मुलीचा संसार सुखी होण्यासाठी ‘ही’ एक वस्तू द्या

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो, लग्न म्हणजे दोन जीवांचे एकत्र येणं. लग्न जमवत असताना अनेक गोष्टींचा विचार केला जातो. जेणेकरून त्यांचा संसार हा सुखी होईल. म्हणजेच लग्न जुळविताना कुंडली, गृह नक्षत्र तसेच गुण किती जुळतात हे सर्व पाहिले जाते आणि नंतरच मग लग्नाची बोलणी केली जाते.

तर आज मी तुम्हाला अशी एक वस्तू सांगणार आहे ही वस्तू जर आपण आपल्या मुलीला दिली तर तिचा संसार हा सुखी होतो. त्यांच्या संसारामध्ये कोणताही प्रॉब्लेम येत नाही. त्यांचे आयुष्य खूप मस्त व सुखा समाधान यांनी भरलेले असते. लग्न हा विषय खूप विचार करून घेतला जाणार असतो. लग्न हा शब्द दिसायला जरी लहान असला तरी दोन व्यक्तीचे आयुष्य यामुळे बदलून जाते.

लग्न ठरल्यानंतर मुलीच्या लग्नात मान पान आहेर दिला जातो. मुलगीच लग्न करण्यासाठी तिला हव्या नको त्या गोष्टी पाहिल्या जातात. आपला मुलगी च लग्न हे मोठ्या थाटामाटात व्हावं अशी सर्व आपल्या आई बाबांचे स्वप्न असतात. लग्नामध्ये दिला जाणारा मुख्य म्हणजे रुखवत.

रुखवत म्हणजे नेमकं काय तर मुलीला सासरी जाताना माहेरातील दिल्या जाणारी वस्तू त्यास रुखवत म्हणतात. मग अनेक प्रकारचे रुखवत देतो पण यावेळेस एक वस्तू द्या ती जर तुम्ही तिच्यासोबत दिली तर तिच्या घरी लक्ष्मी घेऊन जाते. आपली मुलगी ही लक्ष्मी म्हणून दुसऱ्यांच्या घरी जात असते आणि जाताना सुख वैभव संपत्ती सर्वकाही अशी एक वस्तू आहे की एक वस्तू तुम्ही आपल्या मुलीला लग्नामध्ये द्यायची आहे ती आज मी तुम्हाला सांगणार आहे.

तर तुम्हाला तुमच्या मुलगीच्या रुखवतामध्ये काशाची वाटी द्यायचे आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की रुखवतामध्ये एवढं सगळं दिलं जातं पण आता काशाची वाटी हेच का द्यायचे तर कासे हा एक धातू आहे. पूर्वीच्या काळी सगळ्यांच्या घरात असायचे पण आता ते कुठे दिसेनासे झाले आहे. काशाच्या वाटेचा खूप उपयोग केला जातो.

अंग घासण्यासाठी सुध्दा काशेचा वाटीचा वापर केला जातो. कारण त्याच्यामुळे आपल्या अंगात असलेली उष्णता बाहेर पडते. हया धातूला लक्ष्मी सुद्धा मानले गेलेले आहे. सुहासिनींना देखील मुद्दाम कशाच्या ताटात जेवायला दिले जाते. काशाची थाळी ही खूप नाजूक असते हातातुन पडली तर ती फुटण्याची शक्यता जास्त आहे. तर रुखवतामध्ये काशाची एक तरी वस्तू नक्की द्यावी. ताट किंवा वाटी तुम्ही दिली तरी चालेल.

काशाची वाटी रुखवता मध्ये का द्यावी तर काशाच्या ताटात जेवल्यानंतर आयुष्य, बुध्दी, बल वाढते. यामुळे याला खूपच महत्त्व प्राप्त झालेल आहे. तसेच तुम्ही जर मुलीला काशाची वाटी दिली तर यामुळे आपल्या मुलीचा संसार देखील खूपच आनंदाने चालतो. म्हणजेच तिला जीवनामध्ये कोणत्याच संकटांचा सामना करावा लागत नाही.

तर मित्रांनो तुम्ही देखील आपल्या मुलीचा जर संसार सुखी व्हावा असे जर तुम्हाला वाटत असेल तर मुलीच्या रुखवतामध्ये कासे धातूची एक तरी वस्तू तुम्ही द्यायची आहे. यामुळे नक्कीच तुमच्या मुलीचा संसारामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण संकटे येणार नाही. तिचा संसार हा सुखी होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *