मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला फार महत्त्व दिले जाते. अगदी एखाद्या घर बांधताना संपूर्ण दिशा जाणून घेऊन व वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे घराचे बांधणी केली जाते. कोणकोणत्या गोष्टी कोण कोणत्या देशाला असाव्यात? याबद्दलची संपूर्ण माहिती वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले आहे. याचीच माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
ईशान्य दिशा :-
1. आपल्या वास्तूमध्ये या जागी नेहमी शुद्ध पाणी, देवघर, तलाव आणि विहीर अंतर्गत पाण्याचा साठा चालेल.
2. या जागी शक्यतो पांढरा किवा, फिका पिवळा रंग द्यावा.
3. ईशान्येला नेहमी उतार असावा.
4. ईशान्येच्या बाजूने प्रवेश असल्यास तिथे चप्पल काढू नये.
5. या कोपऱ्यात संडास कचराकुंडी, संडासची टाकी, चप्पल, जिना, विजेचा मीटर, मोठी झाडे स्वयंपाकघर आणि वाहनतळ असणे अशुभ असते.
6. वास्तूमध्ये ईशान्य दिशा कट असल्यास, अशी वस्तू घेऊ नये अथवा योग्य उपाय ताबडतोब करावेत, अश्या जागी वंशनाश होतो, दारिद्रय येते विनाकारण संकटे येतात.
7. या जागी रोज देवपूजा करावी, दरवाजा असल्यास स्वस्तिक नेहमी लावावे, या जागी कलश आवर्जून ठेवा.
8. इथे नवरा बायकोने झोपणे टाळावेच, अडचण असल्यास घरातील वयस्कर व्यक्ती, अथवा लहान मुले चालतील.
पूर्व दिशा :-
1. या दिशेला जमिनीचा उतार असल्यास, त्या वास्तूमध्ये ऐश्वर्य, धन व बुद्धी मध्ये वाढ होते.
2. हा भाग उंच असल्यास संततीला धोका असतो, धन नाश होतो.
3. पूर्व जागा जास्तीत जास्त रिकामी असल्यास, त्या घरात समृद्धी येते.
4. या दिशेला घराचा दिवाणखाना असावा.
5. मुख्य दरवाजा असावा, शोभिवंत कुंड्या असव्यात.
6. या जागी संडास असल्यास रुधय रोग, रक्तविकार, उष्णज्वर आणि शिरोरो असे रोग उद्भवतात, असे अनुभव आहेत.
7. या जागी फिक्का गुलाबी, क्रीम, पांढरा असे रंग असावे.
8. या दिशेला खूप उंच झाडे असू नयेत, परंतु शोभिवंत झाडे नक्कीच असावीत.
9. या दिशेला कुंपण इतर दिशे पेक्षा कमी उंचीचे असावे.
10. राजकीय क्षेत्रात लाभ मिळवण्यासाठी, पूर्वेच्या मध्यभागी मुख्य दरवाजा असावा.
आग्नेय दिशा:-
1. या दिशेला स्वयंपाकघर असणे अत्यंत शुभ, व सुखकारक असते.
2. या दिशेला विजेचा मीटर तसेच, जनरेटर विचेची मोटार अश्या वस्तू असाव्यात.
3. आग्नेय दिशेला विहीर, कुपनलिका व पाण्याची टाकी असल्यास, शत्रूचा त्रास तसेच अपघात योग दाखवतात.
4. या दिशेला वाहनतळ करू शकता.
5. हा कोपरा दुषित असल्यास, त्या घरात महिलांना जास्त त्रास होतो.
6. या दिशेला काही दोष असल्यास, कमीत कमी एक लाल रंगाचा दिवा कायमस्वरूपी तिथे लावावा.
7. या दिशेला दार असल्यास, संबधित तज्ञाकडून उपाय करून घ्यावेत, अशा वेळी घरात नेहमी मतभेद असतात.
8. या दिशेला हलका गुलाबी फिक्कट केसरी रंग देऊ शकता.
9. अग्नेयेचे दार दक्षिणेला असल्यास, दीर्घ रोग व कटकटी असतात.
दक्षिण दिशा.
1. या दिशेला दार अशुभ आहे, या दिशेला दार असल्याने सतत त्रास होतो व आजारपण असते.
2. हि दिशा नेहमी उंच असावी, तसेच या दिशेच्या भिंतीही इतर दिशेपेक्षा जाड व उंच असव्यात.
3. या दिशेला सांडपाणी अथवा पाण्याची टाकी असल्यास, एकामागे एक असे मृतू होतात.
4. दक्षिणेच्या दारावर कधीही पंचमुखी मारुती लाऊ नका, मासिक धर्मात सर्व स्त्रिया त्याच दाराखालून येतात, हे योग्य नव्हे.
5. या दिशेला उंच झाडे लावावीत.
6. या दिशेला निळा भुरका रंग चालेल.
7. या दिशेला संडास बाथरूम असल्यास, पती पत्नीमध्ये सतत कलह असतो.
8. दक्षिणेला वरती मजला बांधल्यास शुभ फळ मिळते.
9. या दिशेला स्वयंपाकघर असल्यास, आर्थिक चणचण असते.
10. या दिशेला जिना शुभ फळ देतो.
11. या जागी तळघर असल्यास अपमृत्यू होतात.
नैऋत्य दिशा.
1. हि दिशा घरातील इतर सर्व दिशांमध्ये सर्वात उंच असावी.
2. या दिशेला घरातील मोठ्यांचे बेड रूम असावे, तसेच या दिशेला तिजोरी उत्तरेला तोंड करून ठेवावी.
3. या दिशेला जिना चालेल, संडास बाथरूम चुकूनही असू नये.
4. हि दिशा कट असल्यास अथवा या दिशेला दार असल्यास, आत्महत्या होतात अथवा अपघाती मृत्यू होतो.
5. या दिशेला गोडाऊन अथवा वाहनतळ चालेल.
6. या दिशेला पाण्याची टाकी, वास्तूपेक्षा उंचावर असल्यास अति उत्तम.
7. जी व्यक्ती घरात या जागच्या खोलीत राहते, त्याचेच प्रभुत्व या घरावर राहते.
8. या दिशेचा दरवाजा असल्यास त्वरित बंद करावा.
9. या दिशेला संडास पाण्याची टाकी विहीर उतार असल्यास, अपकीर्ती बाहेरील बाधा चर्मरोग होतात, तसेच संकटांची मालिका चालू राहते, असा अनुभव आहे.
पश्चिम दिशा :-
1. या दिशेला नेहमी संडास व बाथरूम असावे.
2. या दिशेला उतार असेल तर, त्या घरात स्त्रियांचे प्रभुत्व चालते.
3. हि दिशा उंच असल्यास, पुरुषांना कीती as मिळते व्यवसाय वृद्धी होते.
4. या दिशेला सेप्टिक टैंक चालेल.
5. प्लॉट मध्ये या दिशेला कमी जागा सोडावी.
6. ईशान्य दिशे पेक्षा जास्त उतार असल्यास, दुख भोगावे लागेल.
वायव्य दिशा :-
1. या दिशेला नेहमी लहान मुलांचे बेड रूम असावे.
2. या दिशेला वरच्या बाजूला पाण्याची टाकी शुभ असते.
3. या दिशेला विहीर कुपनलिका, जमिनीच्या खालचा पाण्याचा साठा, पक्षाघात, वेडेपणा व कावीळ असे रोग दर्शवतात.
4. या दिशेला जिना शुभ असते.
5. ज्यांचे विवाह जमत नाही, अश्या व्यक्तींनी या दिशेला झोपावे.
6. व्यवसायाच्या जागी या दिशेचा माल लवकर विकला जातो.
7. या दिशेला संडास चालेल.
उत्तर दिशा.
1. साक्षात कुबेराची हि दिशा असून, या दिशेला दरवाजा असल्यास अशा वास्तूमध्ये, कधीही पैसे कमी पडत नाही.
2. या दिशेला नेहमी उतार असावा.
3. या दिशेला पाण्याचा साठा शुभ असतो.
4. या दिशेला कुंपणाची उंची कमी ठेवावी.
5. हि दिशा नेहमी साफ व सुंदर ठेवावी.
6. या दिशेला शोभेची झाडे नक्की लावावी.
7. महत्वाची बोलणी याच दिशेला तोंड करून करावी.
8. या दिशेला जास्तीत जास्त रिकामी जागा सोडावी.
9. या दिशेला संडास असल्यास दारिद्र्य येते.
10. मुलांनी अभ्यास करताना याच दिशेला तोंड करावे.
अशाप्रकारे वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला प्रत्येक दिशेला कोणकोणत्या वस्तू ठेवाव्यात व घर कसे असावे याबद्दलची माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेतलेले आहेत.