आपल्या सनातन धर्मात पूजेसाठी श्रीफळाचे विशेष महत्त्व आहे. कोणत्याही देव-देवतांची पूजा नारळाविना अपूर्ण मानली जाते. असे मानले जाते की नारळ चढवल्याने धना संबंधी समस्या दूर होते. सोमवारी नारळ फोड़त नाही कारण सोमवार हां दिवस महादेवांचा दिवस असतो. नारळात जे पाणी आहे ती गंगा मानावे, असे म्हंटले जाते,म्हणून नारळ फोडले की त्या गंगेचा अपमान होतो ,असे मानले जाते.
याचबरोबर नारळ एकादशीही फोडले जात नाही,कारण नारळ हे एक फळ आहे. पण नारळाला ब्रह्मा,विष्णु,महेश व आदिशक्ति जगदम्बा म्हणून ओळखले जाते. म्हणजे कोणत्याही कार्यात नारळाशिवाय पूजा परिपूर्ण होत नाही. नारळ हे फल नसून त्यात तीनही देव वास करतात असे मानले जाते. जर एकादशी किंवा सोमवारी नारळ फोडले तर ब्रह्महत्या किंवा देवहत्या केल्याचे पाप लागते.
याशिवाय नारळ हे ब्रह्मांडाचे रूप म्हणून ओळखले जाते. म्हणून नारळाची पूजा केली जाते. कारण बऱ्याच लोकांकडून ही चूक होत असते आणि बऱ्याच लोकांना याबद्दल काहीच माहिती नसते. कारण जर एकादशी किंवा सोमवारी नारळ फोडल्यास, देवा हत्या केल्याचे आपल्याला पाप लागतात,असे हिंदु शास्त्रत सांगितले आहे.
तसेच दुसरे कारण म्हणजे, एकादशी हा श्रीविष्णूच्या दिवस असल्यामुळे, या दिवशी सर्व देवीदेवतां श्री विष्णूचा उपवास करीत असतात, त्यामुळे या पवित्र दिवशी नारळ फोडल्यास, श्री विष्णूंना मारहाण केल्याचे आपल्याला पाप लागते. तसेच सोमवारी नारळ न फोडण्याचे कारण म्हणजे, सोमवार हा दिवस महादेवाचा दिवस असतो आणि हिंदू शास्त्रानुसार नारळाचे पाणी हे गंगेचे पाणी असल्याचे,सांगितले जाते.
त्यामुळे नारळ फोडले की,त्या गंगेचे अपमान होतो. मग गंगेचा अपमान म्हणजे, साक्षात भगवान शंकराचा अपमान मानला जातो, कारण देवी गंगेचे स्थान हे देवाधी देव महादेवाच्या डोक्यावर असल्यामुळे, देवी गंगेला हिंदू धर्मात माते समान मानले जाते. त्यामुळे सोमवार किंवा एकादशीला नारळ फोडणे म्हणजे ब्रह्महत्या असल्याचे सांगितले जाते. म्हणून नारळ फोडत नाही.
याशिवाय नारळ हे ब्रमांडाचे रूप म्हणून ओळखले जाते, म्हणून नारळाची पूजा करतात. पण नारळ हे देवाचे तत्व असल्यामुळे ते सोमवार व एकादशीला फोडत नाहीत. इतर दिवशी तुम्ही कधीही नारळ फोडू शकतात. मात्र चुकूनही सोमवारी आणि एकादशीच्या दिवशी नारळ फोडू नये.त्या दिवशी कितीही महत्वाचे काम असेल,तरी नारळ सोमवारी आणि एकादशीला नारळ फोडू नये, नाहीतर ब्रह्महत्या केल्याचे भयंकर पाप आपल्याला लागू शकते.
तसेच याशिवाय हिंदूं लोकांसह ,अनेक आशियातील भागांमध्ये नारळ हे फळ पवित्र मानले जाते. त्याला धार्मिक कार्यात वापरताना श्रीफळ म्हणतात. नारळचा वापर सगळ्यात जास्त मंदिरांमध्ये केला जातो. दिवाळी, दसरा, गणपती पूजा या दिवशी देवाला मोठ्या प्रमाणात नारळ अर्पण केले जातात.
टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.