ज्योतिषशास्त्रानुसार ‘हे’ आहेत श्रीमंतींचे 10 मंत्र

अध्यात्मिक

मित्रांनो, प्रत्येकालाच आपल्या जीवनामध्ये पैशाची आवश्यकता असते. कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी प्रत्येक जण हा पैशाच्या पाठीमागे लागलेला आहे. भरपूर मेहनत देखील हे लोक घेत असतात. परंतु कितीही मेहनत घेऊन देखील हा पैसा अपुरा पडत असतो किंवा पैसा टिकत नाही. या ना त्या कारणाने खर्च होत असतो. मित्रांनो पैशाशिवाय जगणे खूपच कठीण असते.

बऱ्याच जणांना मेहनत करून हवे तेवढे पैसे मिळत नाहीत. बऱ्याच जणांचे पैसे हे कुठे ना कुठे अडकलेले असतात. यावेळेस मात्र मग आपण खूपच निराश होतो आणि प्रकारचे उपाय देखील आपण करत असतो. तरीही त्याचा काही फायदा होत नाही. तर मित्रांनो आज मी तुम्हाला असे काही मंत्र सांगणार आहे जे ज्योतिषशास्त्रांमध्ये या मंत्राना खूपच अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. यामुळे मित्रांनो आपल्यावर लक्ष्मी मातेची कृपा राहते.

तसेच आपल्या घरामध्ये कायम पैशाचा पाऊस पडतो. तर हे मंत्र चमत्कारिक मंत्र कोणते आहेत चला तर जाणून घेऊयात. तर मित्रांनो या धार्मिक मंत्रांचा नियमित जप केला तर तुम्हाला नक्कीच चमत्कार दिसेल असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. चला तर मग जाणून घेऊया या चमत्कारी मंत्रांबद्दल. यातील चमत्कारिक मंत्र आहे तो म्हणजेच कुबेर मंत्र. तर मित्रांनोजर तुम्हाला कायम पैशाची कमतरता जाणवत असेल तर दररोज 108 वेळा या मंत्राचा जप करा. तो मंत्र काहीसा असा आहे,

‘ॐ यक्षाय कुबेराय वैश्रवाणाय, धन धन्याधिपतये धन धान्य समृद्धि मे देहि दापय स्वाहा॥’

तसेच जर तुम्हाला जीवनात सुख समृद्धी राहावी असे जर वाटत असेल तर माता लक्ष्मीच्या बीजमंत्राचा रोज जप करावा. तो पुढीप्रमाणे, ऊँ श्रींह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ऊँ महालक्ष्मी नम:। बऱ्याच जणांना आर्थिक बाबतीत भरपूर समस्या असतात. तर तुम्हाला जर आर्थिक समस्येतून बाहेर पडायचे असेल तर तुम्ही माता लक्ष्मीच्या या मंत्राचा नियमित जप केल्यास या आर्थिक समस्या नक्की दूर होतात.

तर तो मंत्र काहीसा असा आहे, ॐ ह्रीं श्री क्रीं क्लीं श्री लक्ष्मी मम गृहे धन पूरये, धन पूरये, चिंताएं दूरये-दूरये स्वाहा:। तसेच मित्रांनो भगवान धन्वंतरीचा विष्णूच्या रूपातील पारंपारिक पौराणिक मंत्राचा नियमित जप केल्याने आर्थिक लाभ होतो. ॐ नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धन्वंतराये: हा असा आहे.

आपल्यापैकी बरेच जण हे गणेश भक्त आहेत. ते गणपतीची पूजा अर्चना करीत असतात. तसेच मित्रांनो तुम्हाला जर लक्ष्मीची कृपा कायम हवी असेल तर मित्रांनो तुम्ही गणेश मंत्राचा नियमित रोज 108 वेळा जप करायला हवा. तो मंत्र काहीसा असा आहे. ओम गं गणपतये नमः

मित्रांनो तुमच्या जीवनामध्ये जर पैशाची समस्या असेल आणि तुम्हाला आपल्या कुंडलीतील धनाची स्थिती जर मजबूत बनवायची असेल तर तुम्ही या मंत्राचा जप अवश्य करावा. तो मंत्र काही असा आहे, देवानां च ऋषिणां च गुरुं काञ्चनसन्निभम्। बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतिम्।। ओम ग्रां ग्रीं ग्रौं सः गुरवे नमः।

तसेच तुम्ही ‘ॐ हनुमते नम:’ मंत्राचा रोज जप केला तर तुमची आर्थिक स्थिती सुधारते. तसेच आर्थिक क्षेत्रात भरपूर लाभ देखील तुम्हाला प्राप्त होतात. तसेच मित्रांनो तुम्हाला जर पैशाची कमतरता दूर करायची असेल तर तुम्ही ‘धनाय नमो नम:’ आणि ‘ ऊं धनाय नम:’त्याचा रोज अवश्य करावा.

मित्रांनो वरील सांगितल्याप्रमाणे या मंत्रांचे जप तुम्ही जर केले तर तुमची आर्थिक स्थिती नक्कीच सुधारते. तुम्ही देखील एक श्रीमंत माणूस बनू शकता.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *