सासरी निघालेल्या मुलीला चुकूनही देऊ नका ‘या’ भेट वस्तू, संसाराला लागेल ग्रहण

माहिती अध्यात्मिक

मित्रांनो प्रत्येक वडिलाला आपल्या मुलीचा संसार सुखी व्हावा यासाठी ते आपल्या मुलीचे लग्न ठरविताना अनेक गोष्टींचा विचार करीत असतात. म्हणजेच त्यामध्ये कुंडली जुळवणे तसेच त्या मुलग्याचा स्वभाव कसा आहे अशा अनेक चौकशी केल्यानंतर ते आपल्या मुलीचा विवाह करण्यास तयार होतात. प्रत्येक वडिलांची अशी इच्छा असते की, आपली मुलगी ही सासरी खुश असावी.

तसेच तिला कोणत्याही अडीअडचणी येऊ नयेत तिला कोणत्याही प्रकारचे दुःख येऊ नये. तसेच कशाचीही कमी पडू नये असे वाटतच असते त्यासाठी ते लग्नामध्ये अनेक प्रकारच्या वस्तू देत असतात. जेणेकरून ती मुलगी सासरी खुश राहायला हवी. तर आज मी तुम्हाला अशा काही वस्तू सांगणार आहे या वस्तू तुम्ही कधीही सासरी निघालेल्या मुलीला चुकूनही द्यायचे नाहीत.

कारण जर या वस्तू तुम्ही आपल्या मुलीला दिल्या तर यामुळे तिच्या संसाराला ग्रहण लागू शकते. म्हणजे तिचा संसार सुखाचा होणार नाही. तर या वस्तू नेमक्या कोणत्या आहेत याची ते सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया. तर आपण ज्यावेळेस मुलीची पाठवनी करत असतो त्यावेळेस आपल्या मुलीला गोड पदार्थांबरोबरच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ देतो.

परंतु या पदार्थांमध्ये आपण लोणचे कधीही द्यायचे नाही. म्हणजेच यामुळे आपल्या मुलीच्या संसारामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही नववधूला कधीही लोणचं द्यायचं नाही. म्हणजे तिची पाठवणी करीत असताना लोणच द्यायचे नाही. बऱ्याच वेळा आई वडील हे आपल्या मुलीची खूपच काळजी घेत असतात.

म्हणजेच जे तिला हवं आहे ते देत असतात. जेणेकरून ती दुःखी राहता कामा नये. बारीक सारी गोष्टींपासून ते मोठ्या वस्तूंपर्यंत ते आपल्या मुलीची इच्छा पूर्ण करीत असतात. परंतु अशामध्ये तुम्ही पाठवण्याच्या वेळी मुलीला झाडू द्यायचा नाही. म्हणजेच साफसफाई संदर्भातील कोणतीही वस्तू तुम्ही मुलीच्या पाठवणीच्या वेळी द्यायची नाही.

कारण यामुळे तिच्या जीवनामध्ये अनेक सारी दुःखे येऊ शकतात. त्यामुळे कधीही झाडू देणे तुम्ही टाळायचे आहे. तसेच आपण मुलीचे लग्न करताना अनेक वस्तू देत असतो. म्हणजेच तिच्या संसारात त्या वस्तू उपयोगी ठराव्यात अशा वस्तू देत असतो. परंतु या वस्तूमध्ये तुम्ही सुई, चाकू, सुरी, कात्री अशा टोकदार वस्तू देखील द्यायच्या नाहीत.

कारण या वस्तू जर तुम्ही दिल्या तर यामुळे मुलीच्या वैवाहिक आयुष्यामध्ये कटूता येते. त्यामुळे या टोकदार वस्तू देणे टाळायचे आहे. जेणेकरून आपल्या मुलीचा संसार सुखाचा होईल. तसेच आपल्या रोजच्या वापरामध्ये आपण पीठ चाळण्यासाठी चाळणी वापरतो आणि अशी चाळणी देखील तुम्ही आपल्या मुलीच्या पाठवणीच्या वेळी द्यायची नाही.

विवाहित मुलीला तुम्ही जर चाळणी भेटवस्तू म्हणून दिली तर यामुळे तिच्या संसारामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येऊ शकतात. जेणेकरून तिचा संसार हा सुखाचा होणार नाही. त्यामुळे तुम्ही मुलीची पाठवणी करत असताना पाठवणीच्या वेळी चाळणी अजिबात द्यायची नाही.

तर मित्रांनो वरील सांगितल्याप्रमाणे या वस्तू तुम्ही मुलीच्या पाठवणीच्या वेळी अजिबात द्यायच्या नाहीत. कारण या वस्तू जर तुम्ही दिल्या तर यामुळे मुलीचा संसार कधीही सुखाचा होणार नाही. अनेक काही ना काही अडीअडचणी, संकटे येतच राहतील. संसारामध्ये कटूता निर्माण होईल आणि तिच्या संसाराला एक प्रकारचे ग्रहणच लागेल. त्यामुळे शक्यतो करून या वस्तू देणे टाळायचे आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *