कुलदैवत कसे ओळखावे, आपल्या कुलदैवता विषयी संपूर्ण माहिती…?..

माहिती वायरल

हिंदू धर्मामध्ये कुलदैवताला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत की कुलदैवत म्हणजे काय किंवा कुलदैवत कसे ओळखावे, यासंबंधीची सविस्तर माहिती होय. शास्त्रानुसार कुलदैवताचे स्थान निरंतर आपल्या जवळ असावे आणि ज्या प्रकारे आपण आपल्या घरातील वडीलधार्‍या मंडळींची सेवा करतो त्याच प्रकारे आपल्या हातून कुलदैवताची सेवा आणि मान सन्मान केला जावा.

याच संकल्पनेतून कुलदैवतांच्या टाकाची निर्मिती झाली असावी. त्यामुळेच घराघरात कुलदैवतांचे टाक करून पिढ्यानपिढ्या पुजले जातात. या देवघरातील टाकाची संख्या 5, 7, 9 आणि 11 अशा वेगवेगळ्या अंकात आढळते. ती त्या कुलाची आणि दैवताचे असतात. त्यामुळे कुलदैवता टाकाच्या स्वरूपातच पुजावे असा परंपरेनं सांगितल्या जातात आणि हे सर्व धातूपासून बनलेले असतात.

चांदीच्या पत्र्यावरील कुलदैवताची प्रतिमा तयार केलेली असते, पंचकोणी अशा या टाकाच्या बाजूला लावून तांब्याची पाठही बसवलेली असते. तसेच त्यांची संख्या ही नेहमी विषम असावी असं मानलं जातं. जशी ही संख्या वेगवेगळी असते, अगदी तसंच विविध देवघरात विविध देव आढळतात.

कुलस्वामी, कुलस्वामिनी, क्षेत्रपाल, ग्रामदेवी आणि अध्य यक्षपुरुष इत्यादी दैवतांचा समावेश होतो. कुटुंबाचा कुळ नेमका कुठला आहे, त्याप्रमाणे कुलदैवत ठरतं. महाराष्ट्राचा विचार केल्यास खंडोबा हा कुलस्वामी जवळपास प्रत्येक घरात आपल्याला दिसून येतो, तसंच महालक्ष्मी, रेणुका माता किंवा सप्तशृंगी किंवा आई भवानी अशा वेगवेगळ्या कुलस्वामिनी आपल्याला विभागून दिसून येतात.

लक्ष्मीआई, काळीई, जनाई आणि बोलाई अशा अनेक नावांनी ही देवता ओळखली जातात आणि त्यांमधून यांनाही पुजले जातात. ज्योतिबा, रवळनाथ, वीर असे अनेक पुरुष देवही घरातल्या आपल्या टाक्यांमध्ये असतात. महाराष्ट्रात काही परिवार असे आहेत, जे आपल्या पूर्वजांना टाक म्हणून देवघरात ठेवतात. वेताळ किंवा मुंजा अशा लोक प्रचलित दैवतांना देखील काही कुळांमध्ये देवघरा स्थान मिळते.

एकंदर तुमचं कुळ आणि तुमचं निवासाचा परिसर किंवा कुळाचे उगमस्थान या सर्व घटकांचा परिणाम घरातल्या टाकाच्या रचनेवर होतो. आपल्या कुळाचे घरच्या देवघराची गुणधर्माची आणि परंपरांची माहिती प्रत्येक परिवाराला असणे गरजेचे आहे. जर आपल्या देवघरातील टाक हे खंडित किंवा भग्न किंवा देवघर अपूर्ण असतील तर ही दैवते पूजेस निषिद्ध मानली जातात.

परंपरेनुसार आपले घर परिपूर्ण असावे आणि टाक हे नेहमी योग्य संख्येत असावे आणि एकच देवतेच्या अनेक प्रतिमा नसाव्यात. बनशंकरी किंवा बनेश्वर सिंहासनावर बसलेली आणि 8 हात असलेली देवी तसेच काळुबाई बद्दल सांगायचं झालं, तर फक्त मुखवटा आणि मोठा गजरा घातलेला. याशिवाय, अन्नपूर्णा म्हणजे हातात पळी असलेली देवी, महिषासुरर्दिनी म्हणजे 8 हात असणाऱ्या रूपातील देवी.

याशिवाय रेणुकामाता म्हणजे मुखवटा किंवा तांदळा. एकविरा आई म्हणजे मुखवटा किंवा एक बाण आणि मोठे डोंगराचे निशांण. आंबेजोगाई म्हणजे मुखवटा आणि हनुवटीवर असलेला आडवा चेहरा. तसेच यल्लमा म्हणजे 10 हात आणि डोक्यामागे चक्र, लक्ष्मी म्हणजे मागे 2 हत्ती सोंडेने हार घालताना. जोतिबा म्हणजे समोरून हातात तलवार घेऊन स्वार असलेला नवनाथ म्हणजे 9 दैवता होय.

मुंजोबा म्हणजे उभा रागीट पुरुष, एका हातात अग्नी. भैरोबा म्हणजे हातात तलवार आणि घोड्यावर स्वार. वाघजाई म्हणजे 8 भुजा असणारी वाघावर स्वार असलेली देवी. तसेच वीर म्हणजे धनुष्यबान धारण केलेला देवी, सप्तशृंगी 18 हात असणारे देवी, अजूनही अनेक देवता आमच्याकडून सुटले असण्याची शक्यता आहे.

देवघरातले टाक रोज पाण्याने धुतल्यावर सुती कपड्याने कोरडे करावेत, गंध आणि अक्षता वाहताना कोरड्या व्हाव्यात आणि दूध, दहीने धुणार असल्यास त्याना व्यवस्थित धुवावे व तेलकटपणा राहू नये. बाजारातील केमिकल अथवा साबणाचा वापर टाळावा. चिंच किंवा लिंबू नैसर्गिक गोष्टींचाच वापर करावा. तसेच देवघरातील दिवा टाकापासून थोडा दूर असावा, तसेच टाक हाताळताना ते खाली पडू देऊ नयेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, आपल्या घरातले टाक तपासून पहावेत.

जर एखाद्या टाकात पाणी मुरत असेल तर तो टाळ टाक लवकरात लवकर बदलून घ्यावा. टाकाच्या रूपाने असणाऱ्या देवता खूप महत्वपूर्ण आहेत आणि त्यांची काळजी घ्या, त्यानुसार का देवता अनुकूल किंवा प्रतिकूल फळ देत असतात…

टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *