाहिजे. घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रसन्न वाटलं पाहिजे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *