स्वामी सांगतात ज्यांच्या देवघरात ह्या 4 वस्तू आहेत त्यांच्या घरी कधीच कशाचीही कमी पडत नाही!

अध्यात्मिक

मित्रांनो, स्वामी म्हणतात ज्यांच्या घरातील देवघरात ह्या 4 गोष्टी असतात त्यांच्या घरात कधीही कोणतीच गोष्टीची कमी पडत नाही. तिथे नेहमी भरभराट राहते. तिथे नेहमीच चांगले घडत राहते. आपल्या देवघरात म्हणजे आपण जिथे दररोज देवपूजा श्रद्धा व मनोभावाने करतो. त्या ठिकाणी आपल्या आपण इच्छा सांगतो. आपण आपल्या समस्या सांगतो. जिथून आपल्याला शक्ती मिळते, प्रेरणा मिळते. सकारात्मकता मिळते. अश्या पवित्र ठिकाणी जिथून आपल्याला आशीर्वाद मिळतो. जिथून आपल्याला शक्ती मिळते संपूर्ण घराला वाईट शक्ती पासून वाचवण्याची शक्ती मिळते अश्या देवघरात श्री स्वामी समर्थांनी सांगितलेल्या ह्या 4 गोष्टी आपण आपल्या देवघरात ठेवल्याचं पाहिजेत.

मित्रांनो, यातील पहिली वस्तू आहे ती म्हणजे चंदनाचे लाकूड. चंदन हे शांती व शीतलतेचे प्रतीक आहे. चंदनाचे खोड, लाकूड हे आपल्या देवघराच्या ठिकाणी जरूर ठेवावे. चंदनाच्या फक्त वासानेच आपले मन अगदी प्रसन्न होते. ह्या सुवासिक चंदनाने आपले मानतील वाईट विचार नाहीसे होतात. चंदनाला शाळीग्राम किंवा शिवलिंगावरती लावतात. चंदनाचा एक टीका आपण दररोज लावावा. हा लावल्याने आपले कपाळ, डोके शांत राहते. जर आपल्या घरात चंदन असेल तर आपल्या घरात शांती व समाधान नेहमी राहते. म्हणूनच आपल्या देवघरात थोडेसे तरी चंदन असायलाच हवे.

दुसरी वस्तू आहे शंख. मित्रांनो ज्या घरातील देवघरात शंख असतो त्या घरात लक्ष्मी हि नांदतेच. शंख हे सूर्य आणि चंद्र देवासारखे आहेत. याच्या मध्यभागी वरून मागील बाजूस ब्रहमदेव व पुढील बाजूस गंगा आणि सरस्वती ह्या नद्या आहेत. आपल्याला जे लाभ तीर्थक्षेत्रापासून मिळतात. तेच लाभ शंखाच्या पूजेने मिळतात. म्हणून आपल्या देवघरात एक तराई शंख आपण जरूर ठेवावा.

त्याची आपण दररोज पूजा करावी. मित्रांनो तुम्हाला हा शंख कोणत्याही पूजेच्या साहित्याच्या दुकानांमध्ये सहज उपलब्ध होईल. तिथून तुम्ही आणू शकता किंवा जर तुम्ही एखाद्या मोठ्या तीर्थक्षेत्रातून किंवा देवस्थानमध्ये दर्शनासाठी गेला तरी तिथेही तुम्हाला पूजेच्या साहित्य बरोबर हे देखील सहज मिळून जाईल. तिथून तुम्ही हे खरेदी करू शकता.

मित्रानो तिसरी वस्तू खूप महत्वाची आहे ती म्हणजे शिवलिंग. आपण आपल्या देवघरात शंकराची मूर्ती किंवा शंकराचा फोटो आपण देवघरात ठेवत नाही. त्याची पूजा करत नाही. मात्र आपण महादेवाची पिंड आपण पूजत असतो. म्हणून शिवलिंग आपल्या घरात असायलाच हवे. शिवलिंग हीच आपल्या घरातील देवपूजेसाठी योग्य मानली जाते.

शिवलिंग आपल्या घरातील देवघरात ठेवल्याने आपल्या घरातील ऊर्जा हि संतुलित राहते. आपल्या घरात साकारत्मकता टिकून राहते. आपल्या घरात वाईट शक्ती येण्यापासून वाचवते. म्हणूनच आपल्या घरात शिवलिंगाची मूर्ती ठेवावी.

चौथी गोष्ट आहे ती म्हणजे कवडी. खूप आधीच्या काळापासून प्राचीन काळापासून प्रचलित असलेलं उपाय आहेत. यामुळे आपल्याला माता लक्ष्मीची कृपादृष्टी प्राप्त होते. आपल्या घरात पिवळ्या रंगाची कवडी आपण लाल कलरच्या कापडामध्ये बांधून आपल्या देवघरात किंवा आपल्या तिजोरीत ठेवले तर ह्याने आपल्याला भरपूर लाभ मिळतो.

तर तुम्ही प्रयत्न करा कि, तुम्हाला पिवळ्या रंगाच्या कवड्या मिळतील जर नाही मिळाल्या तर पांढऱ्या रंगाच्या कवड्या देखील चालतील.तर मित्रानो ह्या ४ वस्तू आपल्या देवघरात नक्की ठेवा. आपल्याला नक्कीच फायदा होईल आणि त्याचबरोबर तुमच्यावर स्वामी समर्थ आणि लक्ष्मी माता प्रसन्न होतील आणि यांच्या आशीर्वादामुळे तुमच्या सर्व अडचणी दूर होतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *