मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे संकटे आणि अडचणी आपल्याला येतच राहतात. हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडत असते. बऱ्याच जणांना भरपूर कष्ट घेऊन देखील त्यामध्ये हवे तेवढे यश प्राप्त होत नाही. मग त्यावेळेस आपण नशिबाला देखील दोष देत असतो.
परंतु आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्रांच्या बदलामुळे देखील आपल्या जीवनावर त्याचे परिणाम दिसून येत असतात. आपल्या कुंडलीमध्ये जर शनीची साडेसाती लागली तरी देखील आपल्या जीवनावर त्याचे परिणाम दिसून येतात. आपल्यापैकी बऱ्याच जणांना शनीच्या साडेसातीचा सामना करावा लागतो.
शनीची साडेसाती म्हणजे काय याचीच आज मी सविस्तर माहिती सांगणार आहे. तसेच त्याचे परिणाम नेमके आपल्या जीवनावर कसे होतात हेच जाणून घेऊया. ज्योतिषशास्त्रानुसार शनीच्या साडेसातीचे तीन प्रकार आहेत. पहिला लग्नाशी संबंधित आहे, दुसरा चंद्र लग्न किंवा राशीशी संबंधित आहे आणि तिसरा सूर्य लग्नाशी संबंधित आहे.
उत्तर भारतात चंद्रावरून शनीची साडेसाती काढण्याची पद्धत प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. यानुसार शनिदेव जेव्हा चंद्र राशीतून पारगमन करतात तेव्हा ती साडेसाती मानली जाते. साडेसातीच्या वेळी, शनी एखाद्या व्यक्तीने केलेल्या भूतकाळातील कर्माचा हिशोब घेत असतो.
ज्याप्रमाणे घराची संपूर्ण जबाबदारी घेणार्या व्यक्तीला काही काळानंतर हिशेब मागितला जातो आणि चूक केल्याबद्दल त्याला कोणत्या प्रकारची शिक्षा मिळते असेच काहीसे साडेसातीच्या काळात घडते. आपल्यापैकी बरेच जण असे म्हणतात की, शनीच्या साडेसातीचा फक्त आपणाला त्रास होतो.
परंतु हा सर्व गैरसमज आहे. शनीच्या साडेसातीच्या काळामध्ये आपणाला आपल्या कर्माची फळ मिळत असतात. ज्यांनी वाईट कर्म केलेले असते त्यांना वाईट तर ज्यांनी चांगले कर्म केलेले असते म्हणजेच कुणाचेही वाईट केलेले नसते त्यांच्यासाठी हा काळ सुवर्णकाळ असतो.
जर शनीची साडेसाती धनु, मीन, मकर किंवा कुंभ राशीत असेल तर याचा त्रास कमी होतो, पण चौथ्या, सहाव्या, आठव्या, बाराव्या राशीत असेल तर मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या त्रास होतो. मात्र हे सर्व प्रत्येक व्यक्तीच्या कर्मावर अवलंबून असते. साडेसाती सुरू असताना आपण अजिबात नीलम धारण करायचा नाही.
कारण असे केल्याने आपल्याला लाभाऐवजी नुकसान होण्याची शक्यता असते. तसेच कोणतेही नवीन काम, नवीन उद्योग हा साडेसातीत करणे टाळावे. कोणतेही काम करण्यापूर्वी जाणकार ज्योतिषांकडून माहिती घ्यावी. शनीच्या साडेसातीचा जर प्रकोप टाळायचा असेल तर प्रत्येक व्यक्तीने जप, तपश्चर्या आणि जे काही नियम सांगितलेले आहेत ते साडेसाती सुरू होण्यापूर्वी करावे. या काळात हनुमानजींची पूजा करणे खूप फायदेशीर आहे.
तर मित्रांनो वरील सांगितल्याप्रमाणे शनीची साडेसाती ही पूर्ण त्रासदायक नसते. तर आपल्या कर्मानुसार आपणाला शुभ आणि अशुभ फळे मिळत राहतात. तसेच वरील सांगितल्याप्रमाणे आपण योग्य ती काळजी या शनीच्या साडीसातीमध्ये घ्यावी.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.