‘या’ राशीच्या लोकांनी लाल धागा बांधू नये, होते मोठे नुकसान !

अध्यात्मिक वास्तूशास्त्र

मित्रांनो, आपल्यापैकी बरेच जण हे आपल्या राशीनुसार सांगितलेले उपाय तसेच व्रत तसेच अनेक प्रकारच्या विधी करत असतात. जेणेकरून आपल्या जीवनात कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये. वेगवेगळ्या प्रकारच्या अंगठ्या तसेच धागा अनेक प्रकारचे लोक बांधीत असतात. अनेक लोक सहसा त्यांच्या हातात किंवा गळ्यात लाल धागा बांधतात.

कोणत्याही धार्मिक किंवा शुभकार्यात लाल धागा बांधण्याची परंपरा आहे. लाल धागा शुभ मानला जातो. त्याचबरोबर ज्योतिष शास्त्रानुसार लाल धागा धारण करण्याचे अनेक फायदे देखील आहेत. यासोबत ज्योतिष शास्त्रात असे देखील सांगण्यात आले आहे की, कोणत्या राशीच्या लोकांनी लाल धागा बांधावा आणि कोणत्या राशीच्या लोकांनी लाल धागा बांधू नये.

तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की, कोणत्या राशीतील लोकांनी लाल धागा बांधू नये? ज्योतीष शास्त्रानुसार शनिदेव कुंभ आणि मीन या राशींचा स्वामी आहे. असे म्हणतात की शनि देवाला लाल रंग आवडत नाही. त्यामुळे कुंभ आणि मीन राशींच्या लोकांनी चुकूनही लाल धागा बांधू नये. जर कुंभ आणि मीन राशीच्या लोकांनी जर लाल रंगाचा धागा बांधला तर त्यांना लाभाच्या ऐवजी मोठे नुकसान होऊ शकते.

म्हणून कुंभ आणि मीन राशीच्या लोकांनी हे लक्षात ठेवा. जर या राशींच्या लोकांनी लाल धागा परिधान केला असेल तर त्यांनी तो ताबडतोब काढून टाका. पण बाकीच्या राशींनी लाल धागा बांधलाच पाहिजे. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घेऊयात.

मेष, सिंह, वृश्चिक राशींच्या लोकांनी लाल धागा बांधावा. मान्यतेनुसार या राशींच्या लोकांना लाल धागा बांधून हनुमानजींचा आशीर्वाद मिळतो. असे सांगण्यात आलेले आहे. म्हणून या राशींच्या लोकांनी लाल धागा बांधला पाहिजे. हातात लाल धागा बांधण्याचे शास्त्रीय कारण देखील आहे

श्रद्धेनुसार आज बऱ्याच जणांना माहिती नसतील. हातात धागा बांधल्याने हार्ट अटॅक रक्तदाब यांसारखे आजारांचा धोका कमी होऊ शकतो. मान्यतेनुसार हातात लाल धागा बांधल्याने धनाची देवी लक्ष्मी देवी प्रसन्न होते. त्याचबरोबर राम भक्त भगवान हनुमानजींचा आशीर्वाद सुद्धा मिळतो.

मनगटावर लाल रंग बांधल्याने कुंडलीतील मंगळ ग्रह मजबूत असतो. यातून पैसे आणि आर्थिक लाभ होण्याची सुद्धा शक्यता असते. दुसरीकडे लाल धागा परिधान करणे ज्योतिष शास्त्रानुसार शुभ मानले जाते. यामुळे आपल्या शरीरात सकारात्मक ऊर्जेचा संचार राहतो. त्यांच्या जीवनावर चांगला परिणाम होतो.

तर अशा प्रकारे मित्रांनो वरीलपैकी काही राशींनी लाल रंगाचा धागा बांधायचा आहे आणि वरील सांगितल्याप्रमाणे काही राशीतील लोकांनी लाल रंगाचा धागा बांधायचा नाही. जेणेकरून त्यांना त्यांच्या जीवनामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच खूप मोठे नुकसान त्यांच्या जीवनात होऊ शकते.

टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *