सा व धा न ! ! तुम्हीही बेडवर बसून जेवत असल्यास होतील हे 3 परिणाम..

अध्यात्मिक

हिंदु धर्मातील प्राचीन ग्रंथांमध्ये मनुष्याने कोणत्या गोष्टी करायला पाहिजे आणि कोणत्या नाहीत याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. काहीजण याचा वापर करतात तर काहींना याबद्दल कोणतीच कल्पना नसते. पण त्यातली एक गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जी वाचून तुम्ही नक्कीच विचारात पडाल.

आपण ज्या जागी झोपतो तिथे चुकूनही जेवू नका किंवा खाऊ नका असं शास्त्रात लिहून ठेवलं आहे. पण नेमकी हीच गोष्ट अनेकजण विसरून जातात. झोपण्याच्या ठिकाणी खाणं खाल्ल्याने देव क्रोधित होऊ शकतात आणि त्यामुळे अनेक संकटं तुमच्यावर कोसळू शकतात. तसेच प्राचीन वेदांनुसार, तुम्ही ज्या जागी झोपता तिथे कधीही जेवण घेऊन जाऊ नये.

असं केल्याने तुम्ही अन्न देवतेचा अपमान करता. असं केल्याने कुटूंबातील सदस्य आजारी पडू शकतात. या आधुनिक जगात जगताना काही लोक मात्र आपली संस्कृती विसरून जातायत, त्यामुळे त्यांना होणारा त्रास व त्याचे कारण मात्र त्यांना समजत नाहीये. ज्या गोष्टी जिथे तिथे जशा असायलाच हव्यात त्याच पद्धतीने त्या तशा करायलाही हव्यात.

ज्या अर्थी पूर्वी लोक सुखी-समृद्ध जीवन जगत होते, तेव्हा लोकांचे आयुष्य खूप होते, जशी जशी जीवनशैली बदलत गेली तशी लोकांची राहणी बदलत गेली त्यामुळे आयुर्मान देखील कमी झाले. याला कारणीभूत आजकालच्या खाण्याच्या सवयी सुदधा आहेत. पूर्वी लोक खाली बसून जेवायचे त्यामुळे त्यांच्या शरीराचे व पृथ्वीचे ऊर्जावहन व्यवस्थित व्हायचे.

आजकालच्या खाण्याच्या पद्धती व खाण्याचे पदार्थ त्यामुळे लोक खूपच कमकुवत बनत चालले आहेत त्यामुळे थकवा येणे, चक्कर येणे, अचानक जाडी वाढणे अथवा थायरॉईड होणे तेही वयाच्या खूपच लहानपणात होतांना दिसत आहेत. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये भोजनाची व्यवस्था कशी, कुठे असावी भोजनाचे काही नियम सांगितले आहेत जे फक्त शास्त्रातच नव्हे तर वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा उत्तम व योग्य आहेत.

ज्यामुळे शरीर सुदृढ व सक्षम राहते. वास्तू व ज्योतिष शास्त्रानुसार भोजनाच्या नको त्या सवयींचा परिणाम आपल्या ग्रहांवर सुद्धा होतो. त्यामुळे आपल्याला भोजनाविषयी हे नियम माहीत असायलाच हवेत. स्वयंपाक घर हे स्नानगृह अथवा शौचालय यांच्या आसपास चुकूनही नसावे तसेच त्याचा वरती किंवा खाली सुद्धा नसावे.

असे असल्यास जंतुसंसर्ग होऊ शकतो. भोजन करताना आपले मुख पूर्व किंवा उत्तरेला असणे योग्य मानले जाते. त्यामुळे देवांची कृपा आपल्यावर राहते व यश मिळण्यात मदत होते. ज्यांचे आई वडील हयात नाहीत त्यांनी दक्षिण दिशेला मुख करून ऍन ग्रहण करा, पितृ आशीर्वाद लाभतात. ज्यांचे माता पिता आहेत त्यांनी पश्चिम दिशेला मुख करून जेवण करा. जेवणाच्या अगोदर हात, पाय, तोंड स्वच्छ धुवा.

तसेच ओल्या पायांनी जेवण करणे शुभ मानले जाते. जल एक पंचतत्व आहे त्यामुळे तुम्ही जर ओल्या पावलांनी जमिनीवर बसून जेवलात तर जल आणि भूतल यांचं मिलन होऊन ते तुमच्या आरोग्यासाठी लाभदायी असते. खुर्चीवर बसून जेवण करणे टाळावे. खाली जमिनीवर बसून जेवण केल्यास आपल्या शरीरातील जठराग्नी शांत होतो, क्रोधावर नियंत्रण मिळते.

आग्नेय दिशेला मुख करून जेवण केल्यास योनी मार्गाचे विकार होतात. तसेच काही आर्थिक अडचणी असणाऱ्या व्यक्तींनी पश्चिमेकडे तोंड करून भोजन करावे. चुकूनही झोपण्याच्या ठिकाणी किंवा बेडवर बसून अन्यथा झोपून जेवण करू नका. नेहमी जेवण जमिनीवर बसून करावं. यामुळे तुम्ही अन्न देवतेचा मान ठेवता आणि ती तुमच्यावर कृपादृष्टी ठेवते असं म्हटलं जातं.

तसेच तुम्हाला जर बेड वर बसून जेवायची सवय असेल तर लगेच बंद करा, त्यामुळे अन्नाचा अपमान तर होतोच तसेच तुमचं शरीर कमजोर बनते. राहू अप्रसन्न होतात व जठराच्या समस्या होतात. जेवताना जठरातून ऊर्जा निघत असते, बेड मधील कापूस शरीरातून ऊर्जा निघण्यासाठी रोखतो त्यामुळे त्या भोजनाचा शरीराला काहीच उपयोग होत नाही.

जमिनीवर बसून जेवल्याने शरीरातील तापमान नियंत्रित राहते जे आपण कुठंही बसून जेवल्याने राहत नाही. तसेच जेवल्यावर थाळीत हात धुतल्याने अन्नपूर्णा नाराज होते व चंद्र आणि शुक्र अप्रसन्न होतात. त्या घरातील समृद्धी निघून जाते. जेवताना पुरेल इतकेच अन्न घ्या थाळीत अन्न सोडू नका नाहीतर त्याला अन्नपूर्णेचा अपमान समजला जातो.

टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *