हनुमान वडवानल स्तोत्र स्त्रियांनी वाचावे की नाही ?

अध्यात्मिक

मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक देवी देवतांना खूपच पूजनीय मानले जाते. प्रत्येक सण उत्सवाला देखील खूप सारे महत्त्व आहे. प्रत्येक जण हा प्रत्येक सण आनंदाने साजरे करीत असतात. प्रत्येकाची वेगवेगळ्या देवी देवतांवर श्रद्धा असते. ते त्या देवी-देवतांचे व्रत, उपवास करीत असतात. जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी.

देवी देवतांचे व्रत, उपवास करीत असताना बरेचजण हे अनेक मंत्रांचा जप देखील करीत असतात. तसेच अनेक पाठ देखील ते वाचत असतात. स्त्रोतांचे पठण करत असतात. तर आज मी तुम्हाला वडवानल स्त्रोत विषयी सांगणार आहे. वडवानल स्त्रोत्र हे बिभिषण लिखित हनुमानाची स्तुती आहे.

आपल्यापैकी बरेच जण हे हनुमानांचे भक्त आहेत. मंगळवार हा दिवस हनुमानांना समर्पित आहे. या दिवशी बरेचजण उपवास करतात. हनुमान हे एक प्रचंड शक्तिशाली, बुद्धिवान देवता मानले जातात. ते कोणत्याही संकटातून आपल्या भक्तांना सहीसलामत बाहेर काढतात.

अनेकांना असा प्रश्न पडलेला असतो की, वडवानल स्त्रोत हे महिलांनी वाचावे की वाचू नये. तर याच प्रश्नाचे उत्तर आज मी तुम्हाला सांगणार आहे. वडवानल स्तोत्रात बीज अक्षरांचा वापर केलेला आहे. जेव्हा एखादी कोणतीही अडचण समस्या जर काही केल्याने सुटत नसतील.

जेव्हा आपण खूप सारे प्रयत्न करून सगळे प्रयत्न संपतात. त्यावेळेस त्या समस्येवर रामबाण उपाय म्हणून वडवानल स्त्रोताचे पठण केले जाते. वडवानल स्तोत्रातील बीज अक्षरामुळे चैतन्यात वाढ होते. बीजमंत्र किंवा बीज अक्षरे हे एखाद्या कल्पवृक्षासारखे असतात.

कोणत्याही कार्यसिद्धीसाठी त्यांचा सदुपयोग करता येतो. श्री स्वामी समर्थ नित्य उपासनेच्या पुस्तकात सुध्दा या स्त्तोत्राचा उल्लेख आहे. वडवानल स्तोत्राच्या उच्चाराने निर्माण होणाऱ्या ऊर्जेत वैश्विक शक्तीला आकर्षित करून इच्छित फलप्राप्ती करून घेण्याची ताकद असते.

या मंत्राचा चुकीचा उच्चार केला तर यामुळे आपल्याला अशुभ फळे देखील प्राप्त होतात. त्यामुळे कधीही आपल्या मनाने स्रोत व मंत्र म्हणायचा नाही. जर तुम्हाला स्त्रोत मंत्र जर माहिती नसेल तर तुम्ही एखाद्या जाणकार व्यक्तींकडून तो शिकून घ्यावा. आपण ते कोणत्या कारणासाठी करीत आहोत व ती समस्या सुटणे किती महत्त्वाचे आहे हे पाहून त्यानुसार त्याचा संकल्प सोडावा.

मग यथायोग्य त्या स्तोत्राचे पठण करावे. काही वेळा खूप लोक सांगतात आमच्या वर कोणीतरी तंत्र-मंत्र अनिष्ट शक्तीचा वापर केला आहे. अशावेळी बरेच लोक हे अनेक बुवा बाबांकडे जातात आणि त्या समस्या सोडवण्यासाठी अनेक तंत्र मंत्र करणाऱ्या बुवा बाबांचा आधार घेतात. तर तुम्ही अशा या बुवा बाबांचा आधार अजिबात घेऊ नका.

या आपल्या समस्या सोडवण्यासाठी वडवानल स्तोत्रासारखे अनेक पवित्र साधना, उपाय, उपासना वेदादी ग्रंथांत सांगितले आहेत. मित्रांनो, बलाढ्य व आसुरी शक्तींना परतवून लावण्याची ताकद या वडवानल स्तोत्रात आहे. अशा प्रकारच्या पवित्र आणि शक्तीशाली स्तोत्राचे उपयोग करा आणि आपली सुटका करून घ्या.

वडवानल स्तोत्राची सुरूवात मंगळवारी किंवा शनिवारी करावी. हे वडवानल स्त्रोत आहे हे स्त्रियांनी वाचले तरीही चालते. स्त्रियांनी हे वाचायचे नाही असे अजिबात नाही. तर स्त्रियांनी देखील त्यांना कोणत्याही समस्येतून बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळत नसेल सर्व प्रयत्न करून ते व्यर्थ ठरले असतील तर शेवटचा पर्याय म्हणून तुम्ही वडवानल स्त्रोत नक्कीच वाचावे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *