उन्हाळ्यामध्ये कलिंगड खाल्याने मिळणारे अनेक गुणकारी फायदे

आरोग्य

नमस्कार मित्रांनो,

उन्हाळ्यात कलिंगड खाल्ल्याने शरीराला थंडावा आणि स्फूर्ती मिळते तसेच मनतृप्त होते. शरीरातील पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी आपण कलिंगडाचे सेवन करू शकता. आज आपण कलिंगड खाल्याने आपल्याला कोणकोणते फायदे मिळू शकतात हे जाणून घेणार आहोत.

कलिंगडामध्ये एंटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ए, लोह, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि प्रोटीन हे पोषक घटक असतात. उष्णतेमुळे अंगाची लाही लाही होत असल्यावर कलिंगडाच्या सेवन केल्यास शरीराला शीतलता प्राप्त होते.

शारीरिक परिश्रम करून थकल्यावर कलिंगडाचे सेवन केल्याने थकवा दूर होऊन उत्साह निर्माण होईल आणि आपल्याला ताजेतवाने वाटू लागेल. कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. कलिंगडाचे सेवन केल्याने किडनी साफ व्हायला मदत होते.

लघवी करताना जळजळ होत असल्यास म्हणजेच उन्हाळी लागल्यावर अशावेळी कलिंगडाचे सेवन केल्याने हा त्रास कमी व्हायला मदत मिळते. कलिंगडाचे सेवन केल्याने पित्त विकार कमी व्हायला मदत मिळते.

कलिंगडाचे सेवन केल्याने कलिंगडामध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए या व्हिटॅमिन्समुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. रातांधळेपणा आणि मोतीबिंदू यासारख्या डोळ्यांच्या आजारापासून दूर राहण्यासाठी आपण कलिंगडाचे सेवन करू शकता.

उष्णतेमुळे तळपायांची आग होत असल्यावर कलिंगडाची साल तळपायांवर लावून ठेवा. असे केल्याने तळपायांची आग कमी होऊन आराम मिळेल. कलिंगडाची साल चेहऱ्यावर चोळल्याने चेहऱ्यावर तजेलदारपणा येतो.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *