मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात विविध धार्मिक उपक्रम, पूजा, अर्चना सांगितलेल्या आहेत. बरेचजण आजही अनेक प्रथा, परंपरा पाळीत आहेत. परंतु काहीजण ही अंधश्रद्धा म्हणून याकडे दुर्लक्ष करीत असतात. आपण आपल्या देवघरात अनेक देवी देवतांची पूजा करीत असतात.
या देवघरात अनेक प्रकारच्या देवी देवतांच्या मुर्त्या,फोटो असतात. यांची आपण विधीवत पूजा करतो. आपल्या प्रत्येकाची कोणती ना कोणती कुलदेवता कुलदेवी ही असतेच. अगदी रोजच्या पुजेतही कुळदेवी-देवतेच्या पुजेला अनन्य साधारण महत्व देण्यात आलेले आहे.
पण हे कुळ देवी किंवा देवता म्हणजे नक्की काय असतं? हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नाही. तर कुळदेवी-देवतेच्या पुजेला एवढं काय महत्व आहे जाणून घेऊया. हल्लीची तरूणपिढी या सगळ्या गोष्टी विसरली आहे. अनेकांना तर आपली कुलदेवता कोणती आहे हे देखील माहिती नाही.
तर कुळदेवता म्हणजे काय? तर प्रत्येकाच्या कुटुंबाची कुठून तरी सुरूवात झालेली असेल हे सर्वमान्य सत्य आहे. एका समुहापासून हा वंश वाढत वाढत तुमच्या पिढीपर्यंत आला असेल. तर जिथून हा वंश सुरू झाला त्यांच्यापासून एका ठराविक देवतेची पुजा पिढी दर पिढी चालत आलेली असते. पिढ्यानपिढ्या याची पूजा केली जाते. त्याला कुळदेवी किंवा देवता म्हणतात.
कुलदेवतेची उपासना, पूजा केल्याने त्याचे सकारात्मक फळ मिळतात. अनेक अडीअडचणी पासून कुलदेवता आपणाला बाहेर काढते. आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदते.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.