लग्नात नववधूला उलटे मंगळसुत्र का घालतात?

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो आपले हिंदू धर्मामध्ये लग्नाला विशेष असे महत्त्व आहे. लग्न म्हणजे दोन जीवांचे एकत्र येणे होय. लग्न जुळविताना अनेक गोष्टींचा विचार देखील केला जातो. म्हणजेच कुंडली जमने, एकमेकांचे स्वभाव पटतात का? या गोष्टींची पुरेपूर काळजी घेऊनच लग्न जमवले जाते. लग्नामध्ये अनेक विधी देखील केले जातात आणि विधिवत लग्न सोहळा पार पडतो.

या लग्नामध्ये अनेक सौभाग्यलंकार मुलींना घातले जातात. परंतु अलीकडच्या काळामध्ये खूपच फॅशन बनली असल्यामुळे अनेक जण या सौभाग्य अलंकाराविषयी काळजी घेत नाहीत. लग्नामध्ये मंगळसूत्र हा एक पवित्र दागिना मानला जातो. लग्नाच्या वेळेत नववधूला उलटे मंगळसूत्र घातलेले आपण पाहिलेच असेल.

तर हे उलटे मंगळसूत्र लग्नामध्ये नववधूला का घातले जाते याविषयीची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. लग्नामध्ये उलटे घातलेले मंगळसूत्र हे काही दिवसांनी सरळ केले जाते. उलटे मंगळसूत्रामुळे लग्न झालेली स्त्री ही नेहमी आनंदी राहते. तसेच मंगळसूत्रामधील वाट्या जेव्हा महिलेच्या हृदयाजवळ येतात तेव्हा ते तिच्यासाठी खूपच फायदेशीर ठरते.

यामागे कारण आहे ते म्हणजे त्या वाट्याचा धातू. हा धातू तिच्यासाठी उत्तम ठरतो. मंगळसूत्र मधील वाट्या या सोन्याच्या धातुने बनवलेल्या असल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने ते महिलांसाठी खूपच फायदेशीर ठरते. मंगळसूत्र हे सोने आणि चांदीने बनवण्यात येते हे दोन्ही धातू जे आहेत हे महिलांच्या हृदयाला निरोगी ठेवण्याचे काम करतात. यामुळे रक्तदाब देखील नियंत्रणात राहतो.

तसेच मंगळसूत्रातील जो काळा मोती असतो हा महिलांना राहू, केतू आणि शनीच्या दुष्प्रभावापासून देखील वाचवत असतो. आजकाल या फॅशनच्या युगामध्ये अनेक महिला या फॅशन प्रमाणे मंगळसूत्र वापरत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. मंगळसूत्रामध्ये दोन पदरी दोऱ्यात काळे मणी गुंफलेले असतात.

मध्यभागी 4 छोटे मणी 2 लहान वाट्या असतात. एक नवऱ्याच घर आणि दुसरी वाटी माहेर. दोन दोरे म्हणजे पती-पत्नीचे बंधन. 4 काळे मणी म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत. लग्नामध्ये वराकडील जे लोक असतात ते एखाद्या वराकडील एखाद्या सुवासिनीला वधूवरांना पूर्व दिशेकडे तोंड करून बसायला सांगतात आणि वधूस काळ्या मण्यांचे मंगळसूत्र देण्यास सांगतात. दोन्ही वाट्यांमध्ये हळद आणि कुंकू हे सौभाग्याचे लक्षण भरून हे उलटे घातले जाते.

ज्यामुळे लोकांना कळते की ही महिला नुकतीच सौभाग्यवती झालेली आहे आणि तिचं नुकतेच लग्न देखील झालेल आहे. हे उलटे मंगळसूत्र घातल्यामुळे त्या महिलेस निरोगी शरीर देखील प्राप्त होते. अनेक हृदयरोगाच्या आजारांपासून देखील तिची सुटका होत राहते. मंगळसूत्र हे महिलांसाठी खूपच महत्त्वाचे असते.

मंगळसूत्र म्हणजे विवाहित महिलांसाठी सौभाग्याचे रक्षा कवच देखील मानण्यात आलेले आहे. आपल्याकडे असे मानले जाते की कोणत्याही नव्या गोष्टींना नजर लागते. त्यामुळे मंगळसूत्रांमध्ये काळे मने देखील ओवलेले असतात. म्हणजेच नव्या जोडप्याला किंवा त्यांच्या संसाराला कधीही कोणाची नजर लागू नये आणि त्यांचा संसार हा सुखाचा व्हावा यामुळे काळेमणी हेमंगळसूत्रांमध्ये घालून ते मंगळसुत्र महिलांना गळ्यात उलटे घातले जाते.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *