घटस्थापना कशी करावी? सर्वात सोपी आणि महत्त्वाची पद्धत: वाचा आत्ताच

अध्यात्मिक राशिभविष्य

मित्रांनो, काही दिवसांमध्येच नवरात्रीला सुरुवात होणार आहे. घटस्थापना कशी करावी. हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. घरच्या घरी सोप्या आणि साध्या पद्धतीने घटस्थापना करण्याची पद्धत आपण आजच्या या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. घटस्थापना करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला शेतातील काळी माती लागणार आहे. त्यानंतर एक पत्रावळी लागणार आहे. व पाच प्रकारचे धान्य देखील लागणार आहे. यामध्ये गहू व अन्य कोणतेही कडधान्य तुम्ही घेऊ शकता.

घटस्थापना करण्यासाठी आपल्याला विड्याची पाने देखील लागणार आहेत. तसेच हळदीकुंकू, इतर पूजेचे सर्व सामान लागणार आहे. त्यामध्ये मग फुलांचा हार, अभिषेकासाठी पाणी, सुट्टे पैसे अशा प्रकारचे सर्व साहित्य लागेल. घटस्थापनेची स्थापना करत असताना सर्वात प्रथम पाठाच्या किंवा चौरंगाच्या आकाराची रांगोळी काढायची आहे. रांगोळी काढून झाल्यानंतर त्यावर पाठ किंवा चौरंग ठेवायचा आहे. चौरंगावर किंवा पाटावर लाल रंगाचे वस्त्र अंथरायचे आहे.

एक ताट घ्यायच आहे. त्या ताटामध्ये पत्रावळी ठेवायची आहे. त्यानंतर आपण जी शेतातून काळी माती आणलेली आहे. ती काळी माती त्या ताटामध्ये घालायचे आहे. व जे आपण पाच प्रकारचे धान्य घेतलेले आहे. ते सर्व धान्य त्या मातीमध्ये पेरायचं आहे. त्यानंतर बरोबर मधोमध एक कलश ठेवायचा आहे. त्या कळशामध्ये सुपारी, हळदी कुंकू, सुट्टे पैसे, दूर्वा, अक्षता त्यामध्ये घालायचे आहे. घटस्थापनासाठी जो कळसाचा तांब्या आपण घेणार आहोत.

त्या तांब्याला हळदीकुंकवाची बोटे ओढायची आहेत. त्यानंतर तांब्याला विड्याची पाने लावून त्यावर नारळ ठेवायचा आहे. त्यानंतर तो घट चौरंगावर किंवा पाटावर ठेवायचा आहे. हळदीकुंकू, फुले वाहून मनोभावाने पूजा करायची आहे. हार घालायचा आहे. नऊ दिवस वेगवेगळ्या फुलांची माळ त्या कळशावर सोडायची आहे. व दररोज सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवायचा आहे. जर आपल्याला आवडत असेल तर सकाळ, संध्याकाळ घरामध्ये धूप घालायचा आहे.

जो आपण घट घातलेला आहे. त्या घटावर दिवसातून दोनदा म्हणजेच सकाळी आणि संध्याकाळी त्यावर फुलाने पाणी शिंपडायचे आहे. ज्या पद्धतीने घटातील धान्य वाढते. त्या पद्धतीनेच आपल्या घराची प्रगती वाढत असते. असे मानले जाते. या नवरात्रीच्या काळामध्ये बरेच जण उपवास करतात. काहीजण उपवास निर्जली करतात. तर काहीजण उठता बसता उपवास करतात. नवरात्रीमध्ये जे लोक उपवास करतात त्यांची उपवास दसऱ्याच्या दिवशी सोडले जातात.

वरील लेखांमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या घरच्या घरीच गटाची स्थापना करू शकता व आपल्याला सकाळ संध्याकाळ नऊ दिवस त्या गटाची आरती करायची आहे व घटाला नैवेद्य देखील दाखवायचा आहे घटस्थापना करण्याची ही साधी आणि सोपी पद्धत आहे आणि ही पद्धत शास्त्रशुद्ध देखील आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या घरच्या घरी अशा पद्धतीने घटस्थापना करू शकता

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *