दररोज पुण्य साठवायचे असेल तर जेवणाआधी हे पाच घास नक्की काढून ठेवा

अध्यात्मिक माहिती

आपण जेवणा पूर्वी देवाला नैवेद्य अर्पण करतो. का? तर पंच यज्ञाच फळ प्राप्त व्हावं म्हणून. याशिवाय अन्य लघु पायोस्ती भुतले अर्थात पंचमहायज्ञाची प्रतीक म्हणून पाच घास ठेवावेत किंवा प्रतिनिधी म्हणून अग्नीला तूप समर्पण करावं असं शास्त्र सांगत. हे पाच नैवेद्य दाखवण्यामागे ही लौकिक फायदे पुष्कळ आहेत असं सांगण्यात येत.

चला तर मग जाणून घेऊया की जेवणाआधी हे पाच घास का काढावेत आणि ते कोणासाठी काढावेत. आपण स्वयंपाक घरात रोज अन्न शिजवतो. त्यासाठी कापने, चिरणे, कुटणे, दळणे, उकळणे इत्यादी क्रिया नित्यनेमाने घडत असतात. त्या क्रिया करत असताना अनेक जीवजंतूंची हत्या आपल्या हातून नकळतपणे घडत असते.

त्या जीवांच्या हत्येची पातक लागू नये याचाही सखोल विचार हिंदू धर्मशास्त्राने केला आहे. त्यावर पाच यज्ञांची प्रायश्चित्त सांगितले गेले. ते यज्ञ म्हणजे ब्रह्म यज्ञ, पितृ यज्ञ, देव यज्ञ, भूत यज्ञ आणि गृही यज्ञ. सध्याच्या स्थितीत हे पंचयज्ञ कोणाला माहित नाही आणि कोणी करतही नाही. त्यावर धर्मशास्त्राने एक पर्याय दिलाय तो म्हणजे भगवंताला नैवेद्य दाखवण्याचा.

आपण जेवणापूर्वी देवाला नैवेद्य अर्पण केला असता पंचयज्ञाचे फळ प्राप्त होत असे सांगितले जाते. याशिवाय अन्य लघु पायोस्ती भूतले अर्थात पंच महायज्ञाची प्रतीक म्हणून पाच घास ठेवावेत किंवा प्रतिनिधी म्हणून अग्नीला तूप समर्पण करावं असंही शास्त्र सुचवतं. जेवनाआधी गोग्रास म्हणजेच शिजवलेले अन्न गाईला घालावे.

पितृ कार्यात काक बळी अर्थात कावळ्याला नैवेद्य दिल्याशिवाय जेवले जात नाही असा नियम आहे. याशिवाय निसर्गातील अन्य जीव जिवांना तृप्त करून मग आपण जेवावं असा उदात्त विचार देखील या पाच नैवेद्यामागे सांगितला गेलाय. त्याशिवाय पाच नैवेद्य दाखवण्यामागे लौकिक फायदे ही पुष्कळ आहेत. ती एक प्रकारे विष परीक्षेचे साधनच मानल जाते.

पूर्वीच्या काळी राजा महाराजांना अन्नातून विष देण्याचे प्रकार होत होते. अन्नात विष असेल तर आपण ठेवलेल्या घासावर बसलेल्या माशा मरतील किंवा मृतवत होतील असा त्याचा उद्देश असतो. याशिवाय जेवणापूर्वी अग्नीला घास समर्पित करतो आणि देवता अग्निमुखाने घास भक्षण करतात ही आपली देवपूजा पूर्ण होते.

पण अन्न जर विषारी असेल तर निळसर ज्वाला निर्माण होईल आणि सर्वत्र दुर्गंध पसरेल हा त्यामागचा उद्देश असतो. काक बळी अर्थात कावळ्याला नैवेद्य देण्याचा फायदा असा की कावळा कधीही विषारी अन्न खात नाही. त्यामुळे भोजन करणारा सावधान होतो. आणखीही काही परीक्षा आहेत जसं की माकडाला जर विषारी घास दिला तर माकड वाकडे तिकडे तोंड करतो, उसळ्या मारतो, चंचल बनतो. चकोर पक्षाला असा विषारी घास मिळाला तर त्याचे डोळे लाल होतात.

आयुर्वेदात या गोष्टींचं निरूपण आलेले दिसत. आता भोजनात विष नसले तरी ताटा पुढे घास ठेवण्याचा आणखीही एक फायदा आहे बर का. जर त्या ठिकाणी मुंग्या हिंडत असतील तर त्या जेवणाच्या ताटात येण्याची शक्यता असते. जर हे पाच घास ताटापुढे ठेवले असतील तर मुंग्या घासाभोवती गोळा होतील जेवणाच्या ताटात येणार नाहीत.

गोग्रास नियमित ठेवला पाहिजे त्यामुळे गाईचे पालन पोषण होते. घास ठेवल्यावरही आचमन भरून भोजन सुरू करावं. ‘आश्र्नीयाद आचम्य प्रडमुख शुचि:’. आचमनाने तोंडात ओलावा निर्माण होतो आणि चावलेला घास गिळन सहज शक्य होत. म्हणून जेवन वाढल्यावर लगेच जेवायला सुरुवात न करता हे पाच घास ताटाभोवती काढून परमेश्वराचे नामस्मरण करावे असं सांगण्यात येत. याशिवाय श्लोक म्हणावा आणि मगच जेवायला सुरुवात करावी.

या गोष्टीवरून हिंदू धर्मशास्त्रात किती सूक्ष्म गोष्टींचा अभ्यास केला गेलाय हे दिसून येत आणि आपणही हे धर्माचन करताना जेवणा आधी जर ताटाभोवती अगदी छोटे छोटे पाच घास ठेवण्याचा प्रारंभ केला तर जेवणानंतर ते घास आपणच उचलून पशु पक्षांना घालावे. ते घास दिल्याने आपल्याला पुण्य मिळेल आणि ते साठवून ठेवता येईल. जर दररोज पुण्य साठायचे असेल तर जेवणाआधी हे पाच खास तुम्ही नक्की काढून ठेवावे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *