चैत्र अमावस्येचे महत्त्व, या दिवशी चुकूनही या गोष्टी करू नका

अध्यात्मिक माहिती

येत्या 20 एप्रिलला आहे चैत्र अमावस्या. या दिवशी स्नान, दान यासारखे धार्मिक आणि आध्यात्मिक कार्य केले जातात. चैत्रा अमावस्या पितृदर्पण विधींसाठी सुद्धा ओळखली जाते. या दिवशी कावळा, गाय, कुत्रे आणि गरीब लोकांनाही अन्नदान करण्याची प्रथा आहे. चैत्र अमावस्या हा दिवस आपल्या हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानला जातो.

गरुड पुराणानुसार अमावस्येला पूर्वज आपल्या वंशजांना भेट देतात आणि म्हणून पितरांना भोजन दिले जाते. चैत्र अमावस्या व्रत हा हिंदू धर्मामधील सर्वात लोकप्रिय वृत्तांपैकी एक व्रत मानला जातो. अमावस्या व्रत किंवा उपवास सकाळी सुरू होतो आणि प्रतिपदेला चंद्र दर्शन होईपर्यंत चालू असतो. या अमावस्येची नेमकी तिथी आणि तिचे महत्त्व जाणून घेऊया.

चैत्र महिन्याची अमावस्या सुरू होते १९ एप्रिल बुधवारी सकाळी ११ वाजून २३ मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी २० एप्रिल गुरुवारी सकाळी ९ वाजून ४२ मिनिटां पर्यंत असेल. उदय तिथीनुसार चैत्र अमावस्या २० एप्रिल गुरूवारी रोजी साजरी होणार आहे.
वास्तविकता या दिवशी काही नकारात्मक शक्ती उग्र रूप धारण करतात असं म्हणतात.

या उग्रतेला शांत करण्यासाठी नकारात्मक ऊर्जेने प्रभावित व्यक्ती अमावस्याला पवित्र नदीत स्नान करतात असं म्हणतात. कोणत्याही अमावस्येला पितरांचे श्राद्ध विधी केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. यासोबतच चैत्र अमावस्यालाही पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी विशेष उपाय करावे असं सांगण्यात येतं.

असं मानलं जातं की चैत्र अमावास्येला भगवान विष्णूची पूजा केल्याने जीवनातील दुःख, संकट आणि नकारात्मकता दूर होण्यास मदत होते. पुराणात सुद्धा असे सांगितले आहे की या शुभ दिवशी गंगा नदी स्नान केल्याने आपली पाप आणि वाईट कर्म धुवून जातात. अमावस्येला पितरांची श्राद्ध वगैरे करतात यासोबतच पितृदोष समाप्त होतो असं सांगण्यात येते.

मात्र चैत्र अमावस्येला चुकूनही काही गोष्टी करू नये असं म्हणतात. त्यात अमावस्येला कुटुंबातील सदस्यांनी वाद घालू नये, कोणतेही व्यसन किंवा तामसीक भोजन करू नये. अमावस्येच्या दिवशी केस आणि नखे कापू नये असं म्हटलं जातं. या गोष्टी केल्याने आर्थिक संकट कोसळत असं म्हणतात.

शिवाय गरुडपुरणा नुसार अमावस्येला शारीरिक संबंध ठेवल्याने जन्मलेल्या मुलाला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते असं सुद्धा म्हटलं जातं.याव्यतिरिक्त चैत्र अमावस्या ला काही उपाय मात्र नक्की करावे. चैत्र अमावास्ये च्या दिवशी गायीला हिरवा चारा द्यावा.

कुत्र्यांना आणि कावळ्यांना भाकरी खायला द्यावी. शक्य असल्यास अन्न, धान्य, कपडे आदी गरजूंना दान करावे. चैत्र अमावस्येला या उपायांनी पितरांची कृपा आपल्यावर कायम राहते असं म्हटलं जातं आणि पितरांच्या आत्म्यास शांती लाभते असं म्हणतात.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *