रविवारी करा ‘हे’ उपाय, जीवनातील सर्व अडचणी होतील दूर !

वास्तूशास्त्र माहिती

मित्रांनो, प्रत्येकालाच आपले जीवन हे सुखी असावे कोणत्याही प्रकारच्या अडचणी, संकटे यांचा सामना करावा लागू नये असे वाटतच असते. तसेच मित्रांनो आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी देखील आपण प्रत्येक जण दिवस-रात्र कष्ट करीत असतो. तरी देखील आपल्या अडचणी संकटे कमी होतच नाहीत. त्यामुळे आपले मन खूपच दुःखी होते.

काहींना सहज यश मिळते तर काहींना मेहनत करूनही यश लाभत नाही. मित्रांनो आपल्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी आपण अनेक प्रकारचे उपाय देखील करून पाहतो. पण काही वेळेस या उपायांचा फरक पडत नसल्यामुळे आपण कोणतेही उपाय करण्यास तयार होत नाही. यशस्वी होण्यासाठी ज्योतिष शास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत.

तर मित्रांनो आज मी तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहे. हे उपाय तुम्हाला रविवारच्या दिवशी करायचे आहेत. हे उपाय तुम्ही केल्याने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. तुम्हाला कोणत्याही संकटांचा किंवा अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

रविवारी हे उपाय केल्यास जीवनातील अडथळे दूर होत यश मिळते. कारण रविवार हा सूर्य देवाला समर्पित आहे. ज्योतिष शास्त्रात सूर्याला ग्रहांचा राजा मानले जाते. रविवारी काही उपाय केल्याने सूर्य देव प्रसन्न होऊन भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. चला तर मग जाणून घेऊया रविवारच्या दिवशी कोणते उपाय केल्याने आपल्या अडचणी दूर होतील.

मित्रांनो, रविवारी सायंकाळी घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला गाईच्या तुपाचा दिवा लावल्यास घरात देवी लक्ष्मीचे आगमन होते. लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास्तव्य केल्याने आपल्या घरामध्ये ज्या काही आर्थिक अडचणी असतात त्या सर्व अडचणी दूर होतात. ज्योतिष शास्त्रानुसार रविवारी शिव मंदिरात माता गौरी आणि भगवान शंकर यांना रुद्राक्ष अर्पण केल्यानेही माता लक्ष्मी प्रसन्न होते.

मित्रांनो जर तुम्ही रविवारी कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी निघण्यापूर्वी गाईला पोळी खायला द्यावी. असे केल्याने त्या कामात यश मिळण्याची शक्यता वाढते. घरात सुख, समृद्धी आणि देवाची कृपा लाभण्यासाठी रविवारी आदित्य स्तोत्राचे पठण करणे फायदेशीर ठरते. तसेच मित्रांनो रविवारी कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी काहीतरी गोड खाऊन पाणी प्यावे.

मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये प्रगती हवी असेल तर तुम्ही रविवारच्या दिवशी तांदूळ, दुध आणि गूळ मिसळून खावे. यासह लाल कपड्यात बांधून गहू आणि गूळ दान करा. मित्रांनो, रविवारी रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दूध बाजूला ठेवा. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून आंघोळ करून ध्यान करा.

नंतर बाभळीच्या झाडाच्या मुळाशी हे दूध टाकावे. हा उपाय 7 ते 11 आठवडे केल्यास नक्कीच शुभ फळ मिळते आणि धनलाभ होतो. रविवारी शक्यतो करून निळा, काळा, आणि करड्या रंगाचे कपडे घालू नये. जर मित्रांनो तुम्हाला तुमच्या जीवनात धनप्राप्ती व्हावी असे वाटत असेल तर तुम्ही धनप्राप्तीसाठी रविवारी तीन नवीन झाडू खरेदी करून घरी आणा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे तीन झाडू दुर्गा देवीच्या मंदिरात ठेवायचा आहे.

झाडू ठेवताना तुम्हाला कोणी टोकू नये याकडे लक्ष द्या. रविवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली पिठाचा चारमुखी दिवा लावा. हा उपाय केल्याने धनलाभ होतो. आपल्या जीवनात पैशाची कधीच कमतरता भासणार नाही या नात्या गोष्टीतून तुम्हाला धनलाभ होणारच. मित्रांनो बरेच जण भरपूर धन प्राप्त करीत असतात.

परंतु हे धन या ना त्या कारणाने सतत खर्च होत असते. तर या धनहानीच्या समस्येवर मात करण्यासाठी रविवारी तलाव किंवा नदीच्या काठावर जाऊन माशांना पीठ खाऊ घाला. यामुळे तुमचे धन हे कधीही संपुष्टात येणार नाही. तुम्हाला आर्थिक चणचण भासणार नाही. तर मित्रांनो असे होते हे काही उपाय हे जे उपाय सांगितलेले आहेत हे सर्व तुम्हाला रविवारच्या दिवशी करायचे आहेत. तुम्ही यापैकी कोणताही उपाय करू शकता.

तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी असतील, आर्थिक बाबतीत समस्या असतील, आर्थिक चणचण असेल तर या सर्वांवर हे उपाय खूपच लाभदायी ठरतात. तर मित्रांनो रविवारच्या दिवशी हे छोटे आणि साधे सोपे उपाय तुम्ही अवश्य करून पहा. तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होण्यास मदत होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *