१८ एप्रिल २०२३ श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी यादिवशी काय काय सेवा करावी?

अध्यात्मिक माहिती

श्री स्वामी समर्थ आपल्या स्वामींची पुण्यतिथी यावर्षी येत्या मंगळवारी म्हणजे १८ एप्रिल २०२३ रोजी येत आहे. या दिवशी आपण स्वामींची सेवा कशी करायची आहे आणि इतर काय गोष्टी करायचे आहेत ते आपण जाणून घेणार आहोत.
मित्रांनो स्वामींनी चैत्र वद्य त्रयोदशी शके १८०० म्हणजेच मंगळवार दिनांक ३० एप्रिल १८७८ रोजी अक्कलकोट येथील वटवृक्ष मठात समाधी घेतली.

हा दिवस स्वामी भक्तांसाठी खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी आपण स्वामींची सेवा करून त्यांच्या आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे आहेत.तर सर्वप्रथम आपण या दिवशी काय करायच आहे तर आपण नेहमीच स्वामींच्या शिकवणी प्रमाणे वागतो तसं वागायचं आहे. तसेच या दिवशी सुद्धा एक काळजी घ्यायची आहे की आपल्याकडून कोणालाही त्रास होणार नाही, कुठल्याही प्रकारची वाईट काम वाईट कर्म करायची नाही, उलट दुसऱ्यांना मदत करावी दुसऱ्यांच चांगलं कसं भलं कसं होईल हे पाहायचं आहे.

आपल्याकडून कोणालाही हानी होणार नाही, कोणालाही वाईट वाटणार नाही याची काळजी घ्यायची आहे.
बरेच स्वामींचे भक्त स्वामींचे दर्शन अक्कलकोट येथे जाऊन स्वामींच्या समाधीचे दर्शन घेतात. तुम्हाला तसे शक्य असेल तर तुम्ही तसं करू शकता. नसेल शक्य तर काही हरकत नाही. तुम्ही तुमच्या जवळ असलेल्या स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घेऊ शकता.

या दिवशी आणखी एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे दिवसभर अखंड स्वामींचे नामस्मरण सतत करायचं आहे. तुम्ही कामाला वगैरे जाल किंवा तुम्ही प्रवास करत असाल किंवा काही काम करत असाल तरी ती काम करत असताना स्वामींचे नामस्मरण सतत चालू ठेवायच आहे.आपल्या जवळच्या स्वामींच्या मठात जाऊन स्वामींचे दर्शन घ्यायचे आहे.

या दिवशी तुम्ही गोरगरिबांना यथाशक्य दान करू शकता. तुम्हाला जे काही शक्य असेल, जे काही आवडत असेल ते दान देऊ शकता. अन्नदान वगैरे जे काही शक्य असेल त्या प्रकारचे दान तुम्ही करू शकता.या दिवशी काही लोक स्वामींनी समाधी घेतली त्यामुळे त्यांना तुळशीची माळ अर्पण करतात. तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही पण तुळशीची माळ अर्पण करू शकता.

मित्रांनो याप्रमाणे या दिवशी या गोष्टी करायच्या आहेत. बाकी तुम्हाला जी सेवा आवडत असेल ती तुम्ही करू शकता. जसे की स्वामींचे अध्याय वाचणे, चरित्र वाचणे किंवा नित्य सेवा तुमची जी काही असेल ती करू शकता. अजून तुम्हाला काही वाचावसं वाटत असेल स्तोत्र वगैरे तर ते तुम्ही वाचू शकता. दिवसभर आपण म्हटलं त्याप्रमाणे नामस्मरण वगैरे चालू ठेवायचे आहे.बाकी या दिवशी फार काही असं नाहीये जसं की आपण जयंतीच्या दिवशी करतो तसं काही नाही.

कारण तसा उत्सवाचा दिवस नाहीये त्यामुळे तितका असा मोठा कार्यक्रम नाहीये. जी काही आपण माहिती आपण पाहिली ते छान मनापासून, पूर्ण समर्पण भावाने पूर्ण श्रद्धेने करा. स्वामी नक्की तुम्हाला प्रत्येक कार्यात यश देतील. कायम तुमच्या पाठीशी राहतील. मनापासून स्वामींची भक्ती करा आणि स्वामींच्या ठायी पूर्ण श्रद्धा ठेवा. स्वामी तुम्हाला नेहमी सुखात आनंदात आणि सुरक्षित ठेवो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *