सोमवारचा उपवास करताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी, मिळेल महादेवाचा आशिर्वाद!

अध्यात्मिक

मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवसाला विशेष असे महत्त्व दिले गेलेले आहे. मित्रांनो प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना हा समर्पित आहे. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या देवी देवतांचे अगदी मनोभावे पूजा करीत असतात. तसेच व्रत देखील ते करीत असतात.

सोमवार हा महादेवांचा वार मानला जातो. या दिवशी बरेच भक्त उपवास करतात. तसेच मित्रांनो शंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन ते विधिवत पूजा देखील करतात आणि संध्याकाळी आपला उपवास सोडत असतात. महादेवांची कृपा होण्यासाठी बरेच लोक हे उपवास करून त्यांना बेल तसेच पांढरे फूल देखील अर्पण करीत असतात.

सोमवारच्या उपवासाच्या दिवशी आपल्याला अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. म्हणजेच मित्रांनो या गोष्टी आपल्या हातून घडणार नाही याकडे आपले पुरेपूर लक्ष असणे गरजेचे आहे. तर मित्रांनो या गोष्टी तुम्ही चुकूनही आपल्या सोमवारच्या उपवासात करायच्या नाहीत. कारण यामुळे महादेवांचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होत नाही.

तर त्या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत ज्या आपण टाळायच्या आहेत चला तर मग जाणून घेऊया. तुम्ही जर सोमवारचे महादेवांचे व्रत करत असाल तर तुम्ही मित्रांनो भगवान शिवाची पूजा करताना दुधाचा अभिषेक करण्यासाठी तांब्याचे भांडे अजिबात वापरायचे नाही. मित्रांनो तांब्याच्या भांड्यात दूध टाकल्यामुळे दुधाचा संसर्ग होतो.

तर मित्रांनो तुम्ही भगवान शंकरांची पूजा करताना शंकराला कायम पंचामृतने स्नान घालायचे आहे. शिवलिंगावर जल अर्पण करायचे आहे आणि शेवटी जल शिवलिंगावर अर्पण केल्यावरच तुम्ही केलेला जलाभिषेक पूर्ण मानला जातो. तसेच मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही सोमवारचे व्रत करत असाल तर त्यावेळेस तुम्ही भगवान शंकरांची पूजा करताना चुकूनही कुंकवाचा टिळा अजिबात लावायचा नाही.

मित्रांनो भोलेनाथांना टिळा लावण्यासाठी चंदनाचा वापर करणे खूपच शुभ मानले गेलेले आहे. ज्या लोकांनी भगवान शंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सोमवारचा उपवास केला आहे त्यांनी हे लक्षात ठेवावे की, पूजेनंतर कधीही शिवलिंगाची पूर्ण प्रदक्षिणा करू नये. जिथे दूध वाहते तिथे थांबायचे आणि परत यायचे आहे.

तर मित्रांनो तुम्हीही जर सोमवारचे व्रत करत असाल तर त्यावेळेस तुम्ही सोमवारी सकाळी लवकर उठून अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. तसेच शिवलिंगाचा जलाभिषेक आपल्या घरी किंवा तुमच्या आसपास जर जवळ शिवमंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही करू शकता.

तसेच मित्रांनो भगवान शंकरांची आणि माता पार्वतीची तुम्ही मनोभावे पूजा करायची आहे आणि व्रतकथा देखील वाचायचे किंवा ऐकायचे आहे आणि सोमवारच्या उपवासात एकाच वेळी अन्न घेणे योग्य मानले जाते. तुम्ही या दिवशी फलाहार करू शकता.
तर मित्रांनो तुम्ही देखील सोमवारचे व्रत करत असाल तर या सर्व गोष्टींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. जर या गोष्टींकडे तुम्ही लक्ष दिला तर तुम्हाला नक्कीच शंकरांचा आणि माता-पार्वतींचा कृपा आशीर्वाद प्राप्त होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *