आठवड्याच्या कोणत्या वारी कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावे?

अध्यात्मिक राशिभविष्य

मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहित आहे की, ज्योतिष शास्त्रला विशेष स्थान दिले गेलेले आहे. आठवड्याचे जे सात वार असतात या वारांना खूप सारे महत्त्व आहे. प्रत्येक वार हा विशिष्ट ग्रहाशी जोडला गेलेला आहे. प्रत्येक वार हा कोणत्या ना कोणत्या ग्रहाची संबंधित आहे.

प्रत्येक वार हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित केलेला असतो.  त्या त्या वारी आपण तो उपवास व्रत देखील करीत असतो. तसेच प्रत्येक देवतांची पूजा देखील विशिष्ट वारी केली जाते. मित्रांनो आज मी तुम्हाला कोणत्या वारी कोणत्या रंगाचे कपडे घालावेत? जेणेकरून त्याचा फायदा आपणाला होतो याविषयीची सविस्तर माहिती सांगणार आहे.

जर तुम्ही त्या त्या वारी विशिष्ट रंगाचे कपडे परिधान केले तर तुमचे नशीब नक्कीच बदलेल. आपल्या जीवनातील खूप सार्‍या अडचणी कमी होतात. जी काही दुःख आहेत ती सर्व दूर होऊन आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त होते. त्याचबरोबर आपणाला नशिबाची साथ देखील मिळते.

चला तर मग जाणून घेऊया सात दिवसांचे सात रंग कोणते आहेत आणि कोणत्या वारी त्या रंगाचे आपण कपडे परिधान करायचे आहेत जेणेकरून त्याचा शुभ परिणाम आपल्या जीवनावर होईल. यातील पहिला वार म्हणजेच सोमवार. तर हा दिवस शिवशंकरांचा दिवस मानला जातो.

या दिवशी बरेच लोक व्रत, उपवास महादेवांचे करीत असतात. तर या दिवशी आपण पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. यामुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मक परिणाम दिसून येतील. यानंतरचा जो वार म्हणजे मंगळवारचा दिवस. तर हा दिवस हनुमानांचा दिवस मानला गेलेला आहे. या दिवशी आपण लाल, केसरी रंगाचे कपडे परिधान करावे. यामुळे आपली सर्व संकटे हनुमान दूर करतात.

तसेच बुधवार हा गणपती बाप्पांचा दिवस मानला गेलेला आहे. या दिवशी बरेच जण हे गणपती बाप्पांची मनोभावे, श्रध्देने पूजा करतात. तसेच दुर्वा देखील अर्पण करतात. तर या दिवशी आपण हिरव्या रंगाचे कपडे परिधान करावेत. हा रंग आपल्यासाठी खूपच शुभ मानला गेलेला आहे.

गुरुवार हा श्रीहरी यांचा दिवस मानला जातो. या देवाला पिवळा रंग खूपच प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत. यानंतरचा जो वार म्हणजेच शुक्रवार. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो. या दिवशी बऱ्याच महिला माता लक्ष्मीचे व्रत करतात.

माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये असावा तसेच माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न व्हावी यासाठी व्रत, उपवास करीत असतात. तर या दिवशी आपण जर गुलाबी रंगाचे कपडे परिधान केले तर माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद आपल्यासोबत राहतो. तसेच तुम्ही या दिवशी सफेद म्हणजेच पांढऱ्या रंगाचे कपडे देखील परिधान करू शकता.

शनिवार हा शनिदेवांचा वार मानला जातो. तर तुम्हाला शनि देवाला प्रसन्न करायचे असेल तर तुम्ही काळ्या रंगाचे कपडे शनिवारच्या दिवशी परिधान करायचे आहेत. तसेच रविवार हा दिवस सूर्य देवाचा असल्याने या दिवशी आपण सोनेरी रंगाची तसेच केसरी रंगाची कपडे घालावीत.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *