या 5 जागेवर चुकूनही घर बांधू नका, नाहीतर…

अध्यात्मिक माहिती

तुम्ही जर तुमच्या स्वप्नातील घराचं बांधकाम करायचा प्लान करत असाल? तर नक्कीच वास्तू नियमांची माहिती करून घेणेही गरजेचे आहे. घराचे बांधकामाचे वेळी काही नियमांची काळजी घेतली पाहिजे. कारण 5 घटकांवर आधारित वास्तू नियम आपल्याला आनंद आणि समृद्धी देतो.

जेव्हा घरात वास्तुशास्त्रानुसार गोष्टी केल्या जातात तेव्हाच घरात सुख शांती आणि आनंद नांदतो. याच प्रमाणे घराच्या बांधकामाच्या वेळी चुकीच्या दिशेने ठेवलेल्या गोष्टीसुद्धा गंभीर वास्तुदोष निर्माण करू शकतात. शिवाय ज्योतिष शास्त्रानुसार असा 5 ठिकाणी कधी घर बांधू नये त्यामुळे आपल्या घरातच श्मशान बनायला वेळ लागत नाही, असं म्हणतात.

चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत अशा 5 जागा ज्यावर आपण घर कधी बांधू नये.. ज्योतिष शास्त्रामध्ये जीवनाशी संबंधित सर्व समस्या आणि वास्तू दोषांसाठी वेगवेगळे उपाय सांगितले गेले. त्याचा अवलंब केल्यामुळे आपलं जीवन आपलं घर त्याप्रमाणे सुंदर आणि सौभाग्य शाली होण्यास मदत मिळते.

त्याचप्रमाणे आचार्य चाणक्य सांगतात की, जर कोणाला जीवनात शांती हवी असेल तर अशा ठिकाणी निवास करू नये, त्यामुळे तू रात्रंदिवस संकटांनी घेरलेले असाल आणि एकामागून एक अडचणी तुमच्या समोर येत राहतील आणि त्यामुळे तुमचं घर स्मशान बनायला वेळ लागणार नाही.

तर आचार्य चाणक्य सांगतात पहिली अशी जागा या ठिकाणी कधीही घर बांधू नये. जिथे तुमच्या कुटुंबाचे पालन पोषण आहे आणि उदरनिर्वाहाचे साधन निर्माण होऊ शकत नाही अशा ठिकाणी कधीही घर बांधू नये. कारण घराचे उभारणीसाठी अशी जागा निवडली पाहिजे तिथे उपजीविका सहज चालू शकेल.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आचार्य चाणक्य सांगतात की, सार्वजनिक लज्जेची भीती नसलेल्या ठिकाणी कुटुंबासाठी घर बांधणे कधीही टाळावं. अशा ठिकाणी घर बांधले पाहिजे तिथे सामाजिक भावना आणि मूल्यांचा आदर केला जातो. सामाजिक प्रतिष्ठेला समाजात स्थान असले पाहिजे अशा ठिकाणी आपण घर बांधावं.

तिसरी महत्त्वाची गोष्ट आचार्य चाणक्य सांगतात की, घर अशा ठिकाणी बांधायला हवं जिथे परोपकारी लोक राहतात आणि त्यागाची भावना ठेवतात. घर नेहमी अशा ठिकाणी असायला पाहिजे, जिथे लोक परोपकार यावर विश्वास ठेवतात. जिथे परोपकार यावर विश्वास ठेवणारे लोक नसेल त्या ठिकाणी अजिबात घर बांधू नये.

चौथी महत्त्वाची गोष्ट आचार्य चाणक्य सांगतात की, अशा ठिकाणी सर्वांना योग्य असतं जिथे लोकांना दान आणि पुण्यावर विश्वास ठेवतात दान करून पुण्य मिळतात त्यामुळे आपला आत्मा शुद्ध होतो. दान करणाऱ्या लोकांमध्ये राहण देखील आध्यात्मिक मिळवून देत. म्हणूनच अशा लोकांमध्ये निवास करणं कधीही शुभ असत,  जिथे लोक दान करत नाहीत आणि लोकांसोबत हेळसांड करतात अशा ठिकाणी कधीही राहू नये.

त्यानंतर पाचवी महत्त्वाची गोष्ट अशी आचार्य चाणक्य सांगतात की, आपलं घर कधीही दुष्कृत्य आणि पापामध्ये सामील असलेल्या लोकांमध्ये बांधू नये. कायद्याची भीती नसलेल्या म्हणजेच कायद्याचा धाक नसलेल्या लोकांमध्ये किंवा अशा ठिकाणी स्थायिक होण्यापासून नियमित दूर राहावं. जिथे लोक कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्णपणे पालन करत नाहीत.

जिने कायद्याचं पालन केलं जातं अशा ठिकाणी घर बांधत कधीही चांगलं, असं आचार्य चाणक्य द्वारे सांगण्यात येतं. तर जीवनात कधीही आपल्या स्वप्नांच घर बांधायचं असेल तर अशा 5 जागा ज्यामध्ये कधीही घर बांधू नये हे लक्षात ठेवायला हवं. मात्र याही व्यतिरिक्त तुमच्याकडे उपाय नसेल तर अशा ज्योतिष तज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा..

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *