मृत्यु झाल्यानंतर लावलेला दिवा कोणते संकेत देतो?

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो, माणूस जन्माला आला की त्याचा मृत्यू अटळ असतो. मृत्यू झाल्यानंतर अनेक विधी देखील करत असतो. व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर दहा दिवस जो दिवा ठेवला जातो. तो दिवा काही पुनर्जन्माचा संकेत देतो का? दहा दिवस पिठावर दिवा ठेवतो. नंतर दहाव्या दिवशी जेव्हा आपण तो दिवा उचलतो. तर खाली तयार झालेली आकृती त्या व्यक्तीचा पुनर्जन्म सांगत असते असे आपण म्हणतो. पण सत्य आहे का?

जगामध्ये हिंदू हा असं एक हिंदू शास्त्र आहे की ज्यामध्ये पुनर्जन्माचा सिद्धांत आणि परलोक विद्या या दोन्हींची परिपूर्णता दिसून येते. म्हणूनच गर्भात असणाऱ्या जीवाचा जन्म होण्यापूर्वीच विविध संस्कारांनी स्वागत केलं जातं. त्याचं निर्गमन होताच आदेष्टीच्या रूपाने तितक्याच सन्मानाने निरोप ही दिला जातो.

मृत्युनंतर शवाला ओवाळण्यात येणाऱ्या पणतीच्या ज्योती मध्ये गत व्यक्तीचा चैतन्यमय आत्मा संक्रमित होतो अशी संकल्पना आहे. ज्याप्रमाणे नैमित्तिक पूजेमध्ये ताम्हंणातील तांदळाच्या ढिगावर दैवतांना स्थान दिलं जातं. त्याचप्रकारे धान्याच्या गोलाकार पिठावर दिवा दहा दिवस ठेवतात.

दिव्या शेजारी पहिल्या दिवशी जलपात्र आणि दुसऱ्या दिवशी जलपात्रा बरोबर भोजनाच्या वेळी भाताचा पिंड किंवा दुधाची वाटी देखील ठेवली जाते. ही एक प्रकारे मृतात्म्याला प्रवासासाठी दिलेली शिदोरीच असते. दहा दिवसापर्यंत केल्या जाणारे अवयव श्रद्धांनी लिंग देहाची परिपूर्ती होते.

दहाव्या दिवशी उपरोत दिवा नदीवर क्रिया क्रमाचा ठिकाणी येऊन तिथे विसर्जिन केला जातो. त्यामुळे नऊ दिवसांमध्ये पूर्णतहास आलेला लिंगदेह चैतन्यमय होऊन प्रेतात्माचा पुढील परलोक प्रवास सुरु होतो. अशी एक संकल्पना आहे. दिवा लावण्यामागे उपरोक्त मूळ संकल्पना असून याविषयी समाजा मध्ये काही समजुती प्रचलित आहेत.

यामध्ये प्रामुख्याने दहाव्या दिवशी दिवा उचलल्यावर त्याखाली उमटलेल्या ठसावरून तो आत्मा कोणत्या योनीत गेला आहे हे ठरवले जातं. ही समजूत योग्य नाही. कारण खाली पिठावर उठलेली आकृती ही पणतीच्या खालच्या खडबडीत भागामुळे उमटलेली असते. त्या आककृतीचा परलोकांशी किंवा पूनार्जन्माची काहीही संबंध नसतो.

अनेक ठिकाणी निधन पावल्यास अपरिहार्य कारणास्तव दहा दिवसांना ऐवजी एक दिवस दिवा ठेवल्यास काही हरकत नाही. दहा दिवसांच्या काळात दिवा कधी विजला तर पुन्हा प्रज्वलित करावा. त्यात कोणताही दोष नसतो किंवा अपशगुन नसतो. व्यक्तीच्या मृत्यूनंतर श्राद्धपक्ष मात्र व्यवस्थित करावा.

त्यामुळे आत्म्याला सद्गती मिळते. असं म्हटले जाते. व्यवस्थित विधीपूर्वक घरात श्राद्धपक्ष केले जातात. यामुळे त्या घरातील लोकांना पितृदोषचा त्रास होत नाही असेही म्हटले जाते.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *