मित्रांनो, हिंदू पंचांगानुसार चैत्र नवरात्रीला गुढीपाडव्यापासून सुरुवात झालेली आहे. चैत्र नवरात्रीमध्ये बऱ्याच महिला या उपवास करीत असतात. तसेच माता दुर्गेच्या विविध रूपांची पूजा देखील या नऊ दिवसांमध्ये केली जाते. नवीन वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्यापासून झालेली आहे. तर चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमीला रामनवमी म्हणून साजरी केली जाते.
रामनवमीचा उत्साह हा आपल्याला सगळीकडेच पाहायला मिळतो. बऱ्याच मंदिरांमध्ये रामनवमीचा उत्साह अगदी मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. तर या रामनवमीच्या दिवशी श्रीरामांचा जन्म झालेला होता. त्यामुळे हा दिवस राम जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. आपल्या कुंडलीतील ग्रह हे आपली स्थिती सतत बदलत राहतात.
तर या रामनवमीच्या दिवशी एक विशेष योग तयार होत आहे आणि या योगाचा अनेक राशीच्या व्यक्तींना खूपच मोठा लाभ होणार आहे. रामनवमीच्या दिवसापासून यांचे आयुष्य खूपच बदलणार आहे आणि जीवनामध्ये शुभ गोष्टी घडवून येणार आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार राम नवमीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी, अमृत सिद्धी योगासह गुरुपुष्य योगही तयार होत आहे.
सर्वार्थसिद्धी आणि अमृत सिद्धी योग 30 मार्च रोजी सकाळी 6 वाजून 6 मिनिटांनी सुरू होणार असून रात्री 10 वाजून 59 मिनिटांपर्यंत असणार आहे. त्यानंतर अमृतसिद्धी योग, गुरु पुष्य आणि सर्वार्थ सिद्धी योग रात्री 10 वाजून 58 मिनिटांपासून ते सकाळी 6 वाजून 36 मिनिटांपर्यंत असणार आहे.
तर या रामनवमीच्या दिवसापासून शुभ फळाची प्राप्ती काही राशींना झालेली नक्कीच जाणवेल. तर या राशी नेमक्या कोणत्या आहेत ज्यांना या योगाचा खूपच लाभ होईल चला तर मग सविस्तर जाणून घेऊ.
सिंह राशी
चैत्र नवरात्रीपासून रामनवमीपर्यंत आनंदाचे वातावरण सर्वत्र पहायला मिळते. तरी या रामनवमीच्या दिवशी तयार झालेल्या योगाचा सिंह राशीतील लोकांना खूपच लाभ होणार आहे. यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश प्राप्त होईल. तसेच या राशीतील लोकांना खूप कर्ज असेल आणि हे कर्ज काही केल्याने फिटत नसेल तर या तयार झालेल्या योगामुळे आपली कर्जातून मुक्तता होणार आहे. तसेच यांना उत्पन्नाचे अनेक नवनवीन स्त्रोत तयार होतील. तसेच व्यवसाय करत असलेल्यांना तसेच नोकरी करत असलेल्या व्यक्तींना खूपच लाभ देखील या काळामध्ये होईल.
वृषभ राशी
राम नवमीला तयार झालेल्या योगाचा वृषभ राशीतील लोकांना खूपच लाभ होईल. म्हणजेच हा काळ या राशीतील व्यक्तींसाठी उत्तम असणार आहेत. जर एखादे तुम्ही नवीन काम करणार असाल तसेच तुम्ही गुंतवणूक करणार असाल तर तुम्ही या काळामध्ये अवश्य करावे. जेणेकरून याचा खूपच फायदा तुम्हाला होणार आहे. तसेच खूप दिवसांपासून तुमची जी काही रखडलेली कामे असतील तर या काळामध्ये सुरळीत चालू होतील. तसेच यांची आर्थिक स्थिती देखील मजबूत होईल.
तूळ राशी
या तयार झालेल्या योगामुळे रामनवमी दिवसापासून खूपच आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील. यांना अनेक शुभ फळे प्राप्त होतील. तसेच यांना या काळामध्ये अनेक चांगल्या बातम्या देखील मिळतील. या काळामध्ये तूळ राशीतील लोक आपल्या कुटुंबीयांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवतील. अनेक अविवाहित तरुण तरुणींना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतील. उत्पन्नासाठी अनेक नवीन संधी उपलब्ध होतील. तसेच या काळामध्ये यांची आर्थिक स्थिती खूपच मजबूत होईल. तसेच समाजात मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल.
अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष केंद्राशी संपर्क साधावा. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.