मित्रांनो, दिवाळीला सुरुवात झाली.त्यामुळे सगळीकडे आनंदाचे चैतन्याचे वातावरण पसरले आहे. गोड पदार्थांचा वास सगळीकडेच दरवळत आहे. दिवाळीच्या या पवित्र सणाला अनेक जण बरेच उपाय करत असतात. तसेच मनोभावे व श्रद्धेने लक्ष्मीची आराधना देखील करीत असतात. याच दिवाळीच्या दिवशी स्वामींच्या मूर्तीचे पूजन, स्वामींची सेवा करा म्हणजे तुमच्यावर स्वामी प्रसन्न होतील.
लक्ष्मीपूजन हे खूपच महत्त्वाचे आहे. दिवाळीच्या या पावन सणांमध्ये लक्ष्मीपूजनाला खूपच विशेष असे स्थान आहे. आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी व कुबेराची पूजा करत असतो. लक्ष्मी मातेची कृपा दृष्टी आपल्यावर रहावे, घरात सुख समृद्धी नांदावी म्हणून आपण लक्ष्मी पूजन करीत असतो.
तर याच दिवाळीच्या दिवशी आपणाला स्वामींची देखील पूजा करायची आहे. तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर तीही पूजा तुम्ही अवश्य करा. ही पुजा तुम्ही दिवाळी दिवशी करायची आहे.
तुम्हाला स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे.जर तुमच्या घरी मूर्ती नसेल फक्त फोटो असेल तर त्या फक्त फोटोवर थोडेसे पाणी शिंपडून पूजा करावी. जर मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर अकरा वेळा दूध, अकरा वेळा पाणी घालून स्वच्छ करावी. नंतर त्या या मूर्तीची स्थापना पूजा-अर्चना करून घ्यायची आहे.
दिवा, अगरबत्ती लावून आपणाला श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा जप एक माळ करायचा आहे. अगदी मनोभावे या मंत्राचा जप करायचा आहे. कोणतीही विचार आपल्या डोक्यामध्ये आणायचे नाहीत. आपले मन विचलित होऊन द्यायचे नाही. खूपच एकाग्रतेने स्वामींचा हा मंत्र तुम्ही म्हणायचा आहे.
नंतर स्वामी समर्थांना दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. स्वामी समर्थांना दूध साखरेचा नैवेद्य अतिशय प्रिय आहे. जर तुम्ही घरात खीर केली असेल तर त्याचा देखील नैवेद्य दाखवला तरी चालेल.जर वेगळे काही पदार्थ केले असतील तर त्या भोजनाच्या ताटामध्ये दूध साखर नक्की घ्यावे. घरात केलेला फराळ देखील नैवेद्य म्हणून स्वामींना दाखवावा.
तर अशा प्रकारे तुम्ही स्वामींची सेवा दिवाळी दिवशी अवश्य करा व त्या मूर्तीचे पूजन अवश्य करा. ज्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी व आनंदी वातावरण राहील. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. स्वामी आपल्या कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर कायम ठेवतील व ते आपल्या पाठीशी कायम उभे राहतील.
टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.