मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती हा काही ना काही काम करीतच असतो. जो विद्यार्थी असतो तो विद्यार्थीदशेत शिक्षण घेत असतो तर अनेक लोक व्यापार, उद्योगधंदा यामध्ये व्यस्त असतात. तर काही लोक नोकरीमध्ये व्यस्त असतात. तसेच गृहिणी देखील आपल्या घर कामांमध्ये काम करीत असतात. पण मित्रांनो हे काम करीत असताना प्रत्येकालाच काही ना काही अडचणी, संकटे येत असतात.
त्या संकटांचा, अडचणींचा प्रत्येक जण हा सामना करीतच असतो. परंतु मित्रांनो कधीतरी प्रत्येक व्यक्ती हा कोणत्या ना कोणत्या गोष्टी पुढे हार मानतच असतो. एखाद्या व्यक्तीला जे हवं आहे ते एखाद्या वेळेस नाही मिळाले म्हणजेच त्यांची काही एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा पूर्ण झाली नाही. भरपूर प्रयत्न करून देखील ते काम पूर्ण नाही झाले तर मग तो व्यक्ती त्या गोष्टी पुढे हार मानतो.
भरपूर प्रयत्न करून देखील एखाद्या गोष्टींमध्ये अपयश आले की ती गोष्ट माणूस सोडून देतो म्हणजे ती गोष्ट माझ्या हातून होणार नाही असे म्हणून ही गोष्ट मिळवण्याचे तो प्रयत्न सोडून देतो म्हणजेच हार मानतो. मग तुम्ही मित्रांनो विद्यार्थी असो, एखादा उद्योजक असो, नोकरदार असो व एखादी गृहिणी असो प्रत्येकाच्या जीवनात अशी एखादी गोष्ट घडतच असते ज्यामध्ये त्यांनी अपयश मानलेले असते.
तर मित्रांनो अशा वेळेस आपले स्वामी समर्थ सांगतात की, जर मी तुमच्यासोबत आहे तर तुम्ही त्या गोष्टी बरोबर, त्या अडचणी सोबत संघर्ष करा. त्या गोष्टीविरुद्ध लढा. मी आहे तुमच्या पाठीशी. तर मित्रांनो आपल्या पाठीशी स्वामी समर्थ आहेत. ते आपल्याशी बोलत नाहीत.ते आपल्याला दिसत नाहीत.
पण तुम्हाला तरी विश्वास आहे ना.तर मित्रांनो तुम्ही तर हे मानता ना की, स्वामी समर्थ हे आपल्यात आहेत म्हणूनच तुम्ही त्यांची अगदी मनोभावे व श्रद्धेने सेवा करीत असतात. म्हणून तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही कोणत्याही गोष्टींमध्ये हार मानायची नाही. तुम्ही जर स्वामींचे सेवेकरी असा स्वामींची सेवा करीत असाल तर तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्यासोबत स्वामी समर्थ आहेत.
आपल्याबरोबर एक अद्भुत शक्ती, चमत्कारिक शक्ती आपल्या सोबत आहे हे लक्षात ठेवा आणि ती शक्ती म्हणजे आपले स्वामी समर्थ. त्यामुळे कोणत्याच गोष्टीची तुम्ही हार माणायचे नाही. या गोष्टीचा तुम्हाला संघर्ष करायचा आहे. त्या गोष्टीविरुद्ध तुम्हाला लढायचे आहे. स्वामी समर्थ आपल्या पाठीशी असताना आपण कोणत्याच गोष्टीची हार मानायची नाही. त्या गोष्टीला घाबरण्याची तुम्हाला गरज नाही.
जेव्हा आपण पडू, जेव्हा आपल्याला ठेच लागेल तेव्हा आपल्याला स्वामी आपल्या मदतीला नक्कीच धाऊन येणार हे मात्र नक्की. त्या संकटातून आपल्याला स्वामी नक्की बाहेर काढतील. ते आपल्या पाठीशी कायम राहतात. त्यामुळेच स्वामी सांगतात की, फक्त तुम्ही लढा. मी तुमच्या पाठीशी आहे.
तर मित्रांनो तुम्ही देखील स्वामी समर्थांचे सेवेकरी असाल तर कुठल्याच गोष्टीची हार मानायची नाही. त्या गोष्टीविरुद्ध तुम्हाला लढायचे आहे. कारण स्वामी समर्थ हे आपल्या पाठीशी आहेत.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.