कणकीच्या दिव्याचा ‘हा’ उपाय करेल तुमच्या सर्व समस्या दुर, वाईट शक्तीपासून बचाव!

अध्यात्मिक माहिती

मित्रांनो, आपल्याला प्रत्येकाला जीवनात कोणत्या ना कोणत्या अडीअडचणी येत असतात. काही केल्याने या अडचणी दूर होत नाहीत. तसेच आपल्या घराला वाईट शक्तीपासून वाचवण्यासाठी देखील आपण कायम प्रयत्नशील राहतो. तर यासाठी आपण अनेक प्रकारचे उपाय सतत करीत असतो. असाच तुम्हाला मी कणकीच्या दिव्याचा उपाय सांगणार आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या सर्व समस्या तसेच वाईट शक्तींपासून देखील होईल.

आजच्या युगात क्वचितच अशी व्यक्ती असेल ज्याला कोणतीही समस्या नाही. प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या समस्येने ग्रासलेला असतो आणि त्यासाठी तो उपाय शोधत राहतो. ज्योतिषशास्त्रामध्ये व्यक्तीच्या अनेक समस्यांवर उपाय सांगितले आहेत, ज्याचा अवलंब करून माणूस साधे जीवन जगू शकतो.

चला तर मग अशाच काही उपायांबद्दल जाणून घेऊया ज्यामुळे तुमची समस्यांपासून लवकरच सुटका होऊ शकते.
ज्योतिषाचार्यांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक व्रत, विधी, पूजा करताना सर्वप्रथम तेथे दिवा लावला जातो. कारण दिवा लावल्याने सकारात्मक वातावरणाचा संचार होतो. आम्ही तुम्हाला सांगतो की पिठाचा दिवा सर्व प्रकारच्या दिव्यांमध्ये सर्वात शुद्ध आणि पवित्र मानला जातो.

देवतांच्या पूजेमध्ये पिठाचा दिवा लावल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात असे सांगितले जाते. पिठाचा दिवा लावल्याने तुमच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. पण हा कणकेचा दिवा जो आहे हा दिवा कोणत्या पिठाचा दिवा हा कोणते प्रश्न सोडवतो आणि तो दिवा कुठे लावायचा आहे याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

तर गव्हाच्या पिठाचा दिवा लावल्याने आपणाला मानसीक शांतता प्राप्त होते. उडीद पिठाचा दिवा लावल्यास हितशत्रू दुर राहतात. मुगाच्या पिठाचा दिवा लावल्याने आपल्या कुटुंबात शांती नांदते.

जर तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण व्हावी असे वाटत असेल तर कमी किंवा वाढत्या क्रमाने पिठाचे दिवे लावले जातात. उदाहरणार्थ. 11 दिवस, 21 दिवस आणि 31 दिवस. ज्योतिष शास्त्रात पिठाच्या दिव्यांचा क्रम अशा प्रकारे सांगितला आहे. पूजेत पिठाचा दिवा कुठल्यातरी साधनेसाठी किंवा सिद्धीसाठी वापरला जातो.

तसेच ज्या लोकांना पैशाची कमतरता किंवा आर्थिक संकट आहे अशा व्यक्तीने दररोज मंदिरात जाऊन शुद्ध तुपाचा दिवा लावावा. यामुळे देवदेवता प्रसन्न होतात असे मानले जाते. शत्रूपासून वाचण्यासाठी भैरवजींच्या मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.तर मित्रांनो वरील सांगितल्याप्रमाणे तुम्ही हे कणकेच्या दिव्याचे जर उपाय केले तर आपल्या सर्व समस्या, अडचणी नक्कीच दूर होतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *