पूजेच्या खोलीतील देवांनी कोणत्या दिशेला तोंड द्यावे?

वास्तूशास्त्र अध्यात्मिक

मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये हे देवघर असतेच.कारण देवघरा शिवाय घर अपूर्णच असते.घरामध्ये देवघर असले तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचे वातावरण राहते. व आपल्या घरामध्ये कोणतेही गोष्ट आपल्याला कमी पडत नाही. आपण आपल्या देवघरांमध्ये देवांची पूजा हे रोज सकाळी संध्याकाळी देखील करत असतो. पण आपल्याला आपले जे देवघरामध्ये देव आहेत त्यांची जागा व त्यांचे मूर्तीचे तोंड कोणत्या बाजूला ठेवायचे.

हे आपल्याला माहीत नसते. कोणत्या दिशेला आपण कोणते देव ठेवले आहोत हे आपल्याला माहीत नसते.यांची योग्य जागा आपल्याला माहित नसते. आपल्या देवघरा मधल्या मूर्तीचे तोंड कोणत्या बाजूला असावेत झाला तर आता आपण जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक दिशेलाच काही ना काही महत्त्व दिलेले आहे. व वास्तुशास्त्रानुसार आपण आपले देवघर ठेवायचे आहे.

प्रत्येकाच्या घरामध्ये वास्तुशास्त्रानुसारच देवघर करायला पाहिजे.जेणेकरून आपल्याला पुढे कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागणार नाही. पूजाघर हे सर्वांच्या घरातील मुख्य जागा व त्याच्या मुळे आपल्या घराचे पावित्र्य टिकून राहते.आपले घर लहान असू दे किंवा मोठेअसू दे प्रत्येकाच्या घरामध्ये देवघरे असतेस व त्याची पूजा प्रत्येक जण करत असतात.

मंदिर असलेला परिसर हा देवभक्तीने भरलेला असतो. देवघरांमध्ये जे आपल्याला देवाच्या बाबतीमध्ये लागणाऱ्या वस्तूच आपण फक्त तिथे ठेवायचे आहेत. सर्व शक्तिमान देवांना आपण शरण जाऊन त्यांची पूजा करत असतो.आपण त्यांची शक्ती व भक्ती मिळवत असतो. वास्तुशास्त्रानुसार घराचा ईशान्य कोपरा म्हणजेच परमेश्वराचे म्हणजेच की देवाचे स्थान आहे असे मानले गेलेले आहे.

वास्तुशास्त्रानुसार परमेश्वराचे स्थान असं जरी मानलं जात असलं तरी या कोपऱ्याला पूजेपेक्षा प्रथम प्रवेश मग पाणी या गोष्टीसाठी प्रथम प्राधान्य दिले आहे. कारण हि जागा पूजेची नसून पूजनीय आहे.असं सांगण्यात आलेले आहे. वास्तूचा ईशान्य कोपरा हा जास्तीत जास्त मोकळा व वजनाने हलका असावा. त्याचबरोबर कमी उंचीचा व जास्त उताराचा असावा.

आणि तो प्रसन्न देखील दिसावा. आणि तो जास्तीत जास्त करून स्वच्छ व पवित्र ठेवायचे आहे. आपले देवघर कायम आपण स्वच्छ ठेवले पाहिजे. असे असेल तरच ईशान्य दिशेचे आपल्याला जास्त फायदे मिळत असतात. आपल्यावर देव प्रसन्न होत असतात.

देवघराच्या वास्तु नुसार देवांची मूर्ती पश्चिमेकडे असतात.कारण जेव्हा तुम्ही पूजेला बसलेला असाल तेव्हा तुमचे तोंड पूर्व दिशेला असते. आता जे मी काही मूर्ती सांगणार आहे.जर त्या मूर्ती तुमच्या घरामध्ये असतील तर त्या मूर्तीची अशी तुम्ही स्थापना करायची आहे. व त्या दिशेला त्या मूर्तीचे तोंड करायचे आहे.

श्री गणेशाची मूर्ती ही देवी लक्ष्मीच्या डाव्या बाजूला व देवी सरस्वतीची मूर्ती उजव्या बाजूला ठेवावी. शिवलिंग हे एकदम लहान आकाराचे असावे. ते देवघराच्या उत्तरेकडील बाजुस ठेवावे. तुमच्याकडे हनुमान व भैरव मूर्ती असल्यास देवघरात कायम त्या मूर्ती दक्षिण दिशेला ठेवाव्यात. उत्तर दिशेला गणेश दुर्गा व कुबेर मुर्ती दक्षिण दिशेला तोंड करून ठेवाव्या. भगवान कार्तिकीय व दुर्गा देवी असेल तर त्यांचे तोंड पूर्वेला करावे.

सूर्य देवाची मूर्ती म्हणजेच की ब्रह्मा विष्णू महेश मुर्ती पूर्व दिशेला पश्चिमेकडे तोंड करून ठेवायचे आहे. आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आपल्या देवघरांमध्ये कोणत्या मूर्ती आमोरासमोर ठेवायच्या नाही. आपल्या घरामध्ये पूजा साहित्य कुठे व कसे ठेवायचे हा देखील आपल्याला प्रश्न पडलेला असतो. देवघरातील दिवा समई या आग्नेय दिशेला ठेवाव्या. धूप व अगरबत्ती स्टॅन्ड हे वायव्य दिशेला असावे. देवघरातील होम कुंड हे आग्नेय दिशेला असावे.

आपल्या देवघराला तोरण लावायचे आहे. पुजा जपतप अनुशासन पारायण हे नेहमी अग्नेय दिशेला असावे. मित्रांनो मी वरती सांगितलेला आहे की तुमची देवघर व तुमचे देव घरातले साहित्य कोणत्या दिशेला ठेवायचे आहेत तर असे केल्याने तुम्हाला तुमच्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होईल तुमच्या घरावर असलेले संकटे निघून जातिल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *