नमस्कार मित्रांनो,
स्वामी तुमच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात सुखात आणि हसत खेळत ठेवू देत हीच स्वामी चरणी प्रार्थना. स्वामी भक्तहो प्रत्येकाला असे वाटत असते की, माझ्या सर्व इच्छा पुर्ण व्हाव्यात. काही गोष्टी ज्या आयुष्यात ठरवलेल्या असतील त्या पूर्ण करण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करतो.
परंतु काही दोष आणि काही अडचणींमुळे त्या गोष्टी पूर्ण होण्यात बाधा येते, अडचण येते. म्हणून गुरुवारी आपल्याला एक गोष्ट नक्कीच करायचे आहे. ज्यामुळे आपल्याला आपल्या कामात अडचण येणार नाही. गुरुवारी स्वामी समर्थांची भक्ती केल्यास मन प्रसन्न राहते. स्वामी महाराजांचा जप करून आपल्या समस्या सुटतात.
कारण स्वामी समर्थ नेहमी सांगतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. गुरुवारी स्वामींचा हा उपाय तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करेल. स्वामींची सेवा जर तुम्ही विना अपेक्षा केली, पूर्ण श्रद्धेने केली तर स्वामींचा आ शी र्वा द तुम्हाला नक्कीच लाभेल. स्वामींच्या गुरुदेवतेचा दिवस म्हणजे गुरुवार. स्वामींचा आवडता दिवस म्हणजे गुरुवार. गुरुवारी केली जाणारी कामे सेवा यावर स्वामींचा आ शी र्वा द राहतो.
हा उपाय केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करून, स्वच्छ मनाने, पूर्ण श्रद्धेने स्वामींचे नामस्मरण करून हा उपाय नक्की करून बघा. स्वामी भक्तांनो माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपले मागचे प्रारब्ध आपल्यासोबत घेऊन येत असतो. या जन्मात चांगले वाईट हे फळ आपल्याला मिळते ते या प्रारब्धामुळेच. आपण म्हणतो मी किती देवाचं करतो पण माझा अस का झालं तर प्रारब्धाचे भोग सर्वांनाच भोगायचे असतात.
आपण केलेल्या नामस्मरणाने मात्र त्याची तीव्रता कमी होत असते. तर स्वामी भक्तांनो आपल्याला अंघोळीनंतर एक काम करायचा आहे. 1 जप माळ घेऊन मन शांत एकाग्र करून या मंत्राचा जप करायचा आहे. तो मंत्र असा आहे ओम नमो स्वामी समर्थाय नमः ओम नमो स्वामी समर्थाय नमः ओम नमो स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप आपल्याला करायचा आहे.
यानंतर गीतेचा पंधरावा अध्याय तुम्हाला स्वामींचे नित्यसेवा या ग्रंथातील अध्याय वाचायचा आहे. यानंतर स्वामी समर्थांचा तारक मंत्र जप करायचा आहे. हा मंत्र तुम्ही स्वामींच्या पुस्तकातून किंवा गूगलवरती सर्च करून घेऊ शकता. या तीन गोष्टी तुम्ही पूर्ण श्रद्धेने व भक्तीने केल्यास नक्कीच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. हा उपाय तुम्ही प्रत्येक गुरुवारी केल्याने स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.
अशक्य ते शक्य स्वामी करतातच असे त्यांनी सांगितले आहेत. जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने कराल तर नक्कीच तुमची इच्छा स्वामी पूर्ण करतील. परंतु प्रत्येक गुरुवारी अंघोळ करूनच हा उपाय करावा लागेल. आपण जेव्हा पूर्ण भक्तीने निःस्वार्थीपणे स्वामींना गुरु माऊलींना हाक मारतो तेव्हा आपल्या मदतीला स्वामी नक्कीच धावून येतात आणि त्या आपल्या संकटांना तारतात.
टीप – स्वामी भक्तांनो वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यताच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतेही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.