🟡धनप्राप्तीसाठी उंबरठ्यावर करायचे उपाय, तसेच उंबरठ्याच्या बाबतीत कोणत्या गोष्टी करू नये हे पाहूया.

अध्यात्मिक माहिती

🟡धनप्राप्तीसाठी उंबरठ्यावर करायचे उपाय, तसेच उंबरठ्याच्या बाबतीत कोणत्या गोष्टी करू नये हे पाहूया.

✔️करायचे उपाय:

१) घराची स्वच्छता करून दररोज उंबरठ्याची पूजा करावी. जे दररोज नियमित पूजा करतात त्यांच्या घरात लक्ष्मी कायमस्वरूपी वास्तव करते.

२) दिवाळीच्या व्यतिरिक्त काही विशेष प्रसंगी उंबरठ्यावर तुपाचा दिवा लावावा. ते केल्याने घरात लक्ष्मीचे येणे सोपे होणार आहे.

३) एखाद्या खास प्रसंगी घराच्या बाहेर उंबरठ्याच्या जवळ स्वस्तिक बनवावे आणि हळद कुंकू वाहून निरंजन ओवाळावे.

वरील गोष्टी तुम्ही हे उपाय म्हणून जरूर करू शकता पण त्याच्याच बरोबर तुमचा कामधंदा तुमची नोकरी धंदा हे प्रामाणिकपणे झालेच पाहिजे त्याला कुठलाही पर्याय नाही.

✖️असे करू नये:

१) उंबरठ्यावर कधीही पाय ठेवून उभे राहू नये.

२) उंबरठ्यावर कधीही पाय मारू नये.

३) आपल्या पदत्रणांची घाण किंवा पायाची घाण उंबरठ्यावर स्वच्छ करू नये.

४) उंबरठ्यावर उभे राहून कोणाच्याही पाया पडू नये.

५) उंबरठ्यावर उभे राहून कोणत्याही पाहुण्याचे स्वागत करू नये किंवा त्यांना निरोप देऊ नये. नेहमी पाहुण्यांचे आतिथ्य घरच्या आतून आणि त्यांना निघण्याचा निरोप उंबरठ्याच्या बाहेरून द्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *