२० एप्रिल सूर्यग्रहण भारतात दिसणार की नाही? मग त्याचे नियम पाळावे की नाही?

अध्यात्मिक माहिती

20 एप्रिलला आहे 2023 मधलं पहिलं सूर्यग्रहण. आणि हे सूर्यग्रहण भारतात दिसणार आहे की नाही, सूर्यग्रहणाचे नियम पाळायचे आहेत की नाही, या सूर्यग्रहणाचा भारतातल्या लोकांवर काय प्रभाव होणार आहे? चला जाणून घेऊया सर्व सविस्तर माहिती.

वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण 20 एप्रिल 2023 ला गुरुवारी आहे. ग्रहण काळामध्ये पूजा, शुभ कार्य, अन्न शिजवणे अशा सगळ्या गोष्टी केल्या जात नाहीत. गर्भवती महिलांना सुद्धा विशेष काळजी घ्यायला सांगितली जाते. ज्योतिष शास्त्रानुसार सूर्यग्रहणाच्या वेळी राहूचा सूर्यावरचा प्रभाव वाढतो आणि सूर्याला ग्रहण लागते.

2023 मधलं पहिला सूर्यग्रहण मेष राशीत व अश्विनी नक्षत्रात होईल. चला तर मग जाणून घेऊया सूर्यग्रहणाची वेळ आणि त्याचा भारतात होणारा परिणाम.गुरुवारी 20 एप्रिलला जे सूर्यग्रहण होणार आहे ते सकाळी ७ वाजून ४ मिनिटांनी सुरू होईल आणि दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी संपेल.

या सूर्यग्रहणाचा कालावधी ५ तास २४ मिनिटांचा असेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. किंवा भारतात राहणाऱ्या लोकांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे सूर्यग्रहणाचे नियम जे आहेत ते पाळण्याची गरज भारतातल्या लोकांना असणार नाही.

ज्योतिष शास्त्रानुसार ज्या देशात सूर्यग्रहणाचा प्रभाव नाही तिथे वेदादी नियम पाळण्याची गरज नाही. ग्रहणाच्या आधी ग्रहणाचे वेध लागतात आणि त्या कालावधीमध्ये सुद्धा ग्रहणाचे नियम पाळले जातात. परंतु या वेळेला सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे असे कुठल्याही प्रकारचे वेध पाळण्याची गरज नाही.

2023 चे सूर्यग्रहण मग दिसणार तरी कुठे? तर ते सूर्यग्रहण दिसणार आहे सिंगापूर, थायलंड, तैवान, मलेशिया, फिजी, जपान, कंबोडिया, चीन, अमेरिका, इंडोनेशिया, अंटार्टिका, ऑस्ट्रेलिया या अशा देशांमध्ये हे सूर्यग्रहण दिसणार आहे. पण भारतात मात्र हे सूर्यग्रहण दिसणार नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा नियम पाहण्याची गरज नाही.

20 एप्रिलला होणाऱ्या या सूर्यग्रहणाचा परिणाम भारतात होणार नसला तरी सुद्धा खबरदारी म्हणून या दिवशी विशेष उपाय केले जाऊ शकतात. सूर्यग्रहणाची अशुभ छाया टाळण्यासाठी आदित्य हृदय स्तोत्राचा जप करावा असं शास्त्र सांगत. ज्यांच्या कुंडलीत सूर्य ग्रह कमकुवत आहे त्यांनी या दिवशी सूर्य अष्टकम स्तोत्राचे पठण करावे त्यामुळे सूर्य बलवान होतो.

त्यामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो व व्यक्तिमधले सामर्थ्य वाढते. लक्षात घ्या की आपल्या कुंडली मध्ये म्हणजेच आपल्या पत्रिकेमध्ये सूर्य हा ग्रह आपल्याला आत्मविश्वास मिळवून देतो. जर आपला सूर्यग्रहण कमकुवत असेल तर आपला आत्मविश्वास कमी असतो.

म्हणूनच जर तुम्ही रोज सकाळी उठून सूर्याला अर्घ्य दिलं अर्थात पाणी अर्पण केलं जल अर्पण केलं तर तुमचा आत्मविश्वास काही दिवसात वाढलेला तुम्हाला दिसून येईल.नोकरीमध्ये प्रगती होत नसेल करिअरमध्ये अडचणी येत असतील तर सूर्याची उपासना करायला सांगितले जाते.

सांगितल्या प्रमाणे एक तांब्याचा कलश घ्यायचा त्यामध्ये थोडसं कुंकू किंवा लाल चंदन टाकायच आणि ते पाणी सूर्योदयाच्या वेळी सूर्याला अर्पण करायचं. आणि पाणी अर्पण करताना सूर्याचे मंत्र सुद्धा म्हणायचे. त्यामुळे काय होतं तर त्यामुळे सूर्यनारायणाची आपल्यावर कृपा होते आणि आपल्या करियर मधल्या अडचणी सुद्धा दूर होतात.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *