शनिवारी या वस्तू दान केल्यास अडचणी दूर होतील..

अध्यात्मिक माहिती

शनिवारचा दिवस हा शनिदेवाला समर्पित असतो. शनि देवाची कृपा असेल तर कोणतेच काम थांबून राहत नाही. तेच जर शनिदेव अशुभ स्थितीत असेल तर अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते. जर तुम्हाला तुमच्या कामांमध्ये यश मिळत नसेल, तर शनिवारच्या दिवशी शनिदेवाच्या काही प्रिय वस्तू दान करण्याचे विशेष महत्त्व सांगितले आहेत. शनिवारी कर्मदेवता शनीला प्रसन्न करण्याचे अनेक उपाय आहेत.

शनिवारी केलेल्या या उपायांनी सगळ्या अडचणी दूर होतात, म्हणून शनिवारी या गोष्टींचे दान करून शनी देवाचा आशीर्वाद मिळवा. चलातर मग जाणून घेऊयात कोणत्या वस्तू शनिवारी दान केल्या पाहिजेत. जर तुम्ही शनिच्या साडेसाती त्रासलेली असाल तर शनिवारी सकाळी सकाळी पंचामृत आत काळे तीळ घालून शंकराला अर्पण करावे आणि कष्ट निवारणाची प्रार्थना करावी.

असे मानले जाते शनिवारी हा उपाय केल्याने शनिदेव कृपेने सगळी कामे व्यवस्थित होते. तसेच शनिवारी असाह्य म्हाताऱ्या व्यक्तीस, गरीब व्यक्तीला अन्नदान करावे यामुळे शनि देवाची कृपा मिळते त्या कामात येत असलेल्या अडचणी सुद्धा दूर निघून जाते. शनीची पीडा असेल तर मोहरीच्या तेलात स्वतःचा चेहरा बघून एखाद्या गरजू व्यक्तीला येथील दान करावे.

असे केल्याने शनीचा कोप दूर होतो आणि आपल्या मागची पीडा कमी होते. सोबतच शनिवारी मोहरीचा तेलाचा दिवा लावावा. ज्यामुळे शनीशी संबंधित त्रास दूर होतो. मात्र शनिवारी कधी तेल खरेदी करू नये. शनिवारी गरजू व्यक्तीला काळ्या रंगाचे कपडे, ब्लँकेट, लोकरीचे कपडे हे दान करावे असे केल्याने शनीची स्थिती शांत होते.

सोबतच चप्पल, बूट दान केल्याने शनीदेवाची विशेष कृपा प्राप्त होते असे म्हटले जाते. काळे तीळ, मोहरीचे तेल आणि काळे फळ, काळ्या रंगाच्या वस्तू तुम्ही दान केल्याने शनि दोषापासून मुक्ती मिळते आणि शनिदेव प्रसन्न होण्यास सुरुवात होते. शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी घाला. गव्हाच्या पिठाचे दिवे लावावे आणि अगरबत्ती लावून मनोभावे नमस्कार करावा,

हा उपाय तुम्हाला शनिवारी संध्याकाळी करायचा आहे.महत्त्वाची गोष्ट शनिवारी लोखंडी वस्तूंचे दान करा. कारण शनिवारी लोखंडी वस्तूंचे दान करणे शुभ मानले जातात. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की, शनिदेव लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देत असतात। तुमच्या कुंडलीत शनि दोष असेल तरच सांगितलेले हे उपाय करून शनिदेवाला प्रसन्न करा आणि त्यांचा शुभाशीर्वाद मिळवा..

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *