तुमच्या घरात घड्याळ आहे का? या दिशेला लावले तर होईल भरभराट !

अध्यात्मिक राशिभविष्य वास्तूशास्त्र

मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये घड्याळ हे असतेच. वेळ पाहण्यासाठी आपणाला घड्याळाची आवश्यकता असते. मित्रांनो घड्याळ हे आपली वेळच सांगत नाही तर घरातील लोकांचे सुख दुख आणि शुभ अशुभ काळ ही त्यांच्याशी संबंधित असतात. तर मित्रांनो आपल्या घरामध्ये जे घड्याळ असते ते योग्य दिशेला असणे खूपच गरजेचे आहे.

कारण जर घड्याळ अयोग्य दिशेला नसेल तर यामुळे आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे घड्याळ हे योग्य दिशेलाच असणे खूपच गरजेचे आहे. तसेच मित्रांनो घड्याळाचा कलर तसेच घड्याळाचा आकार देखील योग्य तो असणे गरजेचे आहे. तर मित्रांनो आज मी तुम्हाला घड्याळ हे नेमके कोणत्या दिशेला असावे, तसेच त्याचा रंग आणि त्याचा आकार कसा असावा याविषयीची माहिती सांगणार आहे.

मित्रांनो येणाऱ्या नवीन वर्षांमध्ये तुम्ही जर आपल्या घरामध्ये नवीन घड्याळ खरेदी करणार असाल तर या घड्याळाचा रंग आणि आकार याची आवश्य काळजी घ्यायची आहे आणि घरात आल्यानंतर वास्तू नुसार हे घड्याळ योग्य दिशेला ठेवायचे आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तसेच मित्रांनो आपल्या घरातील सदस्य हे आनंदी कायम राहतील.

तर मित्रांनो आपण आता जाणून घेऊयात की घड्याळ नेमके कोणत्या दिशेला लावावे? तर मित्रांनो घड्याळ लावण्यासाठी पूर्व दिशा खूपच उत्तम मानली गेलेली आहे. जर तुम्ही घड्याळ पूर्व दिशेला लावले तरी यामुळे आपल्या घरातील वातावरण हे शांत राहते.

तसेच मित्रांनो तुम्ही तुमच्या घरातील पश्चिम आणि उत्तर दिशेलाही घड्याळ लावू शकता. परंतु मित्रांनो तुम्ही घड्याळ दक्षिण दिशेला अजिबात लावायचे नाही. कारण यामुळे आपल्या घरामध्ये वातावरण हे नकारात्मक होऊ शकते आणि अनेक अडचणींना देखील सामोरे जाऊ लागू शकते. तसेच मित्रांनो आपल्या घराच्या बाल्कनीत किंवा वरांड्यात घड्याळ अजिबात लावायचे नाही. तसेच दरवाजाच्या अगदी वर घड्याळ ठेवणे देखील अशुभ मानले गेलेले आहे.

मित्रांनो ही झाली आपल्या घरात घड्याळ लावण्याची योग्य दिशा. तर मित्रांनो घड्याळ घेताना तुम्हाला रंगाचा देखील विचार करावा लागणार आहे. तर मित्रांनो घरामध्ये जर तुम्ही केशरी किंवा गडद हिरव्या रंगाचे घड्याळ जर आणले तर यामुळे नकारात्मक ऊर्जेचा संचार आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणात वाढतो.

तसेच मित्रांनो निळ्या आणि काळ्या रंगाचे घड्याळ देखील घरासाठी खूपच अशुभ मानले गेलेले आहे. तसेच मित्रांनो गडद लाल रंगाचे घड्याळ देखील खरेदी करणे तुम्ही टाळायचे आहे. तर मित्रांनो तुम्ही तुमच्या घरासाठी पिवळे, पांढरे आणि हलक्या तपकिरी रंगाचे घड्याळ खरेदी करायचे आहे आणि हे आपल्या घरासाठी खूपच शुभ मानले गेलेले आहे.

जर तुम्ही उत्तरेकडील भिंतीवर घड्याळ लावत असाल तर मेटलिक ग्रे किंवा पांढऱ्या रंगाचे घड्याळ चांगले मानले जाते.
तसेच मित्रांनो पूर्वेकडील भिंतीवर लाकडी घड्याळ किंवा तत्सम रंगाचे घड्याळ लावावे. घड्याळासाठी रंग निवडताना, अगदी हलके रंग निवडले तर आपल्यासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे. गडद रंगाचे घड्याळ घरामध्ये कधीही लावायचे नाही.

तर मित्रांनो आता वास्तुशास्त्रानुसार घड्याळाचा आकार कसा असावा याविषयी माहिती जाणून घेऊयात. तर मित्रांनो घरात आठ हात असलेले घड्याळ ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये एकोपा वाढतो आणि घरगुती कलह दूर होतो. तसेच घरासाठी सहा हात असलेले घड्याळ देखील शुभ मानले जाते. आपण ते लिव्हिंग रूममध्ये ठेवू शकता.

गोल आकाराचे घड्याळ देखील अतिशय शुभ मानले जाते. आपण ते घराच्या कोणत्याही खोलीत ठेवू शकता. विशेषत: अभ्यास कक्षात लावल्याने मुलांचे अभ्यासात लक्ष केंद्रित होते. जर पती-पत्नीमध्ये प्रेम नसेल, त्यांच्यात कायम वाद-विवाद होत असतील तर तुम्ही बेडरूममध्ये हृदयाच्या आकाराचे घड्याळ लावणे खूप शुभ असते. यामुळे पती-पत्नीमधील प्रेम वाढते. वास्तुशास्त्रानुसार अंडाकृती आकाराचे घड्याळ सर्वात शुभ मानले जाते. यामुळे परस्पर मतभेद दूर होतात आणि आशीर्वाद मिळतात.

तसेच मित्रांनो घरामध्ये त्रिकोणाच्या आकाराचे घड्याळ अजिबात लावायचे नाही. या आकाराचे घड्याळ आपल्या घरामध्ये खूप जास्त प्रमाणात नकारात्मक ऊर्जा वाढते. तसेच आपल्या घरामध्ये मग भांडणे, वादविवाद होत राहतात. त्यामुळे अशा आकाराचे घड्याळ तुम्ही आपल्या घरामध्ये अजिबात लावू नका.

तर मित्रांनो तुम्ही देखील नवीन वर्षांमध्ये घड्याळ खरेदी करणार असाल तर मित्रांनो त्या घड्याळाचा आकार, रंग हे सर्व लक्षात घेऊन त्याप्रमाणे घड्याळ खरेदी करा आणि ते आपल्या घरामध्ये योग्य त्या शुभ दिशेला लावा. यामुळे आपल्या घरामध्ये वातावरण हे आनंदी राहील. सर्वजण एकोप्याने राहतील आणि कोणत्याच अडचणींचा तुम्हाला सामना करावा लागणार नाही.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *