अगदी मेणासारखी वितळू लागेल पोट व कंबरेवरची चरबी व इम्युनिटीही वाढेल झटपट, फक्त करा या 5 पदार्थांचं योग्य प्रकारे सेवन….

आरोग्य

नमस्कार मित्रांनो,

आजच्या वेगवान जग आणि गतिहीन जीवनशैलीमुळे वजन वाढणे ही स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये चिंतेची बाब झाली आहे. पण फिटनेस आणि निरोगी जीवनशैलीबद्दल जागरूकताही हल्ली तितकीच वाढली आहे. यामुळे लोकांनी आता वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी योग आणि नियमित व्यायाम करण्यास सुरुवात केली आहे.

यासोबतच खाण्याच्या सवयीं मध्येही बदल झाला आहे. वास्तविक, वजन वाढल्याने अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. विशेषतः कोविडच्या या काळात, निरोगी राहणे अ त्यं त महत्वाचे आहे.

बरेच लोक वजन कमी करण्यासाठी क्रॅश डाएटिंग आणि फॅड्सचा अवलंब करतात, पण हा निरोगी पर्याय अजिबात नाहीये. वजन कमी करण्यासाठी निरोगी आहार घेणे महत्वाचे आहे.

मसाले केवळ अन्नाची चवच वाढवत नाहीत तर हे मसाले तुमचे पुढे आलेले पोट किंवा ढेरी देखील कमी करू शकतात. तुमची अतिरिक्त चरबी जाळून टाकण्यासाठी तुमच्या आहारात हे पाच मसाले नक्कीच समाविष्ट करा.

बडीशेप : बडीशेप हा आणखी एक भारतीय मसाला आहे जो वजन कमी करण्यास मदत करतो. हे भूक कमी करण्याचे किंवा दाबून ठेवण्याचे काम करते. आपण ते आपल्या चहामध्ये देखील मिक्स करु शकता.

जीवनसत्त्वे ए, सी आणि डी या तत्वांनी समृद्ध असण्या व्यतिरिक्त बडीशेपच्या चहा मध्ये अनेक अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात जे चयापचय प्रक्रिया सुधारण्यास मदत करतात. तसेच हा चहा पचन क्रिया सुद्धा सुधारतो.

वेलची : रात्री गरम पाण्यासोबत वेलची खाल्ल्याने चयापचय दर वाढण्यास मदत होते. वेलची मध्ये मेलाटोनिन सारखे आवश्यक घटक असतात जे चयापचय दर वाढवण्यासाठी आवश्यक असतात.

जस जसे चयापचयचा दर वाढतो तस तसं शरीरातील चरबी जलद गतीने जळण्यास बर्न होण्यास सुरवात होते आणि अधिक ऊर्जा निर्माण होऊ लागते. त्यामुळे लठ्ठपणा सोबतच इतर समस्यां पासून सुद्धा आराम मिळतो.

दालचिनी : भारतीय स्वयंपाकघरात सर्वाधिक वापरली जाणारी दालचिनी वजन कमी करण्यासाठी सर्वात जास्त मदत करते. तज्ञ म्हणतात की दालचिनी अँटीऑक्सिडंट आणि अँटीइन्फ्लमेट्री गुणधर्मांनी समृद्ध असते. एक ग्लास पाण्यात एक चमचा दालचिनी पावडर मिसळून प्यायल्याने चयापचय दर म्हणजेच मेटाबॉलिज्म रेट वाढतो, ज्यामुळे चरबी वेगाने बर्न होते.

जेव्हा एखादी व्यक्ती इन्सुलिन प्रतिरोधी बनते, तेव्हा त्या व्यक्तीने खाल्लेले कार्बोहायड्रेट्स पदार्थ साखरे मध्ये बदलतात, ज्याचे आवश्यक प्रमाणात पचन होत नाही आणि नंतर त्याचं चरबीमध्ये रूपांतर होतं. दालचिनी हे चक्र तोडण्यास मदत करते.

काळीमिरी : काळी मिरी चयापचय क्रिया वाढवण्यास मदत करते. वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी मध्ये एक चिमूटभर काळी मिरी घाला आणि दिवसातून दोन ते तीन वेळा त्याचे सेवन करा. याशिवाय तुम्ही सकाळी सकाळी 3 ते 4 काळी मिरीचे दाणे चघळू शकता आणि एक ग्लास कोमट पाण्यासोबत त्याचे सेवन करू शकता. काळी मिरीमध्ये फायटोन्यूट्रिएंट्स असतात जे जलद गतीने चरबी जाळतात. त्यामुळे त्याचे नियमित सेवन केले पाहिजे.

मेथी दाणे : मेथी दाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते जे भूक कमी करण्यास मदत करते. हे आपल्याला अति खाणे टाळण्यास मदत करू शकते. तज्ञांचा असा विश्वास आहे की मेथी दाणे आहारातील चरबी आणि कॅलरी कमी करण्यास मदत करू शकतात. त्यामुळे जर तुम्हाला लवकर वजन कमी करायचे असेल तर मेथी दाण्यांचा तुमच्या आहारात अवश्य समावेश करावा.

अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले DASHING MARATHI   हे फेसबुक पेज नक्की लाईक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *