गुरुचा दोष नाहीसा करायचा असेल तर करा हे व्रत

अध्यात्मिक माहिती

गुरुचा दोष नाहीसा करायचा असेल तर तुम्हाला हे व्रत नक्की करायला पाहिजे. गुरुवार हा दिवस भगवान विष्णू यांना समर्पित दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी व्रत केल्यास आयुष्यातल्या चिंता नाहीशा होतातच त्या सोबतच माता लक्ष्मीचाही आशीर्वाद प्राप्त होण्याची संधी असते.

गुरुचा दोष दूर करण्यासाठी गुरुवारी भगवान विष्णूचे सत्यनारायण व्रत करावे असं सांगण्यात येत. हे व्रत केल्याने गुरुदोष आणि आर्थिक स्थिती सोबतच इतर समस्या नाहीशा होतात. चला तर मग जाणून घेऊया गुरुवारी भगवान श्रीहरी विष्णूला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करायला हवेत.

ज्योतीषशास्त्रा नुसार व्यक्तीच्या जीवनात कुंडलीला विशेष महत्त्व आहे. कुंडलीतील ग्रह स्थितीचा व्यक्तीच्या जीवनावर परिणाम होत असतो. कुंडलीत जर ग्रहदोष असेल तर व्यक्तीला अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं. ग्रहदोषामध्ये गुरुदोष महत्त्वाचा मानला जातो. कुंडलित गुरुदोष असल्यास विविध अडचणी निर्माण होतात.

हा दोष दूर करण्यासाठी ज्योतिष शास्त्रात काही उपाय सांगण्यात आलेत. गुरुवारच्या दिवशी हे उपाय केल्यास गुरुदोषाचा नकारात्मक प्रभाव कमी होतो. कारण गुरुवारचा दिवस हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे.तर सर्वात आधी गुरुवारी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करावे.

स्नानाच्या वेळी ओम बृहस्पते नमः या मंत्राचा जप करावा. गुरुचा कोणताही दोष दूर करण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून गुरुवारी स्नान करावे. यासोबतच स्नान करताना ‘ओम नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा जप करावा. अंघोळी नंतर पिवळ्या रंगाचे वस्त्र घालावे. स्नानानंतर भगवान विष्णूच्या मूर्ती समोर तुपाचा दिवा लावा.

भगवान विष्णूला पिवळ्या रंगाच्या फुलासह तुळशीची पाने अर्पण करावी. कपाळावर हळद चंदन किंवा कुंकू लावावं. गुरुवारी व्रत ठेवावं आणि जल अर्पण करून केळ्याच्या पानाची पूजा करावी. असं केल्याने वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात आणि जर तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या वैवाहिक जीवनात कोणत्याही अडचणी येणार नाहीत असं सांगण्यात येत.

आर्थिक महत्त्वाच्या दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे घरातील संपत्तीसाठी गुरुवार हा दिवस सर्वात शुभ असतो. या दिवशी पिवळ्या रंगाच्या वस्तूंना विशेष महत्त्व दिले जात. त्यासोबतच मान्यते नुसार भगवान बृहस्पतीला सुद्धा पिवळ्या रंगाच्या गोष्टी खूप आवडतात.

म्हणूनच या दिवशी पिवळ्या रंगाच्या वस्तू जसे हरभरा डाळ, फळे इत्यादी ब्राह्मणांना दान करावे. या दिवशी सकाळी घराच्या मुख्य दरवाजावर हरभरा डाळ आणि थोडा गूळ ठेवावा. गुरुवारी कोणाकडूनही उधार घेऊ नये किंवा देऊ नये. जर तुम्ही असे केले तर तुमच्या कुंडलीतील गुरुची स्थिती बिघडू शकते आणि तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.

जर तुम्ही गुरुवारी व्रत ठेवत असाल तर या दिवशी सत्यनारायणाची व्रतकथा नक्की ऐकावी किंवा वाचावी. त्यासोबतच गुरुवारच्या दिवशी तुम्ही पुढील मंत्राचा जप सुद्धा करू शकता. त्यात ॐ बृ‌ं बृहस्पतये नमः, ‌ॐ क्ली‌ं बृहस्पती नमः, ‌ॐ ऐ श्री बृहस्पतये नमः, ॐ गुं गुरवे नमः या मंत्राचा जप तुम्ही करू शकता.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *